रूटीनाचे गंजलेले
यंत्र अखंड घुमते
जुन्या व्रणावर रोज
नवी जखम करते
अनावर भोवंडून
शिणलेल्या प्राणासाठी
वाटेवरच्या झाडाची
साथ वाटे मला मोठी
त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
एक रंगीत पाखरू
झुले उंच फांदीवर
इवल्याश्या कंठातून
काढी तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी
प्रतिक्रिया
1 Feb 2021 - 5:41 pm | चांदणे संदीप
काय टोटल लागली नाय. पण ठीक.
सं - दी - प
1 Feb 2021 - 8:51 pm | Bhakti
त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
एक रंगीत पाखरू
झुले उंच फांदीवर
.. मस्त
रुटीन शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द छान वाटेल..रोजचाच ?
1 Feb 2021 - 9:55 pm | सरिता बांदेकर
रूटीन म्हणजे नित्यक्रम
कविता छान आहे
2 Feb 2021 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार
रूटीनाचे गंजलेले
यंत्र अखंड घुमते
कोणते बरे गंजके यंत्र असेल असे जे अखंड घुमत असते?
हे समजले की बाकी कविता समजायला कठीण नाही.
आवडली,
पैजारबुवा,
2 Feb 2021 - 11:38 am | अनन्त्_यात्री
नित्यक्रम कितीही कंटाळवाणा अन् यांत्रिक (गंजलेला व यंत्रवत) असला तरी तो अखंड चालू ठेवावाच लागतो यातून येणार्या वैफल्याला रूटीनाचे अखंड गंजके यंत्र ...
5 Feb 2021 - 12:43 pm | टवाळ कार्टा
माऊली, "हाक निसर्गाची येता" यासाठी खच्चून कच्चामाल तयार आहे =))
6 Feb 2021 - 4:40 pm | अनन्त्_यात्री
इडंबन तुमीच लिवा नं भौ