आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२
तर सांगायचा मुद्दा हा की असे आमचे डॉक्टर “अमानवीय” आहेत.
थोड्याच दिवसानंतर सगळ्या पुण्याची मति गुंग करणारी
अभूतपूर्व घटना घडली. त्या अघटित घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या शिवाय बरका.
एके दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरांचा फोन आला, “प्रभुदेसाई, संध्याकाळी इकडेच चहा प्यायला ये. तुला गंमत दाखवायची आहे. माझा कॉर्नफ्लेक्स बनवण्याचा प्रयोग शेवटी यशस्वी होणार अस दिसतेय. तू ये आणि स्वतःच बघ.”