"चिडकी चिऊताई -" (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
20 Mar 2014 - 2:12 pm

खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -

चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -

बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -

बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .

.

बालसाहित्यबालगीत

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Mar 2014 - 2:48 pm | आयुर्हित

खूप छान आहे हि कविता.
याही क्षेत्रात नवीन करण्यासारखे खूप सारे आहे.
लगे रहो.....!

भिंगरी's picture

15 Dec 2014 - 10:37 am | भिंगरी

निष्पाप चिऊताईही लाडू नाही मिळाला तर चिडते,
मग आमच्या खादाड मंत्र्यांना काही मिळाले नाही तर ते थयथयाट करणारच की सत्ताधार्यांविरुद्ध

मदनबाण's picture

16 Dec 2014 - 2:03 pm | मदनबाण

आवडली... :)
मध्यंतरी या काळातल्या चिऊ काऊ चा संवाद वाचला होत :-
काऊ :- ए चिऊ ए चिऊ
चिऊ :- काय रे काऊ ?
काऊ :- येउ का घरात ?
चिऊ :- नको... हे घरात आहेत आज. :D

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise