पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे.. ह्यांचे समाज जिवन पण विस्कळीत काही जण शेती करत पण मुख्य म्हणजे घरातील एक्-दोन व्यक्ती सैन्यात अथवा कोतवालीत (त्या काळचे पोलिस) , गावात बहुसंख्य हिंदू व मुळ समाज यादव कुलीन मुळ भाषा हरयानवी त्यामुळे सर्वच जण यादव भेटतात येथे भरलेल्या बस मध्ये यादव साहेब अशी आरोळी दिली तर ९५ % लोकं तुमच्याकडे वळून पाहतील एवढी संख्या.
शितला माता मंदिर
१९८० च्या पुर्वी एक राजधानी शेजारचं एक काही खेडी मिळून असलेला भाग म्हणजे गुडगावं, येवढीच ओळख ह्या गावाची, गाव हो त्यावेळी हे गावच होते, पण १९८१ ला संजय गांधीने येथे मारुती निर्माण करणारी कंपनी मारुती उद्योग लिमिटेड चालू केली व ह्या खेडेगावाचं भाग्य चमकलं ! लोकांना रोजगार मिळू लागला व नवनवीन काम धंदे येथे चालू झाले, व पुढे काही वर्षातच होंडाची हिरो होंडाचा प्लान्ट पण येथे चालू झाला व गुडगाव प्रगती पथावर धावू लागला. १९८० ते ९४ पर्यंतचा कालखंडामध्ये लोकांना कामे उपलब्ध भरपुर झाली पण त्याच्या जिवनमानात काहीच फरक पडला नव्हता, खुप लोकांना एक वेळचे जेवण पण मिळणे दुरापास्त झालेले असायचे , पण त्याकाळात सरकार ने गुडगावंच्या जयपुर हायवे च्या नजदीक काही शे एकड जमीन कारखाने व उद्योग धंदे काढण्यासाठी आवंटीत केली "मानेसर" गावाजवळ, आय एम टी मानेसर. पण कामधंदा तेथे चालू होण्यासाठी १९९८ उजाडले, पण जेव्हा येथे कंपन्यांना जागा मिळाली तेव्हा मात्र गुडगाव ची प्रगती तुफान वेगाने झाली, पण त्या वेगा बरोबरच स्थानिक लोकांचे पण नशीब उघडले, ज्या जमीनींत काहीच उगवत नव्हते.. काही हजार मध्ये एकडं अशी विकली जाणारी जमीन .. अचानक लाखो-करोडोचा भाव मिळवून देऊ लागली, आज जो गुडगाव चा पॉश येरिया म्हणून ओळखला जातो तो डीएलएफ फेस पण... तेथे १९८० च्या पुर्वी जंगल होते व ज्यांच्या खानदान मध्ये कोणा आजोबा / पणजोबाला त्यावेळच्या सरकारने / राजाने दान दिलेली जमीन, कित्येकांना माहीत देखील नव्हते की त्यांची जमीन तेथे आहे पण जेव्हा डिएलएफ ने जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला व त्याच्या मागोमाग बाकीच्या पण रिअल एस्टेच्या कंपन्यांनी पैसा अक्षरश: ओतला.. गुडगांव मध्ये पैश्याचा पाऊस सुरु झाला... लाख ते करोड पर्यंत आकडा पोहचायला... काहीच महीने लागले !
आताचे गुडगाव
२००० च्या आयटी बुम मधे जर बेंगलोर हैद्राबाद खालोखाल फायदा झाले असलेले शहर म्हणजे गुडगांव... पावसाळ्यात जसे कुत्राची छत्री उगवते तश्या भल्या मोठ्या इमारती व त्यामध्ये असंख्य कॉलसेंटर व आयटी कंपन्या. व ह्या कंपण्यासाठी लागणारा मनुष्यबळ... गुडगाव अफाट वाढले... आधी काहीच गल्ली-रस्ते असलेले - हायवेच्या दुस-या बाजूला ज्म्गल असलेले गुडगाव .. जसे फाटले होते... सैरावैरा.. वाढत वाढत.. नको तसे वाढले, लोकाच्या हाती प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर बांधकाम व इमारती वर इमारती.... टोलेजंग इमारती... गुडगाव बदलं !
ज्या रस्त्यावर कधी बैलगाडी चालत असे त्या रस्तावर आता बीएमडब्लु.. मर्क्..अश्या महाग गाड्या सरास धावू लागल्या.. !
मोठ मोठया कंपन्या, बँका, ट्रव्हल कंपन्या... ह्यांनी गुडगाव काबीज केले... पण एकच बाजूला हायवेच्या पलिकडील बाजू पॉश बाजू.... व अली कडे तेच जुने भकास गुडगाव.. आपला जुना डोलारा संभाळत सावरण्याचा व जे काय चालू आहे ते समजण्याचा प्रयत्न करत असलेले.. पण हळू हळू जुने गुडगाव पण ह्या नवीनतेला समरस झाला व तो देखील सहज पणे मॉल्स व कॉप्लेक्स मध्ये फिरु लागला..
शहरामध्ये मॉल्स एवढे झाले की ओल्ड महरोली-गुडगाव रोड कधी मॉल रोड मध्ये तबदील झाला प्रशासनाला देखील कळाले नाही, सीटी मॉल, सहारा मॉल, वाटीका, मेट्रोपॉलिटीन, एमबीयन मॉल.. डिएलफ, गोल्डसुक, सीटी मॉल-२, सेंटर मॉल, सीटी सेंटर एक ना दोन २००८ जानेवारीमध्ये मध्ये तयार व वापरत असलेले मॉल्स ४८ होते तर निर्माणाधीन १८५ ! ह्याच मॉल्स नी गुडगाव मध्ये मेट्रो लाईफ स्टाईल आणली... व गुडगाव दिल्ली एनसीआर मधील सर्वात श्रीमंत भाग झाला, मोठ मोठे ब्रन्डस येथे आम झाले, लोकाच्या बोलण्याचालण्यामध्ये ब्रन्ड झळकु लागले.
सिटी सेंटर
दिल्ली जवळचे, एयर पोर्ट १५ मिनिटाच्या रस्तावर, चांगले हॉस्पिटल्स, चांगली सुविधा असलेले शहर. ह्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास मागील दहा वर्षात झाला, त्यातच दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे चा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला व दोन वर्षात पुर्ण पण केला आता गाड्या सुसाट धावतात... सकाळाच्या वेळी तर एयरपोर्ट वर फक्त ८-९ मिनिटामध्ये व करोलबाग ३० मिनिटे. आता सरकारने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे पिन्क सीटी एक्सप्रेस हायवे.. गुडगाव-जयपुर २०० किलोमिटर... सध्या वेळ चार तास ते पाच पास.. पण हा प्रोजेक्ट चालू झाला तर दोन्-तीन तासात जयपुर. तीकडे दिल्ली हून मेट्रो निघालीच आहे गुडगाव कडे... ६०% काम पुर्ण झाले आहे व ह्या वर्षाच्या अखेरीस ती गुडगाव मध्ये पळू लागेल.. अजून काय हवं !
दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे
म्हणतात ना सुंदरतेला / प्रगतीला अभिशाप असतोच त्या पध्दतीने येथे लोकल बस सेवा नाही, रिक्षा चालतात पण मिटर नाही.. वडाप पध्दत सर्वच जागी, मॉल्स आहेत पण घराजवळ असे वाण्याचे दुकान नाही.. की छोटी मोठी भाजी मंडी नाही.. मुले आहेत पण खेळायला ग्राउंड नाही.. कुठ जायचे तर स्वतःचे वाहन असणे सर्वात महत्वाचे हा गुडगावचा अलिखित नियम आहे, त्यामुळे भरमसाट गाड्या, बाइक्स रोडवर त्यामुळे कधी कधी छोटे मोठे तास्-दोन तास असे ट्रफिक जॅम लागतो, तसेच येथे श्रीमंत व गरिब ह्यात गॅप येवढा मोठा झाला की संघटीत गुन्हेगारी वाढू लागली व प्रगती बरोबरच गुन्हेविश्वात पण गुडगाव ने प्रचंड प्रगती केली, किडनॅपींग, खुन, चो-या-दरोडे तर आम बात.... ! अपघातंचे प्रमाण प्रचंड वाढले.. व प्रशासन जसे भारतात सर्व जागी आहे तसेच ढम्म ! काही फरक पडत नाही.. !
सिग्नेचर टॉवर
पण गुडगावं आपले सुखी ... मज्जेत राहणे... आजचा दिवस सुखात काढला उद्याचे उद्यावर हा शहराचा अलिखित नियम.
कधी आलात इकडे तर नक्की भेट द्या.. मनाला मोहीनी घालेल हे शहर.. ह्याचा चटक्-भडक पणा शक्यतो तुम्हाला आवडेल ही व चुकुन तुम्ही माझ्यासारखेच येथेच स्थाइक व्हाल :)
* चित्रे गुगलसेवा / काही माझी !
प्रतिक्रिया
28 Jan 2009 - 2:54 pm | महेश हतोळकर
राजे, छान लिहिलंय. आधीप्रमाणेच ही लेख माला सुद्धा वाचनीय होऊ द्या! फोटो पहाण्यासारखे आहेत.
अवांतरः आयला याच्या पायाला भिंगरी आहे काय रे? सफर झाली, बाहुबली हॉस्टेल झालं, दिल्ली ते दिल्ली झालं आणि आता भटकंती!
28 Jan 2009 - 2:58 pm | सहज
राजे मस्तच आहे ही सचित्र ओळख गुडगावची!!
28 Jan 2009 - 8:09 pm | शितल
सहमत. :)
28 Jan 2009 - 3:00 pm | मधु मलुष्टे ज्य...
राजे छान माहिती दिलीत गुडगांव बद्दल.
धन्यवाद!
सगळे फोटोज एकाच साइजचे असते तर लेख अजुन छान दिसला असता. पण जास्त फरक पडत नाही. दुसर्या स्टॉपच्या प्रतिक्षेत आहोत.
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
28 Jan 2009 - 3:10 pm | दशानन
फोटो सर्व एकाच साईज मध्ये.. पुढील लेखात घेऊन विचारात.
पण काय आहे सगळेच फोटो मी काढलेले नाही आहे.. गुगल सेवा वापरली आहे त्यामुळे !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 3:03 pm | निखिल देशपांडे
राजे पुढचा स्टोप लवक्र येवु द्या.....
लेख छान जमला आहे.
28 Jan 2009 - 3:04 pm | अवलिया
लै भारी रे
--अवलिया
काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
28 Jan 2009 - 3:14 pm | ढ
ह्ये म्ह्नंजी हातकणंगल्याला उतरल्यासारखं वाटलं.
काय काय?
बेष्ट लिवलंय तुमी.
28 Jan 2009 - 3:19 pm | मैत्र
गुडगाव नुसतं ऐकलेलं की खूप पॉश आणि असुरक्षित.
बाकी काहीच माहित नाही. अशी सचित्र माहिती आणि सगळा इतिहास भूगोल - आवडलं.
धन्यवाद राज!
29 Jan 2009 - 1:23 am | चित्रा
असेच म्हणते..
28 Jan 2009 - 3:20 pm | विनायक प्रभू
इतिहास तज्ञ होणार की काञ?
28 Jan 2009 - 3:22 pm | दशानन
नाय गेली दहा वर्षात जे अनुभवलं तेच लिहलं !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 3:47 pm | मृगनयनी
छान लिहिलंत हो राजे!
अजून येऊ देत.....
हे "गुडगाव" महाभारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? (जसे दिल्ली शहर "हस्तिनापूर" नावाने प्रसिद्ध होते.)
द्रोणाचार्यांव्यतिरिक्त, इतरही अनेक ऐतिहासिक घटनांशी या गावाचा संबंध असावा, असे एका "उत्खनन-पुस्तिकेत" वाचल्याचे आठवते.
:-?
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
28 Jan 2009 - 3:53 pm | दशानन
>>महाभारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध होते?
महाभारतात गुरुगांवचा इतिहास सापडत नाही, मी काय माहीतीगार नाही पण मी देखील कधी काळी ह्याबद्दल जाणकारांना विचारलं होतं !
>>इतरही अनेक ऐतिहासिक घटनांशी या गावाचा संबंध असावा
हो. पण इग्रजांच्याकाळात येथील बहुजण समाज हा इंग्रजांच्याच बाजुने होता कारण नोकरी.
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 3:54 pm | स्पृहा
मस्त फोटू आणि वर्णन!
पटपट येउदे अजून........
28 Jan 2009 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुडगावबद्दलचा एक माहितीपूर्ण लेख, चांगल्या वर्णनाबरोबर चित्र पाहतांना लेख वाचून पूर्ण कधी झाला ते कळले नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Jan 2009 - 4:22 pm | शंकरराव
गुडगाव चे सचित्र वर्णन आवडले
खवय्यांसाठी काही ओळी आणखी खरडल्या असत्या तर ...
शंकर यादव उर्फ पुजारी
28 Jan 2009 - 4:26 pm | दशानन
अरे खरंच.... हॉटेल्स हा विषय माझ्या डोक्यात आलाच नाही... पुन्हा कधी तरी लिहतो ह्यावर.. !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 4:36 pm | लिखाळ
गुडगांवची सचित्र ओळख छान.
पुढची भटकंती वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.
28 Jan 2009 - 4:38 pm | ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो!
गुडगांवची सचित्र ओळख छान.
तिथल्या "विशेष आयटी, बीपीओ कल्चर"विषयी वाचायला आवडले असते ;)
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
28 Jan 2009 - 4:44 pm | दशानन
"विशेष आयटी, बीपीओ कल्चर"
हे बघीतल्यावर भल्या भल्या संस्कृतीरक्षकांना फिट येते ;)
व मिपावर पुन्हा वाद नको म्हणून चित्रे टाकली नाहीत.. =))
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 5:14 pm | लिखाळ
>> व मिपावर पुन्हा वाद नको म्हणून चित्रे टाकली नाहीत.. <<
म्हणजे चित्रे आहेत तर :) !!
-- लिखाळ.
28 Jan 2009 - 4:52 pm | ब्रिटिश
लई ब्येष्ट,
चांगलच लीवलय
अवांतर : तुमच्यात आमाला सांमत दिसले, लेखांचे शतकाला शुभेच्छा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
28 Jan 2009 - 4:57 pm | स्वाती राजेश
दिल्ली चे वर्णन आणि फोटो मस्तच!!!!
पुढील भाग लवकरच येऊ देत....:)
28 Jan 2009 - 6:19 pm | शाल्मली
गुडगावची सचित्र भटकंती आवडली.
पुढची भटकंती लवकर टाका..
--शाल्मली.
28 Jan 2009 - 7:48 pm | वल्लरी
असेच म्हणते... :)
---वल्लरी
28 Jan 2009 - 8:48 pm | सुचेल तसं
छायाचित्रे आणि माहिती आवडली!!!
कीप इट अप!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
28 Jan 2009 - 9:18 pm | मदनबाण
मस्त फोटो आणि वर्णन...
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.
28 Jan 2009 - 9:29 pm | चतुरंग
अतिझपाट्याने झालेले मेट्रोकरण आणि ते न पेलवल्याने आलेली समृद्धीची सूज हा प्रकार मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी हैद्राबादमधे अनुभवला. तोच आता गुडगावला आलेला भासतो आहे पण आणखीनच आधुनिक पद्धतीने.
राजे, पुढल्या भागात लोकांबद्दल, एकंदर दैनंदिन जीवनाबद्दल थोडे विस्ताराने वाचायला आवडेल. तुम्ही बिझिनेसमधे आहात त्यामुळे पदोपदी लोकांचे येणारे अनुभव आमच्या ज्ञानात भर घालतील.
चतुरंग
28 Jan 2009 - 9:45 pm | संजय अभ्यंकर
दिल्ली ते दारुहेडा मार्गावर गुरगांव हे छोटे गांव लागत असे.
एकेकाळी हिरो होंडा, रिको ऑटो इ. कं दारुहेडात होत्या.
गुरगांवात, मारुति आली, हि.हों. आली, पण गुरगांवात बदल झालेले दिसले ते बी.पी.ओ., आय.टी. संस्कृती पासुनच.
आज गुरगांवा वरून जाताना माणूस दडपून जातो.
एकेकाळी आमचा चहा पाण्याचा थांबा ओळखण्या पलीकडे गेला.
अवांतर: राजे, आज गुरगांवात चहा कितीला मिळतो?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
29 Jan 2009 - 9:16 am | दशानन
>>आज गुरगांवा वरून जाताना माणूस दडपून जातो.
१००% सहमत.
मी गेली १० वर्ष गुडगाव मध्ये राहत आहे, गुडगाव चा हा अती विकास मी जवळ जवळ माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहीला आहे, डोळे दिपवणा-या ह्या शहराच्या मागचा भाग तसाच भयानक व भितीदायक आहे हे खरं आहे मी वर उल्लेख केला आहे संघटीत गुन्हेगारीचा पण त्याच बरोबर मागे वर्ष-दोन वर्षामागे लिफ्ट देऊन शंभर पासून हजारो साठी माणसांचे मुडदे पाडणारे ( कमीत कमी २५ हत्या... ज्यांची प्रेते सापडली नाहीत, ज्यांची माहीती नाही तो आकडाच वेगळा असावा) पण ह्या शहरांने पाहीले.
* चहा ;) फेमस ! अगदी टपरीवर ३-५ रुं... बाकी हॉटेल्स मध्ये दर दहा ८ रु. च्यावर गेला आहे !
* दारुहेडा
दाहरुहेडा , ह्याचा पण हाल गुडगावं सारखाचं पण जरा छोट्याप्रमाणात विकसित झालेले कारण एक हायवे सोडला तर वाहतुकीचे दुसरे साधन नाही, जसे रेल्वे, एअरपोर्ट जवळ नाही... असल्या कारणामुळे दाहरुहेडाचा सर्वांगीण विकास म्हणावा तसा झाला नाही पण मानेसर मध्ये देण्यालायक जागाच राहीली नाही म्हणून हरयाणा सरकारने दाहरुहेडा ला जमीन आवंटीत केली होती त्याचा फायदा त्या नगराला झालाच.
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 11:03 pm | अवलिया
राजे तुम्ही भारतभर फिरलेले दिसता...
जरा एकदा कलादालनात पण तुमच्या सहलीचे फोटो येवुद्या...
खजुराहोपासुन करा सुरवात... :)
--अवलिया
काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
29 Jan 2009 - 9:17 am | दशानन
:(
फिरलो भयानक पण फोटो काढण्याचं वेड मला कधीच नव्हतं (ह्याचे कारण, ह्म्म्म मी स्वतः फोटोजेनिक नाही आहे, माझे फोटो वाईट येतात हे असू शकेल.)
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
29 Jan 2009 - 10:04 am | मनस्वी
सचित्र सफर छान आहे.
29 Jan 2009 - 10:22 am | घाशीराम कोतवाल १.२
राजे तुमची भटकंती मिलींद गुणाजीच्या भटकंती सारखी उत्तोरोत्तर वाढत जाओ
आणी आम्हाला चांगले चांगले लेख वाचायला मिळो
आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा
हे जरा जुन आहे
30 Jan 2009 - 2:19 pm | बनी
:) खुप छान आहे लेख.....