भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
28 Feb 2009 - 10:25 am

दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या. दिल्ली-६ चित्रपटात दाखवलेला भाग हा दिल्ली-६ चा नाहीच आहे, पोलिसांनी व सरकारने सुरक्षतेचे कारण करुन दिल्ली-६च्या टिमला शुटिंग करुच दिलेले नव्हते, त्यांनी दिल्ली पासून दुर राजस्थानमधील एका लोकेशनवर ते शुटींग केले आहे काही भागाचे.

***


चांदणी चौकचा परिसर


जुन्या काळातील चांदणी चौकचा परिसर

लाल किल्याच्या लाहोरी गेटच्या समोरील भाग म्हणजेच दिल्ली-११०००६.
दिल्लीतील सर्वात प्रसिध्द असा चांदणी चौकचा परिसर. जवळ ३०० वर्षापुर्वी वसलेला हा दिल्लीचा भाग एक महत्वपुर्ण भाग. भारतातील प्रमुख धर्म तुम्हाला येथे प्रामुख्याने पहायला मिळतात, हिंदु, जैन, मुसमान, ख्रिच्चन व सिख. येथे ह्या धर्माची श्रध्दास्थाने देखील जवळ जवळच आहेत. शंकर मंदिर, रामलिला मैदान, जैनांचे लाल मंदिर, जामा मसजिद व सिखांचे सिसगंज गुरुद्वारा , ख्रिच्चनांचा चर्च, हे मुख्य नाही तर दोन किलोमिटरच्या परीसरातील मंदिरे व धर्मस्थळे ह्यावर लिहायला बसले तर एक चांगला मोठा लेख तयार होइल इतकी त्यांची संख्या.
ज्यांना दिल्लीची गर्दी अनुभवांची आहे त्यांनी येथे एक चक्कर जरुर मारावी, प्रचंड गर्दी, गोंधळ व धावपळ, मध्येच सायकल रिक्षावाले.. बाजूला ओरडणारे फेरीवाले.. मंदिरातून.. येणारा घंटानाद, मसजिद मधून येणारी प्रार्थनेची बांग, गुरुद्वारातून येणार एक ओंकार.. सगळे एकसाथ एक वेळ चालू असतं, सकाळी ७ वाजल्या पासून येथील रस्ते भरुन जातात ते मध्य रात्रीपर्यंत हलचल चालूच असते.
ह्या भागाचं एक वेगळे पण म्हणजे ज्या धर्माचा सण आहे त्या धर्माच्या रंगात हा भाग नाहून निघतो.. शिवरात्री असो वा दिवाळी.. सगळी कडे त्या दिवसाच्या निमित्याने व्यापार होतो... ईद असो वा गुरु दिन तोच रंग तुम्हाला दिसेल. भरीस भर म्हणून जगप्रसिध्द २६ जानेवारीची परेड चा रुट देखील येथून जातो. समोरच असलेला लाल किल्ला व धर्मस्थळे ह्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या अफाट असते. मी कधी ही तीकडे गेलो तर मला नेहमीच त्या जागेचे काही ना काही तरी वेगळे पण जाणवतं, येवढ्या धर्माचे, भारतातील कानाकोप-यातून आलेला समुदाय ह्या इवल्याश्या जागे मध्ये कसा समावला असेल, अरुंद बोळ, गल्ल्या, एकदम शतकापुर्वीच्या पध्दतीचे दोन-तीन मंजीली इमारती, त्या इमारतीवर असलेल्या बरसाती, गल्ली बोळातून लोंबकळणा-या तारा.. आडवे तीडवे खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेले फेरीवाले.. छोटे दुकानदार, खाण्यापिण्यांची असंख्य दुकाने, पराठेवाली गल्ली, नटराज दहि-भल्ले, सर्वत्र पसरलेला अतराचा सुगंध.. सगळं विचित्र वाटतं तरी ही कुठंतरी आपण पण त्याच गर्दीचा , त्याच वातावरणाचा भाग झालेलो असतो.

शहाजहानची सर्वात मोठी मुलगी जहांआरा साठी निर्माण करण्यात आलेला हा सराय (परिसर) सुंदर गार्डन व एतिहासिक वास्तूनीं नटलेला हा भाग खरं तर लाहोरी गेट पासून फतेपुर मसजीद पर्यंत जाण्यासाठी तयार केलेला मार्ग. हा चार भागामध्ये विभाजित केलेला आहे १. उर्दु बझार, २. फुल मंडी ३. जैहरी बझार / असर्फि बझार ४. चादंणी चौक. येथे इंग्रजांनी बांघलेला एक ११० फुट घंटाघर (घड्याळ टॉवर) बांधलेला होता तो १९५१ मध्ये पाडून मार्केट साठी जागा वाढवली गेली. हा भाग मला वाटतं भारतीय इतिहासाचा एक मुक साक्षीदार आहे, मुघल राजांनी केलेल्या हत्या, गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे केलेले सिर-कलम व अनेक गोष्टी ह्या भागात घडल्या, पण तसाच हा भाग भारतीय स्वातंत्र्यातील अनेक मोठ मोठ्या घडामोडीला देखील साक्षीदार आहे.

येथे काय नाही मिळत, कपड्यापासून ते इलेक्टॉनिक वस्तू पर्यंत, चादरी पासून ते मखमली कालिन पर्यंत सगळे विकले जाते, खाण्यापिण्याच्या वस्तूची तर येथे रेलचेल आहे, पण येवढं सगळं असताना ह्या भागाचा विकास का नाही झाला, माझ्या नजरेने जे पाहीले त्यानुसार ह्या ला जबाबदार काही अंशी सरकार जरी असले तरी देखील येथील गर्दी व तंग रस्ते ह्यामुळे सरकारला काही ही करायला तयार होत नसावी, मी एकदोन जणांशी जेव्हा ह्या बद्दल बोललो ते ते म्हणाले "राज, दिल्ली का दिल है यह.. एक दिन भी यहा काम रुक गया तो समजो दिल्ली रुक गई." एका अंशी हे खरं वाटतं. खरोखर दिल्ली -६ हे दिल्लीचे दिलच आहे, जर दिल्ली जाणून घ्यायची असेल तर एकदा का होईना दिल्ली-६ ला भेट दिलीच पाहीजे.


सिसगंज गुरुद्वारा

* सर्व फोटो महाजालावरून सभार.

संस्कृतीवावरलेखसंदर्भमाध्यमवेधअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मनिष's picture

28 Feb 2009 - 10:38 am | मनिष

राज भौ, इथली सफर घडवल्याबद्द्ल तुम्हाला धनयवाद! :)
चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी झाल्याचे महित होते, आणी काही परिक्षकांच्या (Indian Express) मते ते वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे; तुम्हाला काय वाटते? पुढच्या दिल्ली भेटीत तिथे नक्की जाणार! :)

दशानन's picture

28 Feb 2009 - 10:45 am | दशानन

>> वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे

खरं आहे, जी भाषा व वेषभुषा चित्रपटात विविध लोकांची दाखवली आहे ती खरोखर सेम आहे, अजून एक माहीती त्या चित्रपटातील बाहेरील लोकेशन्स च्या शुटींग साठी येथील काही लोकांना तिकडे घेऊन गेले होते व जेव्हा त्या लोकांनी सांगितले की बरोबर हा भाग दिल्ली-६ चा वाटतो व वातावरण ही तेव्हाच तेथे शुटींग केले गेले, त्यांना हा चित्रपट ९० दिवसामध्ये तयार करायाचा होता पण जवळ जवळ दीड वर्ष लागली चित्रपट पुर्ण होण्यासाठी, जेव्हढी मेहनत त्यांनी लोकेशन साठि केली तेवढीच पटकथेवर देखिल केली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला असता जनतेला.

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

आज खरी माहिती कळाली. धन्यवाद.
वेताळ

अवलिया's picture

28 Feb 2009 - 11:21 am | अवलिया

छान सफर घडवुन आणलीस रे राजा!!!

खरेच पहायला कधी जमेल काय माहित?

--अवलिया

ढ's picture

28 Feb 2009 - 11:28 am |

खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली.

छान ओळख करुन दिलीत राजे.

विनायक प्रभू's picture

28 Feb 2009 - 12:00 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो. चांगले लिहितो तु बॉ.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Feb 2009 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार

राजे सुरेखच सफर घडवलीत. बसल्याजागी राजधानीतल्या येव्हड्या महत्वाच्या ठिकाणाचे सर्वांगानी दर्शन घडवलेत त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. बरीच नविन माहीती कळली आज. नाहितर आमचा दिल्लीचा अभ्यास म्हणजे 'इतिहासाच्या' पुस्तकापुरता मर्यादीत.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

28 Feb 2009 - 12:04 pm | अनिल हटेला

दिल्ली - ६ ची सफर आवडली....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2009 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

राज, चांगली माहिती दिली आहेस.

अवांतरः त्या 'पराठेवाली गली' बद्दल जरा विस्ताराने लिही यार!!! खूप ऐकलंय.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

28 Feb 2009 - 12:16 pm | दशानन

पराठेवाली गल्ली ही तर सध्या जग प्रसिध्द आहेच, फिल्मस्टार अक्षय कुमार देखील ह्या गल्ली मध्येच लहानाचा मोठा झाला.. तर ही पराठेवाली गल्ली ईतिहास कालापासून प्रसिध्द आहे ती मिठाई व आलु पराठ्यासाठी पुर्वीच्या काळी येथील सर्व मिठाईची दुकाने काश्मीरी पंडीतांची होती व मुगलशाहीतील राजकीय परिवारासाठी व मंदिरातील देवाला प्रसाद म्हनून चढवण्यासाठी फक्त येथील मिठाईच वापरली जात असे, पण सध्या येथे काश्मीरी पंडीतांची तसेच, सिंध भागातील पंजाबी लोकांची दुकाने आहेत व त्यांच्या पराठ्यांची चव चाखण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे गर्दी करतात..

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

लक्ष्मणसुत's picture

28 Feb 2009 - 12:10 pm | लक्ष्मणसुत

लक्ष्मणसुत उवाच्

खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली.

फारच छान!

सुक्या's picture

28 Feb 2009 - 1:14 pm | सुक्या

राजे हो. खुप छान माहीती . काही दिवस दिल्ली का खुप भटकलोय. स्वस्तात वाकमन घेण्यासाठी चांदनी चौक खुप भटकलोय. गर्दी आणी तंग रस्ते, त्यातच रस्त्यावर बसलेले दुकानदार .. त्यामुळे कधी कधी ही गर्दी नकोशी वाटते.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

दशानन's picture

1 Mar 2009 - 10:22 am | दशानन

तुम्ही स्वतः फिरला आहात :)
तुम्हाला कळालेच असेल की हा लेख म्हणजे एक फक्त ठेंब आहे दिल्ली-६ ची माहीती देणारा... प्रचंड मोठा ग्रथं तयार होईल तेथील विविध संस्कृती विषयी लिहायला बसले तर :)

सहज's picture

28 Feb 2009 - 1:29 pm | सहज

राजे छोटेखानी दिल्लीसफर आवडली. :-)

अवांतर - दिल्ली ६ सिनेमा कसा आहे म्हणे?

यशोधरा's picture

28 Feb 2009 - 1:53 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय.

सुनील's picture

28 Feb 2009 - 3:53 pm | सुनील

छान सफर घडवलीत राजभौ. कधीकाळी तिथे भटकल्याची आणि हादडलेल्या पदार्थांची याद आली! आता दिल्ली ६ पाहिलाच पाहिजे!

अवांतर - दिल्ली ६ वरून सहजच मुंबई सहाची आठवण आली... मुंबई ६ म्हणजे मलबार हिल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.