ते तुझ्याचपाशी होते
सळसळत्या झाडावरती
किलबिलणार्या पंखांनी
आणले नभातून जे जे
ते तुझ्याचपाशी होते
अर्थाचे अनवट कशिदे
विणणार्या चित्रखुणांना
जे जटिल असूनही कळले
ते तुझ्याचपाशी होते
तार्यांच्या मिथककथांचा
आकाशपाळणा अडता
जे पुरातनाला सुचले
ते तुझ्याचपाशी होते