कुण्या गावचा कोण?
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे.
तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं.
कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात!
मी ही त्याच्याच सारखा 'सहज' ..,
म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात.
एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? "
मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे."
गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? "