*|| फक्त तू खचू नकोस ||*
एक डाव हरला तरी
त्यात काय एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
सूर्य रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने ...
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने ...
येणे जाणे रितच् इथली,
हे तू विसरु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
वाट तुझी बघत असतं,
रोजच कुणीतरी ...
तुझ्यासाठी जगत असतं ,
आस लावून प्रत्येक क्षणी ...
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
*फक्त तू खचु नकोस...
सामर्थ्य आहे हातात जर,
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल ...
विजय तुझाच असेल
तेव्हा मागे वळून बघु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
|| फक्त तू खचू नकोस ||
प्रतिक्रिया
20 Aug 2016 - 12:21 pm | Bhagyashri sati...
आवडली कविता आयुष्याचचं दर्शन होत कवितेतुन
20 Aug 2016 - 12:53 pm | माम्लेदारचा पन्खा
कायप्पावर फिरत असते सारखी !
20 Aug 2016 - 4:36 pm | सत्याचे प्रयोग
कायप्पावर आहे ही कविता , कवी तुम्ही का ??
20 Aug 2016 - 5:54 pm | एक एकटा एकटाच
कविता आवडली
25 Aug 2016 - 9:45 am | विवेकपटाईत
हि कविता पै.वैभव देवकर यांनी ४ जुलै त्यांच्या फेसबुक वर टाकली आहे. कविता वाचताना कवीचे नाव कळले पाहिजे हि अपेक्षा. जर त्यांनी तुमची कविता चोरली आहे तर त्यांना जाब विचारला पाहिजे निदान खर्या कवीचे नाव तरी कळले पाहिजे.
22 Sep 2016 - 11:32 am | बटाटा चिवडा
गहिवरून आलं हो, थांबवू नै शक्लो स्वतःला. :-P
●एक विडंबन●
|| फक्त तू गचकू नकोस ||
एक ग्लास भरला तरी
त्यात काय एवढं ..?
कुणीतरी झिंगलंच की
हे ही नसे थोड ...
पेग मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
मित्र रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने ...
रोज मावळतीला जातो बार ला
रोजच्याच् नेमाने ...
येणे जाणे पिणे रितच् इथली,
चकना खायला विसरु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी बार आहेत ...
तुझ्यासाठी ग्लास भरणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड पिऊन बघ ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
वाट तुझी बघत असतं,
रोजच कुणीतरी 'बसताना'...
तुझ्यासाठी पेग भरत असतं ,
ग्लास लावून प्रत्येक क्षणी ...
त्यांच्यासाठी तुलाही झिंगायचंय,
श्रावण तू पाळू नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
उठ आणि उघडून क्वाटर्र ,
पहा जरा ग्लासाकडे ...
प्रत्येकाच्या ग्लासात ,
काहीतरी ओत थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच चकना संपवत तू बसु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
स्कॉच आहे घरात जर,
थम्स अप थोडे घेऊन चल ...
स्टारटर्स असुदेत थोडे हाती,
दोन ग्लास भरत चल ...
ग्लास दुस-यांच्या हातात असेल
तेव्हा त्याकडे जळून बघु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
|| फक्त तू गचकू नकोस ||
22 Sep 2016 - 5:16 pm | बटाटा चिवडा
गहिवरून आलं हो, थांबवू नै शक्लो स्वतःला. :-P
●एक विडंबन●
|| फक्त तू गचकू नकोस ||
एक ग्लास भरला तरी
त्यात काय एवढं ..?
कुणीतरी झिंगलंच की
हे ही नसे थोड ...
पेग मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
मित्र रोजच उगवतो,
त्याच नव्या तेजाने ...
रोज मावळतीला जातो बार ला
रोजच्याच् नेमाने ...
येणे जाणे पिणे रितच् इथली,
चकना खायला विसरु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी बार आहेत ...
तुझ्यासाठी ग्लास भरणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड पिऊन बघ ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
वाट तुझी बघत असतं,
रोजच कुणीतरी 'बसताना'...
तुझ्यासाठी पेग भरत असतं ,
ग्लास लावून प्रत्येक क्षणी ...
त्यांच्यासाठी तुलाही झिंगायचंय,
श्रावण तू पाळू नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
उठ आणि उघडून क्वाटर्र ,
पहा जरा ग्लासाकडे ...
प्रत्येकाच्या ग्लासात ,
काहीतरी ओत थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच चकना संपवत तू बसु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
स्कॉच आहे घरात जर,
थम्स अप थोडे घेऊन चल ...
स्टारटर्स असुदेत थोडे हाती,
दोन ग्लास भरत चल ...
ग्लास दुस-यांच्या हातात असेल
तेव्हा त्याकडे जळून बघु नकोस ...
व्हिस्की खुप सुंदर आहे,
फक्त तू गचकू नकोस...
|| फक्त तू गचकू नकोस ||