मित्रहो,
कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची
लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का??
मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात.
मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर. मला स्वत:ला खिद्रापुरचे मन्दीर परत पहायच आहे. कारण आता त्याची स्मृती माझ्या मेन्दुतुन जास्तच पुसली गेली आहे. असे अनेक ठिकाण आहेत जे जावीच अशी आहेत.
कालच साप्ताहिक सकाळमधील एक लेख वाचला आणि जाणवल की अरे ह्यात मला माहित असलेल्या अनेक ठिकाणांची माहिती आहे की.
उदाहरणार्थ मसाई पठार. मी पैज लावु शकतो की ह्या विषयी कोणीच फारस ऐकलं नसेल.
हे पठार आणि त्यावर असलेली पांडव लेणी ही काहि वर्षापुर्वी (म्हणजे मी हाफ पॅन्ट घालुन शाळेत जात असताना) वादाच केंद्र झाल होत. त्यावेळीच काय त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते प्रकरण थंड झाल.
मी ती लेणी पाहिली आहे. माझ्या मावशीच्या गावापासुन फारतर ५-६ किमी चालत गेल की मसाई पठार लागत.
मी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आहे.
तर अशा अनेक ठिकाणांची माहिती देणारा हा लेख वाचाच. आणि ह्या ठिकाणाना देखील भेट द्या.
http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html
(ह्या लिन्क वर गेलात की तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापुर ह्यावर क्लिक करा.)
ह्या लेखात तरी एका किल्ल्याचा उल्लेख राहिला आहे. रांगणा किल्ला. इतिहासाच्या पुस्तकात नकाशात हे नाव पाहिल होत आणी त्यानंतर विसरुनच गेलो होतो ह्या किल्ल्याविषयी. हा फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला. ह्याची माहिती लोकसत्ता मध्ये भटकंती सदरात आली होती. गगनगडाच्या आसपास आहे हा.
राजे (जैनांच कार्टं) ह्यांच्या लेखमाला आपण वाचत आहातच. त्या परिसराचा उल्लेख देखील ह्या वरच्या लेखात आहे.
तसच वरच्या लेखात << कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे>> ही माहिती आहे.
कन्हेरी मठ बघणे हे मस्ट मस्ट आणि मस्टच आहे अस माझ मत झालय.
त्यानी तेथे वसवलेल गाव पाहुन मी अचंबीत झालो. खुप कष्ट घेतल आहे त्यासाठी त्या लोकानी. हे गाव बघण्यासाठी २५ रु तिकिट आहे पण ते खुपच कमी आहे असच वाटेल तुम्हाला. तिथे फोटो काढण्यास बन्दी आहे. पण त्यानी तिथेच एक बाग केली आहे त्याचे मी फोटो काढले आहेत.
त्यातील हे काही.
हे राशी उद्यान आहे. प्रत्येक राशीची माहिती आणि त्याच चिन्ह त्यानी बनवलेल आहे. हे चिन्ह बनवताना तीच पद्धत वापरली आहे जी त्या गावातले पुतळे बनवताना वापरली आहे. खालील फोटोत मेष रास दिसत आहे.
ही त्याच बागेतील बसण्याची व्यवस्था.
अजुन काहि फोटो पहायचे असतील तर ते खालील लिन्क वर आहेत.
http://picasaweb.google.com/zakasrao/KanheriMath?authkey=ZQsGxI7GWbU#
मग येणार ना कोल्हापुरला?? आणि हे सगळ पाहणार ना??
ह्यातील एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर बिन्धास्त विचारा मी देइनच.
नक्की या :)
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 7:40 am | प्राजु
झकासराव..
खूप दिवसांनी कणेरी मठातली चित्र पाहिली. बरं वाटलं.
लेख एकदम अफलातून. साप्ताहिक सकाळचा लेख जरा निवांतपणे वाचून मग सविस्तर प्रतिक्रिया लिहिन. :)
कोल्हापूर जिंदाबाद..
- (सर्वव्यापी आणि अस्सल कोल्लापूरी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Oct 2008 - 10:38 am | झकासराव
वरच्या लेखात अजुन एक भर म्हणजे
पावसाळ्यात बर्की नावाच्या गावात एक धबधबा सुरु होतो. तो देखील मस्त आहे अस ऐकल आहे.
कधी जाण्याचा योग नाही आला.
मसाई पठार हे पन्हाळ्याला लागुन ज्या डोन्गर रांगा आहेत त्यावरच आहे. (पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजावरुन ज्या डोन्गर रांगा दिसतात त्याच ह्या) मसाई हे देवीच नाव आहे आणि एक छोटस मन्दीर आहे वर.
त्याला पठार हे नाव देण्याच कारण हेच की तिथे अनेक फुटबॉल किंवा क्रिकेटचे मोठी मोठे स्टेडिअम होउ शकतील. :)
आम्ही कित्येक वेळा तिथे क्रिकेट खेळलो आहे.
प्रत्येक गावाला डोन्गर वाटून दिले आहेत. तिकडे त्या त्या गावचे गावकरी आपली गुर चरण्यास सोडतात. वर गवत भरपुर असतं.
अजुन एक तिथेच गुढ गोष्ट आहे. तिथल्या लोकांच म्हणण आहे की ती गुप्त नदी आहे. त्याचा उगम पांडव लेण्याच्या जवळ दाखवतात.
ती गुप्त नदी आहे की नाही ते माहीत नाही पण माझ्या मावस भावाने मला तिकडे एक जागा अशी दाखवली आहे तिथे आपण जर उडी मारली तर वेगळाच आवाज येतो. (पोकळ पृष्ठभागावर आघात झाल्यास येतो तसा घुमणारा आवाज) त्यावेळी आमचा राजा कुत्रा सोबत होता. तो तिथुन पळत सुटला तर घोड्यांच्या टापांचा आवाज येइल तसा आवाज येत होता. :)
हे गुढ काय आहे हे माहीत नाही.
साला, लयीच गोष्टी आठवल्या राव. :(
आता डिशेंबरात जातोच तिकडं. दोन दिवस नुसतीच भटकंती करतो.
साप्ताहिक सकाळमध्ये ज्या कोणी हा लेख लिहिला आहे त्याला माझा सलाम. कानाकोपर्यातली माहिती काढली आहे त्याने. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
15 Oct 2008 - 11:14 am | जैनाचं कार्ट (not verified)
ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे !
पन्हाळा ते जोतिबा डोंगरातून पैदल यात्रा केली होती तेव्हा काही जागी हाच अनुभव आला होता आमच्या ग्रुपला :)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Oct 2008 - 8:12 am | भाग्यश्री
वा.. मस्त माहीती.. कधी कोल्हापूरला जाणं झालं तर पाहीन.. चित्रं आणि सा.स. चा लेख आरामात वाचते..
15 Oct 2008 - 9:01 am | सागररसिक
कनेरि वदि पहन्य साथि मस्त अहे १ दिवस चागल जतो
15 Oct 2008 - 9:12 am | अनिरुध्द
कोल्हापूरच्या प्रेक्षणिय स्थळांची माहीती दिल्याबद्दल झकासरावांचे धन्यवाद. कोल्हापूर बघायला येण्या-या पर्यटकाला ही सगळी ठिकाणं माहीती नसतात. वरील माहीती मिळाल्यावर तरी पर्यटक तिकडे वळतील. बाग आणि शिल्पं छानचं आहेत.
15 Oct 2008 - 9:18 am | नाम्या झंगाट
कोल्हापुर मध्ये केन्ट क्लब झाला आहे....मिपा जाणकारा कडून माहिती मिळ्यालास उत्तम...!!!
(आमची माती,आमची माणसं )नाम्या झंगाट
15 Oct 2008 - 9:40 am | जैनाचं कार्ट (not verified)
वा झकास राव झकास माहीती !
आवडली !
मी देखील विचार करत होतोच की ह्यावेळी पुन्हा कोल्हापुर पुर्ण फिरायचं !
त्यात आता ही लिस्ट देखील !
* कोल्हापुर म्हणालं की.... रंकाळा.... पन्हाळा... जोतिबा हेच डोक्यात येतं अनेकांच्या.... त्याला फाटा देण्याची एक योजना तयार करत आहे लवकर प्रसिध्द करेन !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Oct 2008 - 9:46 am | संजय अभ्यंकर
कामा निमित्त कोल्हापूरला जायचा प्रसंग कधीमधी येतो.
परंतू आमची झेप, महालक्ष्मी मंदीर, पन्हाळा, जोतीबा या पलीकडे जात नाही.
दुसरी महत्वाची ठीकाणे म्हणजे, ओपल रेस्टॉरंट (तांबडा व पांढरा रश्श्या साठी प्रसिद्ध) आणी कावरे आईस्क्रीम.
झकासरावांनी त्यात आणखी स्थळांची भर घातली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
15 Oct 2008 - 6:33 pm | मनस्वी
माझं आवडतं शहर आहे कोल्हापूर. आता परत भेट दिलीच पाहिजे.
धन्यवाद झकासराव, लेख वाचून सविस्तर माहिती विचारेनच.
कोल्हापुरी चप्पल झिंदाबाद!
मनस्वी
15 Oct 2008 - 4:57 pm | विसोबा खेचर
झकासा, क्लास माहिती रे!
आपला,
(कलानगरीप्रेमी) तात्या.
15 Oct 2008 - 6:29 pm | गणा मास्तर
रंकाळा तलाव , पंचगंगा घाट आणि चंद्रकांत मांढरे कलादालन
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
15 Oct 2008 - 6:36 pm | रेवती
एकदा जायला पाहिजे कोल्हापूरला फक्त पर्यटनासाठी. नेहमी लग्नकार्याला जाणं होतं. तिथे लग्न, जेवण, अंबाबाईचं दर्शन आणि लगेच परत.
माहिती बद्दल धन्यवाद.
रेवती
15 Oct 2008 - 6:45 pm | शितल
झकासराव,
कोल्हापुरातील फिरती आता जवळ जवळ बंदच झाली आहे रेवती म्हणते तसे कार्यक्रम आणि पाहुणे आणि आई अंबाबाईचे मंदिर ह्या पलिकडे जाणे होत नाही रे.
पण कणेरी मठा, कात्यानी हे अगदी शाळेत असताना ट्रीपला गेलेली ठिकाणांची तु आठवण काढुन दिलीस मस्त वाटले.
आता कोल्हापुरला गेल्यावर नक्की हे गाव पाहुन येईन. :)