लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?
नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे. दररोज मेट्रो /बसचा प्रवास कमित कमी व्हावा, या दृष्टीने हुडकत असता कोणत्या भागातील घरे शोधावीत असा प्रश्न पडला आहे. यावर जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन केल्यास खूप मदत होईल.
मला मुख्यतः कलासंग्रहालयेच बघायची आहेत. बाकी 'टूरिस्ट अॅट्रॅक्शन्स' म्हणतात, त्यात फारशी रूची नाही.