मुक्त कविता

वेग...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
22 Oct 2016 - 9:25 am

वेग

मरण एवढे सोपे झाले
जगणे अवघड झाले आहे
आता यम एकटा नाही
जागोजागी त्याचे चेले आहे

म्हातारे कोतारे मरती
तरुण मरती रस्त्यावरती
मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते
लहानपणीच आयुष्य संपले आहे

सारे ओढवून धेतलेस तू मानवा
वेगाने तुला भारले आहे
आपल्याच भाऊबंदास
तू स्वतः मारले आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

जगलो आहे

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 8:20 am

जगलो आहे

मनसोक्त डुंबावेसे वाटले पण
काठावरतीच जगलो आहे

आख्खी भाकर तर सोडाच
चतकोर वाट्यातच जगलो आहे

नुसतेच पाहणे, वास कसला घेतो
गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे

गुरू त्यांचे प्रबळ होते
राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे

सुख एवढेच निखारे नव्हते
गरम फुफाट्यात जगलो आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

समेट....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
20 Oct 2016 - 8:22 am

समेट....

रम्य ती पहाट, शांत तो घाट,
चंद्रभागेचा हलकासा खळखळाट

गळा तुळसीमाळा, मुखी विलसतसे हास्य
रम्य तो आरतीचा थाट

गजबजला बघ हा चंद्रभागेचा घाट
कीर्तनी दंग पाहा ते भाट

युगानुयुगे उभा विठू माझा ताठ
धन्य ती पाउलिची वीट

आता कोठली वारी धरिली खाट
बोलाव माउली कर आता समेट

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

थोडे अंतर...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
19 Oct 2016 - 8:26 am

थोडे अंतर...

असावे तुझ्यामाझ्यात
थोडे अंतर
ठेवील ओढ ते निरंतर

असावा तुझ्यामाझ्यात
थोडा अबोला
संपेल तो मनवल्यानंतर

असावा तुझ्यामाझ्यात
थोडा गैरसमज
पडेल उमज समजल्यानंतर

असावा तुझ्यामाझ्यात
थोडा संशय
वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

अपहार...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
18 Oct 2016 - 8:15 am

अपहार...

तीर तुझा घुसला आरपार
घाल तूच फुंकर हळुवारं

झाले असतील घायाळ बहू
मीच झालो तुझी शिकार

झंकारल्या तारा हृदयिच्या
सांग कसा देऊ नकार

भ्रष्ट या दुनियेत झाला
माझ्या हृदयिचा अपहार

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

दिसत जावं माणसानं

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
17 Oct 2016 - 6:49 pm

हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही. मराठीत रूपांतर करताना एक कडवं अधिकचं जोडलं आहे.

दिसत जावं माणसानं
- © मंदार दिलीप जोशी
http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html

भावकवितामुक्त कवितावाङ्मयकविता

नशीब...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
17 Oct 2016 - 9:16 am

नशीब...

जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर

काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर

आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर

आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 10:49 am

आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-शिवकन्या

अनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकालगंगामुक्त कवितासांत्वनामांडणीवावरसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरराहती जागा

निसर्गाचं गाणं

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 8:21 am

निसर्गाचं गाणं

ओला घाट, नागमोडी वाट
केवड्याचे रान, घनदाट

केवड्याचे रान, सळसळते नागीण
वारा वाजवी सुमधुर बीन

ओले रान, ओले पान
ओंजळ छोटीसी, निसर्गाचे दान

कडेकपारीतून वाहती निर्झरांचे पाट
रानातून हुंदडे वारा पिसाट

विसरुनी भान, तुडवितो रान
ओठावरती फक्त निसर्गाचं गाणं

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

माझे स्वप्न...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
13 Oct 2016 - 9:57 am

माझे स्वप्न...

तुझी नाजुकता फुलात आहे
फुलाचा गंध तुझ्यात आहे

तुझी अवखळता पाण्यात आहे
पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे

तुझ्या रागाची धग आगीत आहे
आगीची तेजस्विता तुझ्यात आहे

तुझा अबोला वाऱ्यात आहे
वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे

तुझे अस्तित्व स्वप्न आहे
माझे स्वप्न तुझ्यात आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक