उडता पंजाब....
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.