आता १२वी च्या परीक्षा सुरु होतील आणि त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा होतील. जून महिन्यापासून उच्च शिक्षणाच्या प्रवेशांना सुरुवात होईल. तत्पूर्वी Mechanical Engineering या विषयाची माहिती देणारे हे PPT तयार केले आहे. YouTube वरील विडीओ लिंक खाली दिली आहे.
११-१२वीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरता हे तयार केले आहे. ही Mechanical Engineering या विषयाची जाहिरात नव्हे. Mechanical Engineering मध्ये केवळ काय आहे याची ओळख करून दिलेली आहे. बर्याचदा १२वी नंतरच्या choices या दूरचे भाऊ बहीण, नातेवाईक, शेजार पाजारची मोठी मुले, हवेतल्या गप्पा, खाजगी शिकवणी चालक आणि त्यांच्या जाहिराती यांवरून ठरतात. अशा परिस्थितीत जास्तीत जास्ती लोकांपर्यंत विविध क्षेत्रांची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे Mechanical Engineering ची माहिती देणारा हा छोटा विडीओ मी तयार केलेला आहे. Mechanical Engineering सोडून अन्य क्षेत्रांची माहिती प्रत्येकाने करून घ्यावी आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा, त्याकरता सर्वांना शुभेच्छा.
प्रतिक्रिया
9 Mar 2024 - 10:30 pm | चौथा कोनाडा
माहिती पुर्ण धागा.
व्हिडिओ खुप सहज, सोपा आणि छान आहे.
आणखी माहितीपुर्ण धाग्यांच्या लेखनासाठी शुभेच्छा !
धन्यवाद !
10 Mar 2024 - 10:19 am | कंजूस
रेझलूशन वाढवा.
10 Mar 2024 - 7:44 pm | धर्मराजमुटके
चित्रफीत पाहिली. आवडली.
10 Mar 2024 - 9:09 pm | Bhakti
छान व्हिडिओ.