काही क्षणिका - स्त्री

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
16 Jul 2016 - 4:47 pm

(१)

वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.

(२)

पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.

(३)

देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.

मुक्त कविताचारोळ्या

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

17 Jul 2016 - 1:21 am | जव्हेरगंज

वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.

हे काय पटलं नाही बुवा!

आणि बाकीची दोनतर समजलीच नाहीत :(

माहितगार's picture

17 Jul 2016 - 8:52 am | माहितगार

पहिल कडव तर्कात न बसणारं काहीही आहे. नंतरची कडवी सती उदात्तीकरण विरोधी कायद्याचे उल्लंघन करत नाहीत ना अशी प्रथमदर्शनी साशंकता वाटते आणि संपादकांनी ती वगळलेल बरी रहावीत.

विवेकपटाईत's picture

17 Jul 2016 - 11:24 am | विवेकपटाईत

माहितगार साहेब, राणी पद्मिनीची कथा ऐतिहासिक आहे, स्वत:चे सत्व वाचविण्यासाठी तिने अग्नीत उडी घेतली. अन्यथा पुरुषी वासनेला बळी पडली असती. त्या दृष्टीने पहा.

माहितगार's picture

17 Jul 2016 - 11:33 am | माहितगार

हा तुमच्या मनावर ठसलेला योनीशुचितेचा प्रभाव नाहीना हा वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. यात नाण्याची दुसरी बाजू जर जईवच पणाला लावायचा असेल तर स्त्री असली तरीही झाशीच्या राणीप्रमाणे रणांगणावर लावला जावयास हवा किंवा स्वतःस शक्य न झाल्यास जिवंत राहून पुढील पिढी कडून अपराध्यांना दंड होईल अथवा पुन्हा अशा गोष्टी न होणारी उचित व्यवस्था प्रस्थापित होईल यासाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले जावयास हवे. सती प्रथेचे उदात्तीकरण हा त्यासाठी उचित मार्ग नव्हे. सती प्रथेच्या उदात्तीकरणाचा मी निषेध करतो.

माहितगार's picture

17 Jul 2016 - 11:34 am | माहितगार

"जर जीवच पणाला लावायचा असेल तर.." असे वाचावे

झेन's picture

17 Jul 2016 - 11:15 am | झेन

या लेखका कडून अनपेक्षीत, कदाचीत स्रि स्वातंत्र्याचा हा अजून एक फंडा असावा.

माहितगार's picture

17 Jul 2016 - 11:35 am | माहितगार

स्वातंत्र्यासाठी झाशीच्या राणीप्रमाणे जीव रणांगणावर लावावयास हवा, योनीशुचितेसाठी जीव देऊन नव्हे.

माहितगार's picture

17 Jul 2016 - 12:40 pm | माहितगार

आदर्श छत्रपती राजारामांच्या पत्नी ताराबाईंचाही घेता येऊ शकतो जिने राजारामाच्या मृत्यूनंतर अत्यंत कठीण परिस्थितीत मराठी सैन्याचे नेतृत्व केले. तिने खरे स्वातंत्र्याचे रक्षण केले.

rani tarabai

पैसा's picture

17 Jul 2016 - 1:10 pm | पैसा

सतीचे उदात्तीकरण नको. इतिहासातील घटना आहे. इतिहासात राहू दे. आपल्याकडे स्त्रीबाबत दृष्टीकोनात दोन ठळक मतप्रवाह दिसतात, एक तर स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर. ते पवित्र ठेवायचा प्रयत्न करा. एखादी वस्तू आपल्या मालकीची रहात नसेल तर नाहिशी करून टाका. किंवा मग तिला देवी बनवा. राजस्थानात मीराबाईसारखी बंडखोर स्त्री होऊन गेली, तशी पद्मिनी ही जुन्या परंपरांचे प्रतीक म्हणावे अशी स्त्री तिथेच जन्मली. पद्मिनीबद्दलच्या सगळ्या कथा आताच्या दृष्टीने पाहता स्त्री ही मालकीची वस्तू समजून लिहिल्यासारख्या वाटतात. तेव्हाची परिस्थिती पाहता त्या लोकांना काय वाटत होते हे आपण आताच्या कसोट्या लावून चूक बरोबर ठरवू शकत नाही. इतिहास आहे तसा स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मग त्याचे उदात्तीकरण नको किंवा ते कलंक वाटून घेणेही नको.

महाराष्ट्रातही जिजाबाई, ताराबाई अशा तेजस्वी स्त्रिया झाल्या तशा पुतळाबाई, रमाबाई यासुद्धा त्याच काळात सती गेल्या. मात्र महाराष्ट्रात पुतळाबाई, रमाबाई यांच्यावर सतीत्वाचे गोडवे गाणार्‍या कथा कविता स्वतंत्रपणे रचल्या गेल्या नाहीत. याचे कारण राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या लोकांत विचारांमधे फरक होता हे आहे का? रजपूत कडवे लढवय्ये असले तरी राजस्थान बहुतांश दिल्लीश्वरांच्या गुलामगिरीत सुख मानण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचला होता. महाराष्ट्रात तसे वातावरण कधी तयार झाले नाही.

योनिशुचितेचा मुद्दा ठीक. पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल

माहितगार's picture

17 Jul 2016 - 1:20 pm | माहितगार

..पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल

भारतीय पौराणिक कथात दुर्गा आणि कालीच्या प्रतिकार प्रेरणा कथा येतात. अत्याचारी व्यक्ती सोबत जुलमाचा सहवास करावाच लागला तर स्वतःला पेटवण्याचा विचार करण्यापेक्षा अत्याचारी व्यक्तीस पेटवणे ऐतिहासिक काळातही शक्य असावे प्रश्न मानसिक बळाचा असावा.

जर अत्याचारी व्यक्ति अत्याचार करुन गेली आहे तर पुढच्या पिढीत एक ताराबाई एक शिवाजी घडवण्याचा विचार व्हावयास हवा. व्हिक्टीम ब्लेमींगमुळे लोकनिंदेचा प्रवाद येत असेल अथवा लोकनिंदेमुळे आत्मसन्मानाला धक्का लागत असेल तर योनीशुचितेच्या भ्रामक कल्पना व्यक्ति आणि समष्टीतून मुळासहीत उखडून टाकल्या जावयास हव्यात किंवा कसे.

पैसा's picture

17 Jul 2016 - 1:30 pm | पैसा

इतिहासाचे गोडवे गाण्यापेक्षा भविष्यात चुका कमी कशा करता येतील हे बघितले पाहिजे.

बलात्कारामुळे लोकनिंदेला घाबरून कोसळणार्‍या किती आणि स्वतःला नको असलेली गोष्ट दुसर्‍याचे बळ आपल्याहून अधिक ठरले म्हणून करणे भाग पडल्याच्या दु:खाने कोसळणार्‍या किती याचा अभ्यास व्हावा असे मात्र वाटते.