आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी.
वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू
दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी.
दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती
नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.
पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे
आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी.
हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
