मुक्त कविता

एकदाच काय ते बोलून टाकू

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
7 Apr 2023 - 9:02 am

होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत. मी पुण्यात पूर्वी राहिलो असल्याने माझे संदर्भ आधीचे आहेत.

खूप झाले एफसीचे कट्टे आणि वैशालीचे दोसे
ते कॉफीत झुरन आणि मनात बोलणं
गुडलक मधे बसून स्वतःलाच बॅड लक म्हणणं
सारा राग मग पार्किंग नाही म्हणून काढणं
सार आता संपवून टाकू
तू हिंजवाडीला येते की मी कोथरुडला येऊ ते सांग
एकदाच काय ते मनातल सारं बोलून टाकू

जिलबीमाझी कवितामुक्त कविताकविता

पडघम

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Nov 2022 - 9:36 pm

अनाम तार्‍याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे

दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते

आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते

अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे

मुक्त कविताकविता

चारोळी विडंबन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
20 Nov 2022 - 11:42 pm

चहात इडली
चहात गुलाबजाम
चहात जिलेबी
आणि आमची चारोळी संपली

मुक्त कवितारतीबाच्या कविताविडम्बनचारोळ्या

काही लिहावयाचे आहे.......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
10 Nov 2022 - 9:24 am

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही
ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही

अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे
कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही

कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात
परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही

मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले
तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

प्रतीसाद भावनांना जीथे मिळणार नाही
तीथे मी उपेक्षितांचा धनी होणार नाही....

गणितमुक्त कवितामुक्तक

शहाळे...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
4 Nov 2022 - 6:48 pm

इथे शहाळे म्हणजे संसार आशी कल्पना केलीयं. वरवर कठीण पण आतमधे मधुर गोड पाणी आणी मलाईदार साय पण त्या आगोदर नियतीच्या कोयत्याचे घाव सहन करावे लागतात.

माहीत नाही जमलीय का नाही&#128528

वाटले असावे कुणी जवळचे
वेचण्या कवडसे उन्हाचे
भेटावे कुणीतरी असे....
ऐकण्या हितगुज मनाचे

स्वप्न चांदण्या रात्रीतले
कधी न मी पाहीले
भेटावा चंद्र कोजागिरीचा....
असे कधीही मला न वाटले

आयुष्यमुक्त कवितामुक्तक

योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
2 Nov 2022 - 12:43 pm

https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-d...

वजीर केला प्यादा

योगी आदित्यनाथांची सापशिडी
डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी

पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई
पोलीस डिएसपी स केला शिपाई

सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स
चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स

महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी
जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी

मुक्त कविताकविता

शहरातले गाव

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 Oct 2022 - 2:22 pm

रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात

त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो

- पाभे
२१/१०/२०२२

मुक्त कविताशांतरसकविताजीवनमानराहती जागा

लद्दाख

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2022 - 8:08 pm

भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी

रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी

रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी

(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

निसर्गमुक्त कवितामुक्तक

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक

मिपा कट्टा पुणे २०२२....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
17 Sep 2022 - 8:43 am

सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे

गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप

सारे रोजचे तरीही.....

पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला

गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......

दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत

सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....

festivalsआनंदकंद वृत्तमुक्त कवितामुक्तक