आजच (गुरवार २६ फेब्रुवारी) मी सिएम रीप (अंगोर वाट, कंबोडिया ) येथे पाच दिवसासाठी पर्यटक म्हणून आलो आहे. सुदैवाने मागील आठवड्यातच पुण्याला श्री उदयन इंदुलकर यांचे कंबोडियातील मंदिरे या विषयावर एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यात बरीच माहिती मिळाली. मीपावर या विषयावर अधिक माहिती उपलब्ध असल्यास सूज्ञ सभासदांनी त्याबद्दलचे दुवे (links) दयावे हि विनंती.
प्रतिक्रिया
26 Feb 2015 - 9:56 pm | प्रचेतस
http://www.misalpav.com/node/27096
इस्पीकचा एक्का यांनी कंबोडियातील भटकंतीवर विपुल आणि अतिशय सुरेख लेखन केले आहे.
उपरोक्त दुव्यात लेखमालेचे सुरुवातीपासूनचे दुवेही समाविष्ट आहेत.
27 Feb 2015 - 6:29 am | श्रीनिवास टिळक
दुव्याबद्दल धन्यवाद, वाचत आहे.
27 Feb 2015 - 7:01 am | कंजूस
दिवाळीत महिनाभर डीडीभारती चानेलवर कंबोडिआ -सुमात्रा -बाली-जावा येथील भारतीय शिल्पांवर माहितीपट दाखवत होते. हे पुन्हा नेटवर पाहण्यास मिळते का ते शोधायला हवे.त्यांच्याकडे फारच छान फिल्म्स आहेत.
अंगकोर वाट आणि कैरो म्युझिअम पितळी बकेट लिस्टमध्ये टाकलेली आहेत .
तिकडच्या बऱ्यांच देवळांत एक नवीन रचना दिसते. मनोऱ्यासारख्या पोकळ शिखरावर कळसाचा दगड नसतो उघडे असते आणि खाली गाभाऱ्यात पिंडीऐवजी छोट्या हौदात पाणी असते.आता २२मार्चला दुपारी या वरच्या गवाक्षातून सूर्यकिरण थेट खालच्या हौदातल्या पाण्यातून परावर्तित होतात आणि शिखराच्या आतील भागातील चित्रे उजळतात -थोडक्यात इथे दुपारी साडेअकराला जा आणि फोटो व्हिडिओ आणा.