सांत्वना

निघताना....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2018 - 5:02 pm

मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....

आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण

मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे

सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुणमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवास

काळाची उबळ

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Nov 2017 - 1:18 pm

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !

खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,

जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत

तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालनागपुरी तडकाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितासांत्वनाअद्भुतरससंस्कृती

अत्तर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती

विद्यार्थ्यांनो...

पुंबा's picture
पुंबा in जे न देखे रवी...
6 Sep 2017 - 1:15 pm

देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत,
त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत.
त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा.
जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य,
तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा.
तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका,
आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा.
देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा.

सांत्वनासमाज

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Apr 2017 - 11:26 pm

(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २)

अरे डिअरपिअर कशास बघतोस
स्वप्नात जुई... खोटे नाही सांगत
जुईले आणि मॅकबेथले...
काळाची उधई गिळी टाकई!

संध्याकाळच्या दिवा लावण्या
आधी तुझा विग काढून
टकल्यावरून हात फिरव
फ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा
आणि कायप्पावर पोस्ट
करण्याचा जमाना आला
आणि तू(म्ही) अजूनही उधई
ने गिळलेल्या मॅकबेथपुशित
रमलेला आजच्या रमेला
गमत नाही.

इशाराकालगंगाकाहीच्या काही कविताकोडाईकनालफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीसांत्वनामुक्तकविडंबन

( वरपरीक्षा )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
31 Mar 2017 - 11:54 pm
mango curryअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीइशाराकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडछावाजिलबीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीसांत्वनाहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसधोरणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयमुक्तकविडंबनशब्दक्रीडासमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजा

(बंदीपायी जीवा लागलीसे वाट)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
12 Dec 2016 - 4:37 pm

बंदीपायी जीवा लागलीसे वाट।
उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।।

गणिताचा तास विना झंडू बाम।
तैसे एटीएम डोकेदुखी।।

खिसा खुळखुळा जीव कासावीस।
झालो कॅशलेस आपोआप।।

भोगतोय भक्त परी हर्ष करी।
नोट आहे भारी गुलाबी जी।।

स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट।
भाजपाला वोट देत नाही।।

- स्वामी संकेतानंद

अनर्थशास्त्रसांत्वनाविडंबन

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Nov 2016 - 12:46 pm

['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]

पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणकालगंगाभावकवितामुक्त कवितासांत्वनाशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोल

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 10:49 am

आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-शिवकन्या

अनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकालगंगामुक्त कवितासांत्वनामांडणीवावरसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरराहती जागा

अनाठाई

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
25 Sep 2016 - 7:00 pm

निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली
कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली

अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो
दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो

बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे
आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने

उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा
चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा

विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड
जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड

तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी
ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

कविता माझीसांत्वनाहे ठिकाणकविता