✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रक्तदाब!

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 01/03/2015 - 09:21
एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब! उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर! आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) ) उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो. पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) ) उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही! पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही! उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत.. पण हुच्चवाली..??? हास्पिटलात्,आय-सी-यूत ताटकळत रहातात. साध्यांना मरण सरळ येतं,सरळांना साधं येत नसलं..तर उच्चतम येत..डायरेक्ट क्रांतिकारकां सारखं! हुच्चवाद्यांना त्यांचा रक्तदाब आयुष्यभर,अगदी होण्या आधीपासूनंही मारत असतो,प्रत्यक्ष मरणाचे तर बोलावयालाच नको! मग मनात येतं.. हुच्चवाले,ही वांझोटी तडफड का बरं करत रहातात आयुष्यभर जगण्याची? साध्यांसारखे साधे राहिले,तर त्याच साधेपणाने उच्चतमं पातळी गाठू,हे सहजमूल्य का बरं प्रवेशत नाही ,यांच्या आयुष्यात? उच्चवाल्यांना झालाच तर हा चाळिशीत होतो,आणि साठीपर्यंत छळणार्‍या खौट मित्रासारखा सोबत करतो..(नंतर पोहोचवायलाही येतो..! ;-) ) पण हुच्चवाद्यांना..आपलं.. ते हे...वाल्यांना??? आधी...तो आहे,हे कळत नाही,आणि कळल्यावर "अता जाइल" . आपण किंवा तो..कोणिही!!!,याचं(च) वाइट वाटतं.. कारण पोहोचवायला याच्या सकट सगळे येतात,पण निरोप कोणिच देत नाही. पण परत विचार केला..आपल्याही रक्तदाब आहे,आणि तो वाढेल असं वागायला परवानगी पण नाही आता आपल्याला! मग,सोडून देऊ ज्याचा त्याचा रक्त-दाब्,ज्याचा त्याच्यापाशी! किमान आजच्या दिवस तरी आपला रक्तदाब नियंत्रित राहिल..(आपल्याचपाशी... ;-) ) नाही का? ============================== आपला:- रक्त दाबावर-चाल्लेला ~ अतृप्त

प्रतिक्रिया द्या
8345 वाचन

💬 प्रतिसाद (24)

काव्यरस:

स्पंदना
Sat, 01/03/2015 - 11:28 नवीन
काव्यरस: आरोग्यदायी पाककृती गरम पाण्याचे कुंड बालसाहित्य अद्भुतरस *new_russian* \m/ \M/
  • Log in or register to post comments

गम्मत जम्मत केल्ये हो!

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/03/2015 - 13:50 नवीन
गम्मत जम्मत केल्ये हो! :-D वाचा आणि सोडुन द्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

गाडी आता मिरज पंढरपूर

कंजूस
Sat, 01/03/2015 - 13:12 नवीन
गाडी आता मिरज पंढरपूर मार्गावरून कुर्डुवाडी सोलापूरकडे चाललीय का ?अगा पांडुरंगा !
  • Log in or register to post comments

@मिरज पंढरपूर मार्गावरून

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/03/2015 - 17:44 नवीन
@मिरज पंढरपूर मार्गावरून कुर्डुवाडी सोलापूरकडे चाललीय का?>> :D नाही कंजूस काका, ही वाट तर चोराच्या आळंदिची! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी हुच्च की उच्च ?

खटपट्या
Sat, 01/03/2015 - 13:36 नवीन
मी हुच्च की उच्च ?
  • Log in or register to post comments

(No subject)

विशाल कुलकर्णी
Sat, 01/03/2015 - 15:56 नवीन
:D
  • Log in or register to post comments

याच्यावर "फक्तदाब" असे विडंबन

टवाळ कार्टा
Sat, 01/03/2015 - 20:06 नवीन
याच्यावर "फक्तदाब" असे विडंबन लिहिण्याचा कॉपिराईट घेऊन ठेवत आहे...तस्मात कोणीही "फक्तदाब" अथवा त्याच्या अनुशंगाने डोक्यात येणारे विचार ;) यावर विडंबन करू/पाडू :D नये अशी विषेश विनंती तसेच आजकाल विडंबनामुळेसुध्धा काही मिपाकरांच्या "भावना दुखावल्या जात आहेत" त्यामुळे ज्यांना ज्यांना "फक्तदाब" वाचायची असेल त्यांनी मला व्यनी करुन कळवावे...विडंबन तयार होताच व्यनीतूनच पाठवले जाईल अवांतर - वरील विनंतीस गुर्जी अथवा गुर्जींचा वशीला घेउन येणारे अथवा गुर्जींच्या कंपूतले अपवाद असतील (कंपूतल्यांनी "कंपूच्या सदस्यत्वाचा पुरावा स्वतः द्यावा" :) )
  • Log in or register to post comments

ताम्रपात्रातील 'फक्तदाब'

सस्नेह
Sat, 01/03/2015 - 22:14 नवीन
ताम्रपात्रातील 'फक्तदाब' पुरेसा सक्षम होऊन पाकचक्रिका 'सुलभ' होण्यासाठी शुभेच्छा *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाही ....हे "तसले" विडंबन

टवाळ कार्टा
Sun, 01/04/2015 - 00:48 नवीन
नाही ....हे "तसले" विडंबन नस्णारै :P हे खास "पुरुष" विभागासाठी लिहायचा विचार चालू आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ट.का.. आगदी हाच "फक्तदाब"

हाडक्या
Tue, 01/06/2015 - 16:05 नवीन
ट.का.. आगदी हाच "फक्तदाब" विडंबन विचार आमच्या मनी आला तोच तुमचा पर्तिसाद पाह्यला .. णिशेध..! णिशेध..!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बादवे "फक्तदाब" व्यनि करा हो.

हाडक्या
Tue, 01/06/2015 - 16:06 नवीन
बादवे "फक्तदाब" व्यनि करा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

मला पण एक कॉपी पाठवा तयार

सौंदाळा
Tue, 01/06/2015 - 16:17 नवीन
मला पण एक कॉपी पाठवा तयार झाली की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

वशाडी येवो.

सूड
Tue, 01/06/2015 - 16:10 नवीन
वशाडी येवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुजी बायल पन तुका ह्याच

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 09:37 नवीन
तुजी बायल पन तुका ह्याच म्हणतली :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आग्गाग्गाग्गाग्गाग्गा !!!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/07/2015 - 10:08 नवीन
=))))) आग्गाग्गाग्गाग्गाग्गा !!! =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अतिशय सुरेख कविता

प्रचेतस
Tue, 01/06/2015 - 16:36 नवीन
अतिशय सुरेख कविता
  • Log in or register to post comments

ओ बुवा

पैसा
Tue, 01/06/2015 - 23:09 नवीन
तुमचा रक्तदाब कशानी वाढला पण?
  • Log in or register to post comments

छळ!!!! दू.....दू.... छळ!

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/06/2015 - 23:34 नवीन
छळ!!!! दू.....दू.... छळ!!!! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोण आहेत हे छळवादी म्हणे?

प्रचेतस
Tue, 01/06/2015 - 23:35 नवीन
कोण आहेत हे छळवादी म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिपा प्रसिद्ध म्हण:-

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/06/2015 - 23:47 नवीन
मिपा प्रसिद्ध म्हण:- आगोबाच्या उलट्या बोंबा! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

च्यायला

बॅटमॅन
Wed, 01/07/2015 - 00:56 नवीन
च्यायला =)) तदुपरि, "फक्तदाब" या एका शब्दप्रयोगात अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले पाहून कसं सगळीकडं संक्लिद्य संक्लिद्य झालं. =))
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 09:37 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

या निमित्ताने "दिस चार झाले

सतिश गावडे
Wed, 01/07/2015 - 14:25 नवीन
या निमित्ताने "दिस चार झाले मन संक्लिद्य होऊन" हे गाणे आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/07/2015 - 17:55 नवीन
@अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले पाहून कसं सगळीकडं संक्लिद्य संक्लिद्य झालं> Image removed. अरे..हल'कट खाटुका! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा