पिल्लु
इवल्याशा डोळ्यातला
भाव तो काय ?
नभातल्या चांदण्याचा
गाव तो हाय
पायातल्या छुमछुमचा
नाद तो काय ?
आनंदाच्या लहरीचा
ठेका तो हाय
बोबड्या भाषेतले
बोल ते काय ?
चिऊच्या घरट्यातले
हे पिल्लु हाय
गोबर्या गालातले
हास्य ते काय ?
बाबांच्या पप्पीचे
हे कारण हाय.
- शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५