मराठी गझल

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
10 Mar 2017 - 7:30 pm

जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!

तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!

चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!

कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!

कवितागझलमराठी गझलशृंगार

राउळी या मनाच्या

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
2 Mar 2017 - 2:28 pm

ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html

a

राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात

जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या

तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या

कवितागझलमराठी गझलशांतरस

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Feb 2017 - 9:53 am

रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)

तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही

तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणगझलgajhalgazalमराठी गझल

माणूस

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Feb 2017 - 8:16 pm

(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.)

माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ?
बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो?

नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी
हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो

भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला
वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ?

पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी
नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो?

गझलमराठी गझल

वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Feb 2017 - 11:43 am

शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने
मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने

कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो
माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने

भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता?
अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने

तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी
लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने

मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे
विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी

गझलमराठी गझल

कधीतरी.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
29 Jan 2017 - 3:41 pm

उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....

भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....

चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....

मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!

(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद

कविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकगझलgazalprayogअदभूतकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामराठी गझलमुक्त कवितारतीबाच्या कविताअद्भुतरस

कल्पनेचे महेर

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
14 Nov 2016 - 5:30 pm

गेल्या काही रात्री, मी झोपलोच नाही,
उजेड लोचनांचे, कधी संपलेच नाही,
हे देह फार क्षीणले, जाड पापण्या तरी ही,
ते....स्वप्न दिसले, जे पाहिलेच नाही !!१!!

त्या लक्ख प्रकाशात, गूढ अंधार होते,
कल्पनेचे ते महेर, बहुत दार होते,
दर्या, पर्वतांना ओलांडून पोचलो तर,
ते शब्द कानी पडले, जे ऐकलेच नाही !!२!!

ती पाहुनी पुण्यभूमी, मी जाहलो कृतार्थ,
सहवास दिग्गजांचा, सह शारदेची साथ,
कर जोडता तयांना, जी लागली समाधी,
असे काव्य सुचले, जे वाटेलच (लिहिलेच) नाही !!३!!

कवितामराठी गझल

(शीर्षक सुचले नाही ) - extension

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Nov 2016 - 7:44 pm

(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत)

माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!

त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!

इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवीत होतो !!

किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!

समाजमराठी गझल

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 6:57 pm

एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)

चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये

माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये

हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये

ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये

पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazalमराठी गझल

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
11 Aug 2016 - 7:21 pm

रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते

आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते

दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते

कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते

कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते

डॉ.सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazalमराठी गझल