अरण्यऋषीचं वनोपनिषद

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
15 Jun 2024 - 12:54 pm

'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं'
'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन'
'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी'
'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी
'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून
'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन
'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन'
'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन
'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं
'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं
'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी
अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली...

#चक्कर_बंडा

रूढार्थाने ही कविता नाही तर एक प्रयोग आहे आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या सर्व प्रकाशित तथा आगामी कलाकृती शब्दांत गुंफण्याचा व त्यातून ही काही अर्थपुर्ण सापडलंच तर तो बोनस ....

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

15 Jun 2024 - 5:35 pm | चित्रगुप्त

या कवितेवर 'रमलप्रतिमा' बनवून बघितल्यावर खालील चार चित्रे आली:
.

.

.

.

माहितगार's picture

16 Jun 2024 - 9:02 am | माहितगार

चक्कर बंडा तुमच्या प्रयोगानी सुरेख बोनस फुल्ल मध्ये दिलाय. ज्यांना मारुती चितमपल्लीं अजून वाचणे झाले नाही त्यांनासुद्धा वाचावे वाटतील असा सुरेख काव्यात्मक परिचय करून दिलाय तुम्ही.

@ चित्रगुप्त, चित्रे सुरेख आलीत, तुम्ही प्रॉम्प्ट इंगजीत दिलेत की मराठीत देऊन जमले? दुसरे तर चित्रातील आहे त्याच अरण्यऋषीची चेहरेपट्टी मारुती चितमपल्लींशी अधिक मिळती जुळती करता येऊ शकेल का असा एक प्रश्न मनात एयून गेला.

माहितगार's picture

16 Jun 2024 - 9:03 am | माहितगार

* असा एक प्रश्न मनात येऊन गेला.

चक्कर_बंडा's picture

16 Jun 2024 - 1:42 pm | चक्कर_बंडा

पहिली आणि तिसरी रमलप्रतिमा विशेष.. तुमच्या या नव्या उद्योगाला मनापासुन शुभेच्छा !

कविता गूगल ट्रान्सलेटवर चोप्यपस्ते करुन आयडियोग्रामवर चढवली. स्वतःची बुद्धी फक्त एवढेच करण्यात लावली.