भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
6 Mar 2009 - 2:35 pm

नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर. १९३९ मीटर उंची वर वसलेले हे शहर खरं तर इंग्रजाची देन भारताला, त्या जागेची सुंदरता व निसर्गांचा आविष्कार जगा समोर आणला ते पी बैरन ह्यांनी १९३९ मध्ये.

नैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.
शहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.

नैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे नाममात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.

पर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.

* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे.

प्रवाससमाजजीवनमानप्रकटनसंदर्भमाध्यमवेधमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Mar 2009 - 2:39 pm | अवलिया

लै भारी रे राज्जा

--अवलिया

सालोमालो's picture

6 Mar 2009 - 3:10 pm | सालोमालो

लई खास र भौ.

सालो

सहज's picture

6 Mar 2009 - 3:10 pm | सहज

दिल्लीहुन ५०० किमी च्या सर्व निसर्गरम्य प्रदेशात जाउन आलेले दिसता :-)

मस्त वर्णन! फोटो पाहुन तर मार्च मधले बुकिंग करावेसे वाटत आहे :-)

दशानन's picture

6 Mar 2009 - 3:12 pm | दशानन

हो !

मला फिरणं खुप आवडतं... आधी फोटोग्राफिचा छंद नव्हता पण आता आहे पुढील ट्रिप आहे पुढच्या महिन्यात तेव्हा फोटोची पण मेजवानी देतो ;)

मार्च पेक्षा जून मध्ये जा, हिरवळ चांगली असते त्यावेळि ;)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

विनायक प्रभू's picture

6 Mar 2009 - 3:49 pm | विनायक प्रभू

हिरवळ आवडते. लय भारी फोटु

दशानन's picture

6 Mar 2009 - 3:50 pm | दशानन

तुमची रसिकता माहित आहे आम्हाला पण ;)

झेल्या's picture

6 Mar 2009 - 3:17 pm | झेल्या

नितांत सुंदर नैनीताल...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

घाटावरचे भट's picture

6 Mar 2009 - 3:18 pm | घाटावरचे भट

खल्लास...नैनीतालला एकदा गेलंच पाहिजे.

मिंटी's picture

6 Mar 2009 - 3:21 pm | मिंटी

मस्तच रे...... राजे अजुन किती दिवस तुम्ही असे गुगलवरचे फोटो टाकणार आहात ???? पुढल्यावेळी स्वतः फोटु काढा आणि आम्हाला दाखवा..... :)

हा घे अजुन एक फोटो :

दशानन's picture

6 Mar 2009 - 3:37 pm | दशानन

मिंटे सुंदर फोटो :)

अजून आहेत का फोटो ?

सर्व फोटो येथेच टाक मग :)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मिंटी's picture

6 Mar 2009 - 3:44 pm | मिंटी

दशानन's picture

6 Mar 2009 - 3:51 pm | दशानन

सुंदर !

मिंटे तु काढले आहेस का ?

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मृगनयनी's picture

6 Mar 2009 - 4:30 pm | मृगनयनी

राजे आणि मिन्टे!

अ प्र ति म!!!

खूप सुन्दर आहे नयनी'ताल ( ;) )

आम्ही पण (नंतर) नैनीताल'लाच जाणार आहोत...! ;) ;)

इतक्या छान माहितीबद्दल आणि सुन्दर फोटोंसाठी शतश: धन्यवाद!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2009 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार

अ प्र ती म राजे :) डोळ्याचे पारणे फेडलेत !
तुमचा लेख वाचला आणी एकदम डोळ्यासमोर तालो मे नैनीताल बाकी सब तलय्या आले ;)
मागच्याच आठवड्यात या ठिकाणी नैनीतालचे काहि फोटो बघायला मिळाले होते आणी लगेचच तुमचा हा लेख आला, सोने पे सुहागा.
फुकटची मुशाफीरी घडवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

शितल's picture

6 Mar 2009 - 7:35 pm | शितल

राजे,
सुंदर फोटो नैनीतालचे.
मिंटीनीही काढलेले फोटो सुंदर. :)

शितल's picture

6 Mar 2009 - 7:36 pm | शितल

फोटो तुम्ही गुगलसेवे व्दारे घेतले असले तरी निवडक मस्त फोटो त्याबरोबर माहिती ही छान. :)

दशानन's picture

7 Mar 2009 - 9:40 am | दशानन

धन्यवाद, शितल.

उतरांचल व हिमाचल म्हणजे भारताचा स्वर्ग.
अनेक सुंदर ठिकाणे आहेत उतरांचल / हिमाचल मध्ये मागिल काही वर्ष भटकंती करतो पण फोटो खेचण्याचे वेड जवळ जवळ नव्हतं तेच व जे काही फोटो काढले होते ते एकदा हार्डडिस्क खराब झाली तेव्हा त्या बरोबर गेले :( त्यामुळे गुगलसेवा वापरावी लागत आहे.
पण डायरी लिहण्याच्या सवयीमुळे सर्व जागेची पुर्ण माहीती माझ्या कडे आहेच :)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

टारझन's picture

7 Mar 2009 - 11:14 am | टारझन

१. के व ळ अ प्र ति म !!
२. वा !!!
३. चालायचेच !!!

-(णिसर्गप्रेमी) टार्‍या

रश्मी's picture

7 Mar 2009 - 2:09 pm | रश्मी

खूपच सुंदर फोटो आहे.