प्रवास
बस मी आणि बाळ
बसमध्ये धक्के खात उभा होतो
आसनस्थ होण्याचा मार्ग शोधत होतो
आसनस्थ झाल्यावर खिडकी शोधु लागलो
प्रवासात या अपेक्ष्ांचे सामानही बाळगलो
सगळ मिळवुनही धक्के लागतच होते
सवयीप्रमाणे डोळे सर्वत्र फिरत होते
समोरच्या सिटवर बाळाला हसताना पाहिले
पण हसण्याचे कारण नाही गवसले
अपेक्ष्ांचे सामान त्याच्यासोबत दिसले नाही
म्हणुनच हसण्याला कारणही लागले नाही
पुढच्या प्रवासातही धक्के बरेच बसले
पण गालावरचे हसु तसेच राहिले.
अंगोर वाट, कंबोडिया
आजच (गुरवार २६ फेब्रुवारी) मी सिएम रीप (अंगोर वाट, कंबोडिया ) येथे पाच दिवसासाठी पर्यटक म्हणून आलो आहे. सुदैवाने मागील आठवड्यातच पुण्याला श्री उदयन इंदुलकर यांचे कंबोडियातील मंदिरे या विषयावर एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यात बरीच माहिती मिळाली. मीपावर या विषयावर अधिक माहिती उपलब्ध असल्यास सूज्ञ सभासदांनी त्याबद्दलचे दुवे (links) दयावे हि विनंती.
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4
जम्मू श्रीनगर बस प्रवास
1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा...
‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा... लोकांच्या बेशिस्तपणामुळं अत्यावश्यक आणि चांगल्या सोयीसुविधांचा सुद्धा कसा फज्जा उडतो त्याचा धडधडीत पुरावा होता!....
गुस्ताव
तीन साडेतीन वर्षांपूर्वीची एक प्रसन्न शनिवार सकाळ कोपेनहेगन ते स्टोकहोम फ्लाईट आणि मला शेवटून दुसर्या रांगेतली मधली सीट. डाव्या बाजूच्या खिडकीजवळ एक रागीट चेहेर्याचा मिशीवाला आणि उजवीकडे एक साठीतली मावशी ... गुड मोर्निंग वगैरे करून स्थानापन्न झालो..यथासमय विमान हलले आणि कुणीतरी मला हळूच टपलीत मारल्या सारखे वाटले .. भास असेल म्हणून दुर्लक्ष करून मी खिडकी बाहेर बघू लागलो .. विमान रनवे वर धावू लागले आणि पुन्हा एक हलकेच टपलीत ..
PMPL ने प्रवास का करावा?
PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे :
१. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू
२. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो
आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल :
The most dangerous eight seconds of the sports !
मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.