जोकशाही

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 May 2023 - 10:34 am

हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
सामान्यांच्या हाती
वाणसामानाची जंत्री

भाडोत्री बँडवाले अन्
भाड्याचे वाजंत्री
आकड्यांची कुतरओढ
लोक'शाई'ची जोकतंत्री

लोकल ला अजून लटकतात
ट्रॅफीकमधे अजून अटकतात
तरुण नोकरीसाठी भटकतात
शेतमाल दलाल अंग झटकतात

ह्याची वटवट की
त्याची खटपट
सिहासन चित्रपट कि
राष्ट्रपती लागवट

हा मुख्यमंत्री की
तो मुख्यमंत्री
जनतेला पडत नाही फरक.
त्यांना रोजचाच झालाय
समस्यांचा नरक !!

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 11:05 am | कर्नलतपस्वी

नक्राश्रूंचा पुर
आफवांचा धुर

मिडियाची चांदी
युट्युबरची मांदियाळी

हाय काय नाय काय......

जोकशाही नसलेला एखादा कालखंड सांगता येईल का?

(समस्यांच्या नरकातून बाहेर पडण्यासाठी जनतेला शुभेच्छा!)