भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
2 Feb 2009 - 12:35 pm

 
 
 

दिल्ली पासून रोड ने ५०० किलोमीटर अंतरावर असलेले एक नितातं सुंदर थंड हवेचे ठीकाण, रेल्वे ने जायचे असेल तर तुम्हाला शिमला किंवा कालका जावे लागेल व तेथून मनाली बस ने.  खोल वर पसरलेल्या द-या व आकाशाला गाठण्याची स्पर्धा करत असलेली हिमशिखरे हेच मनालीचे दैवत.जाण्याचा कालावधी जानेवारी ते जुन पर्यंत कधी ही... पण जानेवारी मध्ये गेला तर बर्फाचा आनंद भेटु शकतो..  मी मागील दोन वर्ष सलग मनालीला गेलो माझ्या आवडत्या ठिकाणा मध्ये ह्याचा नंबर सगळ्यात पहिलाच येतो !

हॉटेल्स घेउन का तेथे गेला तर गेस्ट हाऊस चा शोध घ्या...  गेस्ट हाऊस मध्ये सर्विस चांगली भेटते व स्थानिक लोकच गेस्ट हाऊस चालवत असल्यामुळे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळू शकते, तेथे दोन प्रकारचे वाटाडे भेटतात एक तुम्हाला मुर्ख बनवणारे व एक तुम्हाला खरोखर नितांत सुंदर असे मनाली फिरवणारे.. तुम्ही जेथे राहण्यासाठी उतरला असाल त्याच्या आजू बाजुला जरा चक्कर मारा एखादा कोणीतरी स्थानिक पकडा... ( आम्ही धुम्रपान करतो त्यामुळे आम्हाला लगेच कोणी ना कोणी भेटतच .. फक्त एकच प्रश्न माचिस है क्या ? लगेच गप्पा चालू)  त्याच्याशी गप्पा मारा व त्याला हलकेच विचारुन घ्या वाटाड्या कोण चांगला आहे व योग्य पैशात कोण फिरवेल.. ;)
मनालीला गेल्यावर खर्च करु नका अफाट महाग वस्तू भेटतात तेथे.. आपल्या कॅमराची बॅटरी, खाण्यासाठी स्नॅक व बाकीच्या गरजेच्या वस्तु मनालीला येण्यापुर्वीच विकत घेऊन ठेवा.. दोष त्यांचा नाही आहे त्यांना काही सामान विकण्यासाठी आणने म्हणजे १०० किलोमिटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे वस्तु महाग मिळतात व पर्यटनस्थळ म्हणाले की वस्तु तश्याच जरा महाग होतात.. शाल भेटते... हाताने विनलेल्या शॉल एकदम  सुंदर कलाकुसरी असलेल्या शॉल !
२२०० मिटर उंची वर.. व्यास नदीच्या काठावर वसलेले हे छोटे शहर सर्व बाजूने सुंदर आहे,  जास्त करुन नवविवाहीत जोडपी येथे आपला हनिमुन अविस्मरणीय बनवण्यासाठी येतात व त्यासाठीच जोडी(कपल) साठी  येथे विविध डिस्काऊट लावलेले दिसतात जागोजागी  ;)


दोन्ही फोटो आपले मिपा सदस्य सुचेल तसं
मनाली मध्ये पाहण्यासारखं हिडंम्बा मंदीर (महाभारतील भिमाची पत्नी) आहे एकदम सुंदर शिल्पकला तुम्हाला येथे पाहता येइल मंदिराचा परिसर देखील पाहण्यासारखा आहे.. त्यानंतर तिब्बती गुफा देखील पाहण्यासारखी आहे.. येथे बुध्दाची मोठी मुर्ती पाहण्यालायक आहे तसेच बैध्द साधु.. लामा ह्यांची जिवनचर्या जवळून पाहता येते. जर कोणाला झरे / पाण्याचे गरम कुंड पाहण्याची आवड असेल तर त्याने जवळच असलेल्या वसिष्ठ गावात जायला विसरुच नका..  अत्यंत उपयोगी व मेडीकल उपयोगासाठी ह्यांचे पाणी निरनिराळ्या रोगात वापरले जाते... त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी पाणी तेथील आहे असे मानले जाते.

रोहतांग दर्या..  मनाली पासून लद्‍दाख रोड वर पाच-सात किलोमिटर दुरवर असलेले ठीकाण.... आह... एकदम.. सुंदर.. ज्या बद्दल तुम्ही कल्पनासुध्दा करु शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो.. ह्याला दर्या का म्हणतात माहीत आहे ? येथे गेल्यावर तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत...  :)  अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग दर्या जरुर पहावा.. येथे वर्ष भर बर्फ जमेलेलीच असते.. त्यामुळे कधी ही जा.. ! तसेच मनाली पासून दर्या पर्यत चालतच यावे लागते (खेचर /घोडी मिळतात पण आपण चालतच जाव लै मजा)  ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही ... अगदी पट्टणीटोपला सुध्दा नाही  ;)
 तीनचार दिवस फिरण्यासाठी एकदम मस्त ठीकाण.

हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात.
गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ !
जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी) जेवण थोडं महाग आहे व कमी शिजलेले मिळण्याची शक्यता जास्त.. कारण उंच जागेचे ठीकाण !

दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे.

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते.

 
 
* टिप : फोटो माझे नाही आहेत, गुगलसेवा वापरली आहे..  मागे विदा उडाल्यामुळे काही फोटो सापडत नाही आहेत पण जसे सापडतील तसेच एका आठवड्यात ह्यात बदल करेन.

संस्कृतीप्रवाससमाजजीवनमानप्रकटनविचारमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2009 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

राजे मनाली आणी आजुबाजुच्या ठिकाणांची सहल मस्तच :)
पायाला चाक लावल्या सारखे तुमचे हिंडणे बघुन तुमचा जाम हेवा वाटतो बुवा आपल्याला !! आमचे खरे तर अजुन संपुर्ण पुणे पण बघुन झाले नसेल.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मृगनयनी's picture

2 Feb 2009 - 1:03 pm | मृगनयनी

राजे,

खूप खूप धन्यवाद!

खूप सुन्दर छायाचित्रे आणि माहिती आहे...

आम्ही या उन्हाळ्यात मनाली'ला जायचा विचार करतोय!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:42 pm | दशानन

मनालीला काही टुर कंपन्या चांगले चांगले पॅकेज देतात.. त्याबद्दल विचारना करुन घ्या, कधी कधी असे पॅकेजेस चांगले भेटतात.

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

संजय अभ्यंकर's picture

2 Feb 2009 - 3:03 pm | संजय अभ्यंकर

मृगनयनीजी,

मनाली च्या टूर मध्य मणीकरण तीर्थाला जरूर भेट द्या.

दिल्ली मनाली मार्गावर मनालीच्या आधी भुंतर गाव लागते.
मनाली ला जाण्या साठी विमानतळ भुंतरला आहे.
भुंतरलाच व्यास व पार्वती नद्यांचा संगम आहे.

येथुन बस / मोटर ने अंदाजे १५ की.मी. वर मणीकरण तीर्थ आहे.
पार्वती नदिच्या किनार्‍यावर मणीकरणला श्रीराम मंदिर व गुरुद्वारा आहे.
तसेच नदीतच तप्त झरे आहेत.

दोन्ही ठिकाणी लंगर चालतो (मुफ्त जेवण). ह्या दोन्ही ठिकाणी जेवणा साठी चूल पेटत नाही.
जेवण ह्या तप्त पाण्यावर तयार होते. ह्या लंगरचा लाभ घ्या.

पार्वती नदि, प्रचंड वेगाने वहाते, दिवस-रात्र तीचा गंभीर ध्वनी आपली सोबत करतो.

मणीकरण गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे येथील ढाब्यांवर पुदीन्याची चवीष्ट चटणी मिळते.
भज्यां बरोबर अनुभवावी.

मणीकरण मधून देवतिब्बा शिखराचे सुंदर दर्शन घडते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दशानन's picture

2 Feb 2009 - 3:11 pm | दशानन

मणीकिरण मंदिर व पार्वती नदी !

संगम पाहण्यालायक ! त्याच्या जराच पुढे दुर्लक्ष केले गेलेले एक पुरातन मंदिर आहे देव नाही आहे आत पण मंदिराची कलाकुसरी पाहण्यालायक.

खरं तर मी प्रवास करताना देवस्थानं टाळतो ह्याची दोन कारणं !

१. तेथील कचरा व घाण बघून मला वैताग येतो.... ( मागे आम्ही जेव्हा शिर्डीला गेलो होतो तेव्हा रस्त्यावर च्या प्लास्टीक च्या पिशव्या गोळा करण्यातच अर्धा दिवस गेला)

२. पंडे व पुजारी ह्यांचा त्रास... देवाला एका तुरुंगात ठेवल्या सारखं वाटतं.. त्याला भेटायला पुजारांना मस्का लावावा लागतो (दक्षिणा / दान देऊन)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Feb 2009 - 2:32 pm | घाशीराम कोतवाल १.२

राज कुमाराशी सहमत राजे अगदी १०१% सहमत आहे..

सहज's picture

2 Feb 2009 - 1:06 pm | सहज

छान वर्णन. लगे हात खर्चाचा अंदाज दिला असता तर एक माहीतीपुर्ण लेख होईल.

अवांतर - राजे तुम्ही तर अविवाहीत ना मग तुम्ही बुद्धाची दिनचर्या की प्लॅटोनिक रिलेशनशीप विविध डिस्काउंट ????

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:16 pm | दशानन

खर्चाचा अंदाज !

हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात.
गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ !
जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी)

दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे.

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते.

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

मिंटी's picture

2 Feb 2009 - 1:08 pm | मिंटी

राजे मस्त माहिती एकदम........ खरचं मनाली म्हणजे स्वर्ग आहे ...... अतिशय सुंदर आहे ही जागा म्हणजे कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही........ धन्यवाद राज परत एकदा मनालीची सफर घडवल्याबद्दल. :)

अवांतर : मागे एकदा कधितरी दामोदरपंतांनी फोटो टाकले होते मनालीचे ते बघितले आहेस का ?

अवलिया's picture

2 Feb 2009 - 2:23 pm | अवलिया

छान लेख....

--अवलिया

सुचेल तसं's picture

2 Feb 2009 - 2:35 pm | सुचेल तसं

वा राजे, सुंदर लेख. आम्ही मागच्याच वर्षी शिमला-कुलु-मनालीला जाऊन आलो. जानेवारीला एंड ला गेलो होतो आणि कडाक्याची थंडी होती. रोहतांग पासचा रस्ता बंद झाला होता. मग जरा कमी उंची वर असलेल्या एका ठिकाणी गेलो होतो. तिथे फक्त ४ बाय ४ च्याच गाड्या जातात (उदा: मारुती जिप्सी). स्केटिंग आणि पॅराग्लायडिंग करायला जाम मजा आली.

दशानन's picture

3 Feb 2009 - 10:08 am | दशानन

>>स्केटिंग आणि पॅराग्लायडिंग

आईस स्केटिंग :)

साठी मी रोहतांग दर्या भारतातील १ नंबरची जागा मानतो !
तेथे नेहमीच स्पर्धा देखील होता... !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 3:06 pm | शंकरराव

मनाली प्रवास वर्णन आवडले,
राजे फक्त ब्रेकफास्ट वर आख्खा दिवस काढायचा म्हणजे अवघड हो..
खवय्यां साठी काहि अड्डे , घरगूती डबा\जेवनाची सोय, खानावळ ई. बद्दल दोन ओळी खरडा हो...
स्पे.चहा मिळतो का तिकडे.. ?

अनंत छंदी's picture

2 Feb 2009 - 9:04 pm | अनंत छंदी

राजे
लै भारी. लेख एकदम आवडला.
:)

स्पृहा's picture

3 Feb 2009 - 12:20 pm | स्पृहा

सुरेख आणि नेमके वर्णन. छायाचित्रे देखील छान.