चांदोबाचा दिवा- (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
20 Jun 2014 - 11:42 pm

'
आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..

आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..
.

बालसाहित्यबालगीत

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

21 Jun 2014 - 12:15 am | कानडाऊ योगेशु

छान,सुंदर,निरागस बालकविता.आवडेश!

कवितानागेश's picture

21 Jun 2014 - 12:45 am | कवितानागेश

छान कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2014 - 8:30 am | अत्रुप्त आत्मा

+१ मस्स्स्स्त! *i-m_so_happy*

एस's picture

21 Jun 2014 - 11:08 am | एस

निरागसतेचा चांदोबा आजच्या काळात हरवत चाललाय, नाही?

विदेश's picture

21 Jun 2014 - 11:51 am | विदेश

कानडाऊ योगेशु,
लीमाउजेट,
अत्रुप्त आत्मा,
स्वॅप्स.....

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

आतिवास's picture

21 Jun 2014 - 11:56 am | आतिवास

कविता आवडली.

पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)

दॅटस द पॉइंट!
संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे.

थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!

विदेश's picture

21 Jun 2014 - 2:52 pm | विदेश

आतिवास,
संजय क्षीरसागर ..

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2014 - 4:04 pm | संजय क्षीरसागर

संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.

पैसा's picture

21 Jun 2014 - 4:46 pm | पैसा

खूप छान!

म्हैस's picture

23 Jun 2014 - 4:43 pm | म्हैस

twinkle twinkle little star चा मराठी version .