सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Oct 2020 - 8:25 am

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं..

सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता?
झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता?
काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता??
मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता?
म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर!
व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो,
तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं.
आणि online दिसूनही blue tick न दिसणं,
काय सांगू? लईलईच जड असतं..
Hmm, ok , yes no यापुढे गोष्ट जाते
J1 झालं का ला केव्हाच bypass करते..
काहीतरी वेडं फुलतं, त्याला काही name नसतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.

मोठ्ठा बदाम पोस्टूनसुद्धा प्रेम करता येतं,
Hi Gm म्हणून सुद्धा प्रेम करता येतं,
स्टेटस वरचा पहिला view म्हणजेसुद्धा प्रेम असतं,
Story वरचा पहिला comment म्हणजेसुद्धा प्रेम असतं.
Reply न करता गप्प रहाणं म्हणजे प्रेम असतं,
Dp बदलून त्रास देणं हेदेखील प्रेम असतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदीअगदी सेम असतं...

पाडगाकरांची माफी मागून...

मुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Oct 2020 - 9:05 am | प्रचेतस

क्या बात है, एकदम झक्कास..!

Bhakti's picture

1 Oct 2020 - 9:42 am | Bhakti

मस्तच
काहीतरी वेडं फुलतं, त्याला काही name नसतं..
.
वेडाला या नाव नकोच,धागे जुळले म्हणून​ मन झुरत
फुललेला फुलोरा,उगाच बडबड कुठलस मौन तोडत !

..भारी ओ

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 11:14 am | प्राची अश्विनी

वाह!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Oct 2020 - 10:38 am | ज्ञानोबाचे पैजार

झकास... आवडले अधुनिक प्रेमायण,
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2020 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता लैच आवडली, म्हणजे थेट भिडलीच म्हणा ना...! बाकी, सारखं डीपी आणि स्टेटस पाहणारे दोन मित्र आठवले. सारखं एकमेकांना अपडेट्स देत असतात ते आठवलं.

बाकी, आमची एक आठवण लैच तान द्यायची. लाष्ट सीन तुझं तर यव होतं आणि त्यंव होतं. मेसेज रीड होता.
रिप्लाय द्यायला वेळ नव्हता वाटतं. लैच काम असतं वाटतं. अरारा, लै तान असतो तो....आता लाष्ट सीन तीन-चार महिन्यापूर्वीचं दिसतं अशी सोय करुन घेतली आहे. असो. सज्जन माणसांना तान असतातच म्हणा.

फक्त त्यांचं आणि आमचं सेम असतं म्हणून सहन करणे आहे.

-दिलीप बिरुटे
(आठवणीकार)

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 11:07 am | प्राची अश्विनी

डायरेक्ट तीन चार महिन्यांंपूर्वीचं???
ती सोय कशी करतात हो???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2020 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थर्डपार्टी अ‍ॅपने हे सर्व करता येते. समजा आत्ता लाष्टसीन ऑफ केलं की ते आजचीवेळ दाखवतं. मग पुढे बंद..... पण, आपलं जसं लास्ट सीन दिसत नै तसं दुस-याचंही पाहता येत नाही. दुसरा कधी ऑनलाइन येतो जातो ते बघायचं असेल तर आपलंही लाष्टसीन सुरु करावे लागते.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 12:14 pm | प्राची अश्विनी

रच्याकने एक मोठ्ठी चूक झालीय कवितेत.
सासं , ते बावनखणी ऐवजी बावनकशी कराल का plz?
:)

चलत मुसाफिर's picture

1 Oct 2020 - 12:18 pm | चलत मुसाफिर

मी डोकं खाजवतच होतो, की बावनखणी रत्न म्हणजे नक्की काय अर्थ होत असेल! :-)

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 12:30 pm | प्राची अश्विनी

:)

गोंधळी's picture

1 Oct 2020 - 6:14 pm | गोंधळी

प्ण 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'! साठी ठेवायला हवी होती.

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 7:14 pm | प्राची अश्विनी

फेसबुकवर मागे टाकली होती त्यामुळे विशेषांकात देता आली नसती.

वीणा३'s picture

1 Oct 2020 - 7:18 pm | वीणा३

सुंदर, मस्तच :)

टवाळ कार्टा's picture

2 Oct 2020 - 9:22 pm | टवाळ कार्टा

=))

प्राची अश्विनी's picture

6 Oct 2020 - 5:20 pm | प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद!

अभिजीत अवलिया's picture

11 Oct 2020 - 6:17 am | अभिजीत अवलिया

आधुनिक प्रेमकविता आवडली.

स्मिताके's picture

16 Oct 2020 - 10:54 pm | स्मिताके

मस्त आहे कविता.

बबन ताम्बे's picture

17 Oct 2020 - 9:31 pm | बबन ताम्बे

आवडली कविता !

भारी लिहिलंय..
आवडली कविता

प्राची अश्विनी's picture

29 Oct 2020 - 8:11 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सगळ्यांंना!

Jayant Naik's picture

29 Oct 2020 - 3:43 pm | Jayant Naik

एकदम मस्त कविता .आवडली

Jayant Naik's picture

29 Oct 2020 - 3:43 pm | Jayant Naik

एकदम मस्त कविता .आवडली

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 1:18 pm | Jayagandha Bhat...

मस्त कविता..!!

केदार पाटणकर's picture

23 Nov 2020 - 12:04 pm | केदार पाटणकर

मस्त झाली आहे.

प्राची अश्विनी's picture

25 Nov 2020 - 1:17 pm | प्राची अश्विनी

Jayant naik, jayagandha आणि केदार, धन्यवाद!

rushikapse165's picture

28 Nov 2020 - 12:28 pm | rushikapse165

एकदमच भारी!