बासरी....
बासरी....
मनमंदिरी वाजू लागली बासरी
मनमोहना लागली तुझीच आस
रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं
घननीळा लागला तुझाच ध्यास
कुंजवनी घुमू लागला पावा
कृष्णा करिते तुझाच रे धावा
हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू
वेड लावलेस या राधेला जणू
शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली
पाहून आता ना जीवनाची आस उरली
राजेंद्र देवी