माझे स्वप्न...
तुझी नाजुकता फुलात आहे
फुलाचा गंध तुझ्यात आहे
तुझी अवखळता पाण्यात आहे
पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे
तुझ्या रागाची धग आगीत आहे
आगीची तेजस्विता तुझ्यात आहे
तुझा अबोला वाऱ्यात आहे
वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे
तुझे अस्तित्व स्वप्न आहे
माझे स्वप्न तुझ्यात आहे
राजेंद्र देवी