शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
17 Feb 2008 - 6:01 pm

'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते
तोंडावर अमुचे काव्य अपटले होते

'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके
का उगीच नवखे शब्द प्रसवले होते?

लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले
(तू मुळात नुसते शब्द बदलले होते)

राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी
ते घाव मी जरी सर्व विसरले होते

थेंबातलि कवने किती टपकली होती!
पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!!

नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची!
बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

हे ठिकाणकलावावरकवितागझलविडंबनप्रकटनविचारमतप्रतिसादमाध्यमवेधअनुभववादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2008 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेला,
गझल आवडली.

'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके
का उगीच नवखे शब्द प्रसवले होते?

आणि

लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले
(तू मुळात नुसते शब्द बदलले होते)

लै भारी !!!!
अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत's picture

19 Feb 2008 - 11:15 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल.

आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-)

'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते
तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.)

थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती!
पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!!

नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची!
बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

(हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

बेसनलाडू's picture

19 Feb 2008 - 11:23 am | बेसनलाडू

प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार
(आभारी)बेसनलाडू
लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;)
(वृत्तसाक्षर)बेसनलाडू

केशवसुमार's picture

19 Feb 2008 - 2:09 pm | केशवसुमार

बेसनशेठ,
खरोखरच खडे मारणे!!
अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना..
त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं.
केशवसुमार

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 2:17 pm | विसोबा खेचर

थेंबातलि कवने किती टपकली होती!
पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!!

वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या...

तात्या.