मुक्त कविता

मी एकटी ....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
8 Sep 2016 - 3:42 pm

मी एकटी ....

एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही

परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही

रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?

बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?

राजेंद्र देवी

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताकरुणकविताप्रेमकाव्य

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:36 pm

रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकविता

ईच्छा

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:08 am

चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला

वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला

रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला

अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला

माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला

मुक्त कवितामुक्तक

सुखासन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Aug 2016 - 12:49 am

आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!

-शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकरुणवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमान

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
6 Aug 2016 - 2:11 pm

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
सगळ्या कविता झाल्या करून
मग पाटी कोरी केली
आणि खूप वाट पाहिली
पण काहीच सुचेना

मग एक चंद्र काढला
आभाळासारख्या पाटीवर उठून दिसला
मग त्याला सोबत म्हणून चार चांदण्या
भरतीच्या लाटा आदळल्या खडकांवर
मग लगोलग पाऊसही बरसला
ओलेत्या वाळूत तुझं नावही लिहिलं

तुला आवडतात म्हणून
सगळ्यांना आणलं होतं सोबत
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
पण नेमकी तू आली नाहीस

मुक्त कविताकविता

आठवण

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
4 Aug 2016 - 3:59 pm

'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला,
पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला,
गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या
दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा
कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं
डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!

मुक्त कविताशृंगाररेखाटन

फिलिंग आवसमला

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
24 Jul 2016 - 9:39 pm

पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग आवसमला...
वरती अवसान न्याचरल सुखाच
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....

मुक्त कवितामौजमजा

काही क्षणिका - स्त्री

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
16 Jul 2016 - 4:47 pm

(१)

वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.

(२)

पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.

(३)

देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.

मुक्त कविताचारोळ्या

आठवतेय का?

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
6 Jul 2016 - 1:37 pm

आठवतेय का?
पावसातली पहिली भेट

धुक्याची दुलई पांघरूण
लपुन बसलेली वाट
आणि तोल जाता जाता
तू हाती घेतलेला हात

ओल्या गवताळ मातीचा
थंड हुळहुळता स्पर्श
आणि भिजल्या पापण्यात
तुझ्या श्वासांची ऊब

मला उगीच असलेली
घरी जायची घाई
आणि तुझ्या आर्जवात
शहारलेली जाईजुई

डोळ्यांनीच दिलेघेतलेले
कितीतरी मुके निरोप
आणि परतीच्या वाटेवर
हरवलेली दोन मनं

आठवतेय ना?
पावसातली पहिली भेट

प्रेम कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य