मी एकटी ....
एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही
परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही
रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?
बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
8 Sep 2016 - 4:12 pm | पैसा
साधी सोपी सरळ कविता
8 Sep 2016 - 4:21 pm | राजेंद्र देवी
धन्यवाद...
9 Sep 2016 - 6:12 pm | ज्योति अळवणी
सुंदर... आवडली
12 Sep 2016 - 11:18 am | राजेंद्र देवी
धन्यवाद...
12 Sep 2016 - 8:22 pm | एक एकटा एकटाच
आवडली
13 Sep 2016 - 7:57 am | राजेंद्र देवी
धन्यवाद....