सुखासन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Aug 2016 - 12:49 am

आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!

-शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकरुणवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमान

प्रतिक्रिया

एस's picture

12 Aug 2016 - 8:20 am | एस

लघुकाव्य आवडलं.

चांदणे संदीप's picture

12 Aug 2016 - 8:35 am | चांदणे संदीप

शॉर्ट ॲन्ड सुपर!

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2016 - 5:33 pm | अत्रुप्त आत्मा

+1

चाणक्य's picture

12 Aug 2016 - 8:42 am | चाणक्य

ब-याच दिवसांनी लिहीलंत.

तुमच्या कविता वाचण्याची संधी मी सहसा सोडत नाही पण ही कविता कळली नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Aug 2016 - 9:47 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त

जव्हेरगंज's picture

12 Aug 2016 - 9:57 am | जव्हेरगंज

भारी!!!

अंतरा आनंद's picture

12 Aug 2016 - 10:22 am | अंतरा आनंद

सुंदर. टोकाला पोचलेला एकाकीपणा आणि मनातून स्वतःला बंद करत जाणे या भावना चार ओळीतूनही ताकदीने व्यक्त झाल्यात.
अशीच हौशी पण आयुष्यातल्या अनुभवांनी पोळून एक्टी पडलेली, स्वतःला हळू हळू मिटून घेणारी जवळची व्यक्ती आठवली आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं.

शिव कन्या's picture

20 Aug 2016 - 2:11 pm | शिव कन्या

अंतरा ताई, भावना पोहचते ती कविता आणखी अर्थपूर्ण होते.
धन्यवाद.

अभ्या..'s picture

12 Aug 2016 - 10:33 am | अभ्या..

जबरदस्त,
किमान शब्दात कमाल परिणाम.

रातराणी's picture

12 Aug 2016 - 10:40 am | रातराणी

जबरदस्त!!

ज्योति अळवणी's picture

12 Aug 2016 - 3:40 pm | ज्योति अळवणी

छान आहे

अनुप ढेरे's picture

12 Aug 2016 - 5:52 pm | अनुप ढेरे

अप्रतिम!
सक्तीचं एकाकीपण आणि विरक्ती दोन्हीला लागू होतय.

पद्मावति's picture

20 Aug 2016 - 2:22 pm | पद्मावति

जबरदस्त.

झेन's picture

20 Aug 2016 - 5:25 pm | झेन

सहज सुंदर आणि कमी शब्दात नेमके सांगणारी रचना

इल्यूमिनाटस's picture

20 Aug 2016 - 6:13 pm | इल्यूमिनाटस

आवडली!

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 8:44 pm | किसन शिंदे

छिलून म्हणजे सोलून अशा अर्थाने आहे का? जर तोच अर्थ अभिप्रेत आहे तर छिलून हा हिंदी शब्द का?

बाकी थोडक्याच शब्दात खूप काही मांडलेलं आवडलं.

छिलले कि छिलके उडतात, अगदी रफली.
सोलले कि अखंड साल निघते.
.
पेन्सिल छिलतात.
केळे सोलतात.