बालसाहित्य

चित्रकार पिंटू [बालकविता]

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 May 2015 - 12:43 pm

आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..

जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान ..

भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..

मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..

झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..

इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे
सिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..

मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..

चित्र रंगवताना डोलावतो मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..

बालसाहित्यबालगीत

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
22 May 2015 - 3:35 pm

दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु

काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल

नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा

तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्

अभंगबालसाहित्यभूछत्रीसांत्वनाइतिहासवाङ्मयबालकथा

सुट्टी म्हणजे -[बालकविता]

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 May 2015 - 2:03 pm

सुट्टी म्हणजे नुसती धमाल
पर्यटनाची भलती कमाल ..

गडावर जाऊ शिकू इतिहास
भुगोलातले प्रदेश खास ..

बसू घरात ऊन असल्यावर
पत्ते क्यारम गार फरशीवर ..

टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी
डोरेमोन भीम बीनची मस्करी ..

अधूनमधून भेंड्या नि गाणी
आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..

पुस्तकं वाचू खूप छान छान
माहितीची करू देवाणघेवाण ..

संध्याकाळी खेळू बागेत खेळ
खेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..

सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे
अभ्यासाशी गट्टी फू करणे ..
.

बालसाहित्यबालगीतमौजमजा

छोटू सरदार- (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
14 May 2015 - 11:55 pm

कमरेला लटकावत तलवार
ऐटीत फिरे छोटू सरदार ..

समोर दिसता माशा झुरळे
म्यानातून निघे तलवार ..

सपासप होती हवेत वार
माशा झुरळे मरती चार ..

हा हा हसे छोटू सरदार
कौतुक करी सारे घरदार ..

"भो भो" आवाज येता कानी
गडबडतसे छोटू सरदार ..

फेकुन देत हातची तलवार
आईच्या पदराआड पसार ..
.

बालसाहित्यबालगीतमौजमजा

(सई)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 May 2015 - 3:03 pm

जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते.

मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही.

आरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीधर्मपाकक्रियाइतिहाससुभाषितेकृष्णमुर्तीशिक्षणछायाचित्रणस्थिरचित्र

पप्पू माझा लेकुरवाळा

लॉर्ड फॉकलन्ड's picture
लॉर्ड फॉकलन्ड in जे न देखे रवी...
17 Apr 2015 - 12:57 pm

'विठू माझा लेकुरवाळा' या गीताच्या चालीत खालील गीत सावकाश गुणगुणावे.
_____________________________________________________

पप्पू माझा लेकुरवाळा
संगे खांग्रेसींचा मेळा

दिग्गीराजा खांद्यावरी
खुर्शिदाचा हात धरी
पुढे चाले राज बब्बर
मागे नगमा ही सुंदर

कपिल आहे मांडीवरी
अंबिका, गिरीजा बरोबरी
अहमद आहे कडेवरी
शीला करांगुली धरी

रे़णुका म्हणे राहुला
करी खांग्रेसीं‍चा सोहळा

काहीच्या काही कविताबालसाहित्यहास्यबालगीतविडंबन

किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ

लॉर्ड फॉकलन्ड's picture
लॉर्ड फॉकलन्ड in जे न देखे रवी...
16 Apr 2015 - 1:29 pm

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला

द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले
पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून
शपथविधीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला
कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती
लपूनछपून, परदेशी जावून
सांजसकाळी अभ्यास केला

बालसाहित्यविडंबन

पुरुशाचे अस्तित्व...!

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
13 Apr 2015 - 6:07 pm

एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या.

काहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडबालसाहित्यसांत्वनाकवितामुक्तकविडंबन

स्मायली जीवन माझे

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Apr 2015 - 7:20 pm

स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

आरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्रीसंस्कृतीपाकक्रियाकविताप्रेमकाव्यबालगीतविडंबनउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडाऔषधोपचारभूगोलकृष्णमुर्ती

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 12:01 pm

आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली.

त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

पुरुषांची बाजू मांडण्याचा केलेला हा केविलवाणा खाटाटोप म्हणाना....

प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता ||धृ||

अभय-गझलआरोग्यदायी पाककृतीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनविराणीसांत्वनावीररसपाकक्रियाकविताउखाणेजीवनमानऔषधोपचारगुंतवणूककृष्णमुर्तीशिक्षण