पाऊस-कविता झाली पाडून

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Jul 2024 - 12:51 pm

पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले

जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा

दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी

"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)

कविता माझीकाहीच्या काही कवितामुक्त कवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

19 Jul 2024 - 11:35 pm | प्रसाद गोडबोले

सांग कधी का पाहीन मी? :)

जमतंय जमतंय , प्रयत्न करत रहा. प्रगती आहेच . हीच कविता बघा , काहीही ओढुन ताणुन अगम्य शब्द नाहीत. सरळ सोप्पं . मुक्त छंदच असला असला तरी थोडंफार यमक्या तरी आहे , हे उत्तम !

प्रयत्न करत रव्हा, अभ्यास करत राहा, जेव्हा थातुरमातुर स्वैरछंदी , यमकी , बोजड शब्दांच्या बाष्कळतेतुन बाहेर पडुन काहीतरी सघन , वृत्तबध्द , गेय , आणि मुख्य म्हणजे रसात्मक असं काहीसं सुचेल तेव्हा मजा येईल खरी!

कोंबडीने अंडी देत राहावे, आता त्याचे आमलेट करायचे की भुर्जी हे सर्वस्वी वाचकांच्या हातात ! #स्वांत:सुखाय

अगदी साध्या शब्दात लिहिलेली, बरेच काही सांगून जाणारी सुरेख कविता आवडली.

तुझ्या थुंकीहूनही कोरडे आहेत आमचे शब्द क्षमस्व,
हे जर्जर माणसा तुझ्या भूकेपुढे कंगाल आहेत आमचे शब्द.

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या
मोडून पडाल.......

कापऱ्या हातांनी लिहीले तोतरे
मुके शब्द शब्द बधीर बहिरे
थोडेसे गगन कडू आणि काळे
अर्धेच औषध घशात राहिले
सनईचे सूर तीक्ष्ण पर्णोपर्णी
विळखा घालून डंख देती मनी
उलट्या पायांनी पिशाच्च चालते
ठिगळे जोडीत आसवे ढाळीते
मरणाचा अर्थ तोकडा मिळतो
कातर वेळेला घर लुबाडतो.......

शब्दांचे बोट धरून निघालेल्या
प्रत्येकाला
लागू नये एकाच अर्थाचे गाव

---------------चिंं. त्र्यंं. खानोलकर

कर्नलतपस्वी's picture

21 Jul 2024 - 11:13 am | कर्नलतपस्वी

मिटर बदलू नका. कवीता साधी सुधी असेल तर वाचून सोडून देतात पण डोक्यात, मनात वादळ उठवणारी कवीता बरेच वेळा वाचली जाते व विचार मंथन करताना नवीन विचार सुचवून जाते.

अनन्त्_यात्री's picture

21 Jul 2024 - 4:12 pm | अनन्त्_यात्री

नीटसा समजला नाही.

अनन्त्_यात्री's picture

21 Jul 2024 - 4:09 pm | अनन्त्_यात्री

यापूर्वी कधी वाचले नव्हते.

कुठून तरी वाचली आणि संग्रही ठेवली होती.
कुणीही का लिहिलेली असेना. मला अगदी भावलेली.