हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही. मराठीत रूपांतर करताना एक कडवं अधिकचं जोडलं आहे.
दिसत जावं माणसानं
- © मंदार दिलीप जोशी
http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html
कालगतीच्या तीव्र प्रवाही
पोहत जावं त्वेषानं
क्षणभंगुर जीवनात या पण
दिसत जावं माणसानं
आठवणींचा साठा मोठा
क्षणात विस्कटू नये कधी
मैत्र जीवांचे होऊन हृदयी
बोलत जावं माणसानं
हसर्या चेहर्यांमागे काही
दु:ख मानसी बाळगती
हात घेऊन हाती मित्राचा
बसत जावं माणसानं
प्रत्येकाचे दु:ख वेगळे
विषाद निराळा असतो रे
मित्रांचंही जगणे थोडं
वाटून घ्यावं माणसानं
कोण कुठवर सोबत असतो
कोणा असते ठावूक ते
भेटण्याची कारणे नित्यनूतन
विणत जावी माणसानं
ओझरती कधी भेट घडावी
रंगवावी मैफिल कधी
कधी हाकेसरशी खिडकीत
दिसत जावं माणसानं
भेटीगाठीतून आठवणींचा
साठा ताजा ठेवावा
म्हणून म्हणतो उगाचच्या उगाच सुद्धा
दिसत जावं माणसानं
------------------------------
© मंदार दिलीप जोशी
http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html
अश्विन कृ. २, शके १९३८
------------------------------
मूळ हिंदी कविता:
मिलते जुलते रहा करो
धार वक़्त की बड़ी प्रबल है,
इसमें लय से बहा करो,
जीवन कितना क्षणभंगुर है,
मिलते जुलते रहा करो।
यादों की भरपूर पोटली,
क्षणभर में न बिखर जाए,
दोस्तों की अनकही कहानी,
तुम भी थोड़ी कहा करो।
हँसते चेहरों के पीछे भी,
दर्द भरा हो सकता है,
यही सोच मन में रखकर के,
हाथ दोस्त का गहा करो।
सबके अपने-अपने दुःख हैं,
अपनी-अपनी पीड़ा है,
यारों के संग थोड़े से दुःख,
मिलजुल कर के सहा करो।
किसका साथ कहाँ तक होगा,
कौन भला कह सकता है,
मिलने के कुछ नए बहाने,
रचते-बुनते रहा करो।
मिलने जुलने से कुछ यादें,
फिर ताज़ा हो उठती हैं,
इसीलिए यारों नाहक भी,
मिलते जुलते रहा करो।
- कवी अज्ञात
प्रतिक्रिया
17 Oct 2016 - 7:47 pm | कवि मानव
मस्त !!
18 Oct 2016 - 9:43 am | राजेंद्र देवी
मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता दोन्ही उत्तम...
18 Oct 2016 - 2:33 pm | नित्य नुतन
अप्रतिम ... अगदी मनातलं लिहिलंय