बस मी आणि बाळ

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
17 Mar 2015 - 10:06 pm

बसमध्ये धक्के खात उभा होतो
आसनस्थ होण्याचा मार्ग शोधत होतो

आसनस्थ झाल्यावर खिडकी शोधु लागलो
प्रवासात या अपेक्ष्ांचे सामानही बाळगलो

सगळ मिळवुनही धक्के लागतच होते
सवयीप्रमाणे डोळे सर्वत्र फिरत होते

समोरच्या सिटवर बाळाला हसताना पाहिले
पण हसण्याचे कारण नाही गवसले

अपेक्ष्ांचे सामान त्याच्यासोबत दिसले नाही
म्हणुनच हसण्याला कारणही लागले नाही

पुढच्या प्रवासातही धक्के बरेच बसले
पण गालावरचे हसु तसेच राहिले.

प्रवास

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 10:22 pm | श्रीरंग_जोशी

आशयपूर्ण कविता आवडली.
सगळ वर अनुस्वार हवा होता.

बाकी बाळगलो वरून तुम्ही मरावाड्याकडचे असाल असा अंदाज आहे.

शब्दानुज's picture

17 Mar 2015 - 10:34 pm | शब्दानुज

सोलापुर..

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 10:53 pm | श्रीरंग_जोशी

:-)

सोलापुरकरांच्या बोलीभाषेमध्ये मराठवाडी भाषाशैलीचा प्रभाव पूर्वीही अनुभवला आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

18 Mar 2015 - 12:07 am | वॉल्टर व्हाईट

छान आहे कविता, आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 9:51 am | अत्रुप्त आत्मा

आवडली.