वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - आणखीन काही... (अंतिम भाग)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 7:45 am

१९७५ ते २०१५ या चाळीस वर्षांमधल्या ११ वर्ल्डकप्समधल्या अविस्मरणीय आणि थरारक अशा ४२ मॅचेसनंतर आणि वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्स ठरलेल्या मॅचेसबद्दल लिहील्यावर विचार करताना असं जाणवलं की अद्यापही बरंच काही बाकी राहीलेलं आहे. एखाद्या बॅट्समनची अप्रतिम इनिंग्ज, एखाद्या बॉलरचा अचूक आणि तितकाच घातक स्पेल, अप्रतिम आणि अविश्वसनीय फिल्डींग, एखाद्या कॅप्टनची कल्पनेपेक्षाही यशस्वी ठरलेली चाल किंवा बूमरँगप्रमाणे उलटलेला निर्णय अशा कित्येक गोष्टी वर्ल्डकपमध्ये घडल्या आहेत. अनेकदा या खेळाडूंच्या या अफलातून वैयक्तीक कामगिरीमुळे मॅच कमालीची एकतर्फी झाली असेल किंवा मॅचच्या निकालावर कोणताही परिणाम झालाही नसेल, परंतु कोणत्याही फूटपट्टीने मोजली तरी या खेळाडूंची कामगिरी तसूभरही कमी होत नाही!

वर्ल्डकपमधल्या कोणत्याही नकोशा वाटणार्‍या रेकॉर्डची सुरवात ही बहुतेकदा भारतापासूनच होते! मग ते १९७९ मध्ये श्रीलंकेकडून जायंट किलींगचा बळी ठरणं असो किंवा टेस्ट खेळणार्‍या देशाच्या नशिबी एकही मॅच न जिंकता वर्ल्डकपमधून परतण्याची नामुष्की असो. असं असताना इथेही भारतीय खेळाडू मागे कसे राहतील?

१९७५ च्या पहिल्याच वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये लॉर्ड्सवर डेनिस एमिसने वर्ल्डकपच्या इतिहासातली पहिली सेंचुरी ठोकली! एमिसची सेंचुरी आणि कीथ फ्लेचर - क्रिस ओल्ड यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने ६० ओव्हर्समध्ये ३३४ रन्स फटकावल्या...

....आणि उत्तरादाखल सुनिल गावस्कर ६० ओव्हर्समध्ये १७४ बॉल्समध्ये ३६ रन्स काढून नॉटआऊट राहीला!

गावस्करच्या या अतिभयानक कूर्मगती इनिंग्जमुळे वैतागलेल्या प्रेक्षकांनी अनेकदा मैदानावर धाव घेऊन त्याला आक्रमक फटकेबाजीचा प्रयत्नं करण्याची कळकळीने विनंती केली, पण गावस्कर बधला नाही! ६० ओव्हर्समध्ये भारताने जेमतेम १३२ पर्यंत मजल मारली!

या पराक्रमानंतर गावस्करवर टीकेची झोड उठणार यात कोणतीही शंका नव्हती. तशी ती उठलीही...

भारतीय संघाचा मॅनेजर गुलाबराय रामचंद म्हणाला,
"It was the most disgraceful and selfish performance I have ever seen… his excuse was, the wicket was too slow to play shots but that was a stupid thing to say after England had scored 334. Our national pride is too important to be thrown away like this."

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इंग्लंडचा भूतपूर्व कॅप्टन टेड डेक्स्टर म्हणाला,
"Gavaskar should have been pulled from the field by his captain. Nothing short of a vote of censure by the ICC would have satisfied me if I had paid good money through the turnstiles only to be short-changed by such a performance."

खुद्दं गावस्कर पुढे कित्येक वर्षांनी त्याबद्दल बोलताना म्हणाला,
"It is something that even now I really can't explain. There were occasions I felt like moving away from the stumps so I would be bowled. I couldn't force the pace and I couldn't get out. I keep tossing and turning around about it now. I asked myself, 'Why the hell did I not walk the second ball? I was caught behind and would have been out for zero, but nobody appealed. That little moment of hesitation got me so much flak all these years."

नेमक्या त्याच दिवशी एजबॅस्टनला ग्लेन टर्नरने ईस्ट आफ्रीकेविरुद्ध २०१ बॉल्समध्ये १७१ रन्स फटकावत रेकॉर्ड इनिंग्ज खेळली होती!

गावस्करने १७४ बॉल्समध्ये ३६ रन्स काढल्यावर ३९ वर्षांनी रोहीत शर्माने १७३ बॉल्समध्ये २६४ रन्स झोडपून काढल्या! गावस्करपेक्षा १ बॉल कमी खेळून तब्बल २२८ रन्स जास्तं फटकावणार्‍या दोन्ही इनिंग्जची तुलनाही करणं हास्यास्पद वाटते!

परंतु सर्वात लक्षवेधक ठरली ती ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातल्या मॅचमध्ये अल्विन कालीचरणने डेनिस लिलीची केलेली धुलाई!

ओव्हलवर झालेल्या या मॅचमध्ये गॉर्डन ग्रिनिज आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला कालिचरण सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेऊन ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावत होता पण दुसर्‍या स्पेलसाठी लिली बॉलिंगला परतल्यावर कालिचरण त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला! हूक, पूल, कट् आणि ड्राईव्हचा मनसोक्तं वापर करत त्याने लिलीच्या १० बॉल्समध्ये ३५ रन्स झोडपून काढल्या...

४, ४, ४, ४, ४, १, ४, ६, ०, ४!

अखेर लिलीच्याच बॉलवर हूक मारताना त्याची टॉप एज लागल्यावर मिडविकेटला अ‍ॅश्ली मॅलेटने त्याचा कॅच घेतला!
लिलीची अशी धुलाई त्यापूर्वी कधी झाली नाही आणि त्यानंतरही नाही!

१९७९ च्या वर्ल्डकपमध्ये हेडींग्लीच्या मैदानात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातल्या ग्रूपमधल्या अखेरच्या मॅचमध्ये दोन्ही संघांसमोर एकच उद्दीष्टं होतं. ही मॅच जिंकून ग्रूपमध्ये पहिलं स्थान मिळवून सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजशी मुकाबला टाळणं! पण सिकंदर बख्त आणि चक्कं माजिद खानच्या पार्टटाईम ऑफस्पिनपुढे इंग्लंडची ११८ / ८ अशी हालत झाली असताना बॉब विलीसने २४ रन्स फटकावत इंग्लंडचा स्कोर १६५ पर्यंत नेला! माजिद खान आणि सादीक महंमद यांनी २७ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर माईक हेंड्रीकने सूत्रं हातात घेतली आणि स्विंग आणि सीमचा अफलातून वापर करत १२ ओव्हर्समध्ये केवळ १५ रन्स मध्ये माजिद, सादीक, मुदस्सर नजर आणि हरुन रशीद यांना गुंडाळलं! इयन बोथमने झहीर अब्बास आणि जावेद मियांदादच्या विकेट्स घेतल्याने पाकिस्तानची अवस्था ३४ / ६ अशी झाली! पण अद्यापही हेंड्रीकचं समाधान झालेलं नव्हतं. आसिफ इक्बालने ५१ रन्स फटकावत पाकिस्तानची गाडी रुळावर आणल्यावर जेफ्री बॉयकॉटच्या (!) बॉलवर मिडऑफला हवेत जंप मारत सिकंदर बख्तचा कॅच घेत त्याने पाकिस्तानची इनिंग्ज आटपली!

१९८३ चा वर्ल्डकप किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने एखाद्या दु:स्वप्नासारखा होता. पहिल्या मॅचमध्ये झिंबाब्वेचा कॅप्टन डंकन फ्लेचरच्या ६४ रन्स आणि ४ विकेट्सनी त्यांना अनपेक्षितपणे १३ रन्सनी पराभवाचा धक्का बसला होता. सेमीफायनल गाठण्यासाठी ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत मॅच जिंकणं ऑस्ट्रेलियाला भाग होतं. भारताविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ट्रेव्हर चॅपलच्या ११० रन्स आणि केन मॅकलेच्या ६ विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने आरामात भारताला धूळ चारली होती. पण कॅप्टन किम ह्यूज नेमका जखमी झाल्याने या मॅचमध्ये खेळू शकला नाही आणि भारताने २५२ रन्स काढल्यावर रॉजर बिन्नीच्या अचूक स्विंगने ऑस्ट्रेलियाचं साफ वाटोळं झालं...

ग्रॅहॅम वूडचा कॅच सय्यद किरमाणीने घेतला..
त्याच ओव्हरमध्ये डेव्हीड हूक्सचा ऑफस्टंप उडाला...
पुढच्या ओव्हरमध्ये ग्रॅहॅम यालपचा स्वतः बिन्नीनेच कॅच घेतला...
टॉम होगनचा श्रीकांतने कॅच घेतला!

बिन्नीला जोरदार साथ देत मदनलालने अ‍ॅलन बॉर्डर, रॉडनी मार्श, केन मेकले आणि जेफ थॉमसनला गुंडाळत ऑस्ट्रेलियाचा साफ कचरा केला!

.... पण ऑस्ट्रेलियाला खर्‍या अर्थाने हादरवलं होतं ते विन्स्टन डेव्हीसने!

वेस्ट इंडी़जविरुद्ध हेडींग्लीच्या मॅचमध्ये २५३ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मायकेल होल्डींगचा बंपर डोक्यावर आदळल्याने ग्रॅहॅम वूडला रिटायर होऊन हॉस्पिटलची वाट धरावी लागली होती. अँडी रॉबर्ट्सने केपलर वेसल्सची दांडी उडवल्यावर किम ह्यूज आणि डेव्हीड हूक्स यांनी ३७ रन्सची पार्टनरशीप केली पण लॉईडने डेव्हीसच्या बॉलवर ह्यूजचा कॅच घेतला. परंतु हूक्स आणि ग्रॅहॅम यालप यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर ११४ पर्यंत नेल्यावर दुसर्‍या स्पेलसाठी परतलेल्या डेव्हीसने अक्षरशः धुमाकूळ घातला...

मायकेल होल्डींगने यालपचा कॅच घेतला...
हूक्स विकेटकीपर जेफ्री दुजाँच्या हातात सापडला...
केन मॅकलेचा कॅच शॉर्टलेगला डेस्मंड हेन्सने घेतला...
जेफ लॉसन पुन्हा दुजाँच्या हातात सापडला...
अ‍ॅलन बॉर्डरचा कॅच लॉईडने घेतला...
डेनिस लिलीचा मिडलस्टंप उडाला!

विन्स्टन डेव्हीसने ५१ रन्समध्ये ७ विकेट्स उडवल्या होत्या!
वर्ल्डकप आणि वन डे क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये ७ विकेट्स घेणारा डेव्हीस हा पहिलाच बॉलर!

१९८७ च्या वर्ल्डकपमध्ये गुजरानवाला इथे वेस्ट इंडीजच्या २४४ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडची १३१ / ६ अशी अवस्था झाली होती. पण चाणाक्षं अ‍ॅलन लॅम्बने जॉन एम्बुरीबरोबर ३१ आणि फिलीप डिफ्रीटासबरोबर ४७ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडचं आव्हान कायम ठेवलं होतं. शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये ३४ रन्सची आवश्यकता असताना पहिल्याच वर्ल्डकपमध्ये खेळणार्‍या कॉर्टनी वॉल्शच्या ओव्हरमध्ये लॅम्बने १५ रन्स फटकावून काढल्या! पॅट्रीक पॅटरसनच्या अचूक बॉलिंगमुळे ४९ व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला केवळ ५ रन्स मिळाल्या असल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये वॉल्शच्या बॉलिंगवर लॅम्ब आणि नील फोस्टरने आवश्यक त्या १४ रन्स काढत कोणाच्या ध्यानीमनी नसताना मॅच जिंकली!

याच वर्ल्डकपमध्ये बँगलोरला न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ४२ व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोर १७० / ७ असताना कपिल देव आणि किरण मोरे यांनी न्यूझीलंडच्या बॉलर्सची धुलाई करत शेवटच्या ८.३ ओव्हर्समध्ये ८२ रन्स झोडपून काढल्या होत्या! मजा म्हणजे कपिलपेक्षा किरण मोरेने न्यूझीलंडच्या बॉलर्सवर हल्ला चढवत २६ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह ४२ रन्स फटकावून काढल्या होत्या! भारताने केवळ १६ रन्सनी ही मॅच जिंकल्यामुळे कपिल आणि मोरेची ही पार्टनरशीपच निर्णायक ठरली होती. विली वॉटसनच्या ओव्हरमध्ये मोरेने कव्हर्समधून दोन बाऊंड्री ठोकल्यावर कॉमेंट्री करताना रवी चतुर्वेदी म्हणाला, "बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान अल्ला!"

रवी चतुर्वेदी आठवतो का?
'चारो तरफ हरीयाली छाई हुई है', 'हरी हरी घास सुहावनी लगती है' आणि 'नपीतुली बॉलिंग' असले अफाट शब्दप्रयोग करणारा हाच तो महाभाग!

सेमीफायनलमध्ये ग्रॅहॅम गूचने ११ बाऊंड्रीसह ११५ रन्स फटकावत करोडो भारतीयांचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्नं शब्दशः स्वीप केलं!
अर्थात गूचच्या सेंचुरीइतकाच अंपायर टोनी क्राफ्टरचा चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देणारा निर्णयही इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत होता!

... पण या वर्ल्डकपमधली सर्वात अफलातून इनिंग्ज खेळून गेला तो व्हिव्हियन रिचर्ड्स!

गुजरानवालाच्या मॅचमध्ये अ‍ॅलन लॅम्बच्या फटकेबाजीमुळे अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागल्यामुळे आधीच वैतागलेल्या रिचर्ड्सला रवी रत्नायकेने कार्लाईल बेस्ट आणि रिची रिचर्ड्सनला लागोपाठच्या बॉल्सवर गुंडाळल्याने बॅटींगला आल्यावर आधी हॅटट्रीक होणार नाही याची काळजी घावी लागली होती. एकदा हे काम उरकल्यावर आणि पहिल्या ५० रन्स काढण्यासाठी ६२ बॉल्स खर्ची घातल्यावर रिचर्ड्स 'सुटला' आणि श्रीलंकेच्या बॉलर्सची अक्षरशः दैना झाली! १२५ बॉल्समध्ये १६ बाऊंड्री आणि ७ सिक्स ठोकत श्रीलंकेच्या बॉलर्सची मनसोक्त धुलाई करत रिचर्ड्सने १८१ रन्स झोडपून काढल्या. अशांथा डी मेलच्या बॉलवर त्याची टॉप एज रोशन महानामाच्या हातात गेली नसती तर वन डे मधली पहिली डबल सेंचुरी रिचर्ड्सच्याच नावावर जमा झाली असती!

१९९२ च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच्य मॅचमध्ये मार्टीन क्रोने दिलेल्या दणक्यानंतर अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियाची दुसरी मॅच होती ती दक्षिण आफ्रीकेशी. अ‍ॅलन डोनाल्ड, रिचर्ड स्नेल आणि ब्रायन मॅकमिलनच्या अचूक बॉलिंगने ऑस्ट्रेलियाला १७० मध्ये रोखल्यावर १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या केपलर वेसल्सच्या ८१ रन्सच्या स्लो पण शांत डोक्याने खेळलेल्या इनिंग्जमुळे ऑस्ट्रेलियाच्या पदरी सलग दुसरा पराभव पडला. दोन वेगवेगळ्या देशांसाठी वन डे आणि वर्ल्डकपमध्ये खेळलेला केपलर वेसल्स हा पहिलाच खेळाडू!

याच वर्ल्डकपमध्ये सिडनीच्या मैदानात प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांची गाठ पडली. सचिन आणि कपिल यांच्या ८ ओव्हर्समधल्या ६० रन्सच्या पार्टनरशीपनंतर आमिर सोहेल आणि जावेद मियांदाद यांनी ८८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर सचिनच्या बॉलवर श्रीकांतने सोहेलचा कॅच घेतला आणि पाकिस्तानची इनिंग्ज गडगडली. याच मॅचमध्ये किरण मोरेशी वाद झाल्यानंतर जावेदने बेडूकउड्या मारल्या होत्या! तसंच श्रीनाथने अचूक यॉर्कर टाकत जावेदची दांडी उडवली ती याच मॅचमध्ये!

भारत - पाकिस्तान मॅचनंतर सिडनीच्याच मैदानात दुसर्‍याच दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या अ‍ॅशेसमधल्या पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांची गाठ पडली! अखेरच्या वर्ल्डकपमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियाला शेवटचा दणका देण्याची संधी सोडेल तर तो बोथम कसला? स्टीव्ह वॉ आणि बॉर्डर आरामात खेळत असताना बॉलिंगला आल्यावर बोथमने बॉर्डरचा मिड्लस्टंप उडवला आणि पुढच्या ओव्हरमध्ये इयन हिली, पीटर टेलर आणि क्रेग मॅकडरमॉट या तिघांना गुंडाळलं! पण एवढं झाल्यावरही बोथमचं समाधान झालं नव्हतं. ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज १७१ मध्ये आटपल्यावर ७७ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ५३ रन्स फटकावत ग्रॅहॅम गूचबरोबर १०७ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करत त्याने ऑस्ट्रेलियाचा पुरता बंदोबस्तं करुन टाकला!

इमरान खान आणि जावेद मियांदाद यांच्यात एक खास नातं आहे. पाकिस्तानातल्या लाहोर विरुद्ध कराची किंवा पंजाब विरुद्ध सिंध या प्रांतिक वैमनस्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या या दोघांमध्ये 'तुझं-माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना' अशी एक 'लव्ह-हेट' रिलेशनशीप कायम आहे! अगदी इतक्या वर्षांनंतरही परस्परांविषयी दोघं फारसं चांगलं बोलताना आढळत नाहीत आणि आढळलेच तर त्यात तिरकस टीकेचा सूर असतोच असतो!

...परंतु वर्ल्डकपच्या फायनलमध्ये डेरेक प्रिंगलने आमिर सोहेल - रमिझ राजा यांना २४ रन्समध्ये गुंडाळल्यावर इमरान - जावेद यांनीच १३९ रन्सची पार्टनरशीप करुन पाकिस्तानची इनिंग्ज सावरली. इंझमाम आणि वासिम अक्रमच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानने २४९ पर्यंत मजल मारल्यावर वासिम अक्रमच्या बॉलवर बोथमचा कॅच घेतल्याचं पाकिस्तानी खेळाडूंचं अपिल अंपायर स्टीव्ह बकनरने उचलून धरलं...

अगदी आजही आपली एज लागली नव्हती यावर बोथम ठाम आहे!

१९८४ मध्ये "Pakistan is the kind of place to send your mother-in-law for a month, all expenses-paid." अशी कुजकट कॉमेंट करणार्‍या बोथमला तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना आमिर सोहेलने "Why don't you send your mother-in-law out to play, she cannot do much worse!" असं सुनावलं होतं!

आणि नील फेअरब्रदर आणि अ‍ॅलन लॅम्ब यांनी ७२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अक्रमने टाकलेले ते दोन बॉल्स...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या अक्रमचा लॅम्बला पडलेला बॉल ऑफस्टंपवर पडला आणि आऊटस्विंग झाला...
लुईसला पडलेला बॉल ऑफस्टंपच्या किमान दोन फूट बाहेर पडला आणि इनस्विंग होऊन ऑफस्टंपवर गेला...

फेअरब्रदर म्हणतो,
"I had played for fair amount of time alongside Waz in Lancashire. I knew exactly what he would do and told Lambie to watch out for. Waz did exactly the same and knocked over Lambie and Cris Lewis!"

... पण या वर्ल्डकपमधला Moment of the World Cup म्हणजे जाँटी र्‍होड्सने बॉलसकट स्टंपवर घेतलेली झेप...

ब्रायन मॅकमिलनचा बॉल बॅकवर्ड पॉईंटला गेलेला असताना लेगबाय काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंझमामला इमरानने परत पाठवलं आणि तो क्रीजमध्ये परतण्यापूर्वी र्‍होड्सने बॉलसकट स्टंपवर मारलेली झड्प आणि उखडलेले तीनही स्टंप्स...

र्‍होड्सच्या या अचाट पराक्रमामुळे रनआऊट होणारा बॅट्समन म्हणून इंझमाम खेरीज दुसरा कोणीही शोभून दिसला नसता!

ब्रायन मॅकमिलन म्हणाला,
"I was appealing for lbw, but out of the corner of the eye I saw Jonty diving in. I'd never seen a bloke dive at the wickets ever before!"

स्वतः जाँटी र्‍होड्स म्हणाला,
"There was a 50% chance that I'd hit the stumps if I threw, and a 100% chance of hitting the stumps with ball in hand. The fastest way I could cover the last metre and a half was head-first. It was just the right thing to do at the time."

१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये रावळपिंडीला गॅरी कर्स्टनने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १३ बाऊंड्री आणि ४ सिक्स ठोकत १८८ रन्स फटकावत वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्तं रन्सचा रिचर्ड्सचा विक्रम मोडीत काढला. याच मॅचमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा कॅप्टन सुलतान झरवाणी बॅटींगला येताना हेल्मेटऐवजी टोपी घालून आला आणि अ‍ॅलन डोनाल्डचा बॉल डोक्यावर लागल्यावर त्याला हॉस्पिटलची वाट धरावी लागली!

विशाखापट्टणमला मार्क आणि स्टीव्ह या जुळ्या वॉ बंधूंनी केनियाविरुद्ध २०० रन्सची पार्टनरशीप केली! पाठोपाठ मुंबईच्या मॅचमध्ये भारताविरुद्ध सेंचुरी ठोकत वर्ल्डकपमध्ये सलग २ मॅचेसमध्ये २ सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड मार्क वॉने केला. याच मॅचमध्ये ग्लेन मॅकग्राथच्या पहिल्या ३ ओव्हर्स मेडन गेल्यावर उरलेल्या ५ ओव्हर्समध्ये सचिनने त्याची धुलाई करत ४८ रन्स फटकावल्या होत्या! मार्क वॉच्या वाईड बॉलवर इयन हिलीने सचिनला ९० वर स्टंप केलं आणि भारताच्या पदरी पराभव आला!

दिल्लीला फिरोजशाह कोटलावर सनथ जयसूर्याने केलेल्या धुलाईनंतर बिचार्‍या मनोज प्रभाकरवर ऑफ स्पिन टाकण्याची वेळ आली! आधीच प्रभाकरशी उभा दावा असलेल्या अझरुद्दीनला त्याला ड्रॉप करण्यासाठी आयतंच निमित्तं मिळालं आणि या मॅचबरोबरच प्रभाकरचं करीअर संपुष्टात आलं! जयसूर्याच्या आतषबाजीमुळे क्वार्टरफायनलमध्ये फैसलाबादला फिलीप डिफ्रीटासवरही ऑफब्रेक्स टाकण्याची वेळ आली होती!

मद्रासच्या क्वार्टरफायनलमध्ये क्रिस हॅरीसने ठोकलेली सेंचुरी आणि त्याची कॅप्टन ली जरमॉनबरोबरची १६८ रन्सची पार्टनरशीपही अशीच अविस्मरणीय होती. ऑस्ट्रेलियन बॉलर्सना - खास करुन ग्लेन मॅकग्राथला फटकावून काढत हॅरीसने त्याला ४ दणदणीत सिक्स ठोकल्या होत्या! जरमॉन आऊट झाल्यावर न्यूझीलंडची इनिंग्ज गडगडली आणि मार्क वॉने वर्ल्डकपमधली तिसरी सेंचुरी ठोकत ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये नेलं!

सेमीफायनलमध्ये कलकत्त्याला जयसूर्या आणि कालुवितरणा पहिल्या ओव्हरमध्ये आऊट झाल्यावर अरविंदा डिसील्वाची ४७ बॉल्समध्ये १४ बाऊंड्रीसह ६६ रन्सची इनिंग्ज निव्वळ स्वप्नवत होती! श्रीलंकेने २५१ पर्यंत मजल मारल्यावर सचिन खेळत असेपर्यंत भारत ९८ / १ अशा सुस्थितीत होता, पण जयसूर्याच्या बॉलवर सचिन स्टंप झाला आणि भारताची ९८ / १ वरुन १२० / ८ अशी अवस्था झाल्यावर कलकत्त्याच्या प्रेक्षकांचा संताप आणि निराशा अनिवार झाली आणि त्यांनी हाताला लागतील त्या वस्तू मैदानात भिरकावण्यास आणि जाळण्यास सुरवात केली! प्रेक्षकांच्या या अत्यंत लाजिरवाण्या आणि तिरस्कारणीय वर्तणुकीनंतर मॅच रेफ्री क्लाईव्ह लॉईडने श्रीलंकेला मॅच बहाल केल्यावर मैदानातून परतणार्‍या विनोद कांबळीला अश्रू आवरत नव्हते....

तब्बल १५ वर्षांनी अझरुद्दीनने ही मॅच फिक्स केल्याचा कांबळीने आरोप केला होता!

फायनलमध्येही जयसूर्या - कालुवितरणा अपयशी ठरल्यावर अरविंदा डिसील्वाने १२४ बॉल्समध्ये १३ बाऊंड्रीसह सेंचुरी ठोकत असांका गुरुसिंघेबरोबर १२५ आणि कॅप्टन अर्जुना रणतुंगाबरोबर ९७ रन्सची पार्टनरशीप करुन वर्ल्डकप जिंकला! अर्जुना रणतुंगा हा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मॅच जिंकणार्‍या रन्स काढणारा पहिला बॅट्समन होता!

१९९९ च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यावर प्रा. रमेश तेंडुलकरांच्या आकस्मिक निधनामुळे भारतात परतलेल्या सचिनच्या अनुपस्थितीत झिंबाब्वेने भारताचा पराभव केला. वडीलांच्या अंत्यसंस्कारानंतर पुन्हा इंग्लंडला परतलेल्या सचिनने केनियाविरुद्ध सेंचुरी ठोकल्यावर आकाशात पाहून बॅट उंचावली तेव्हा जवळपास सर्व देश भावनावश झाला होता. सचिनने त्याच्या पद्धतीने वडीलांना वाहीलेली ही श्रद्धांजली होती. सचिनच्या या भावनात्मक सेंचुरीमुळे त्याच मॅचमध्ये राहुल द्रविडनेही फटकावलेली सेंचुरी जवळपास विस्मृतीतच गेली!

टाँटनला श्रीलंकेविरुद्ध सदगोपन रमेश पहिल्या ओव्हरमध्ये आ़ऊट झाल्यावर सौरव गांगुली आणि द्रविड यांनी श्रीलंकन बॉलर्सची मनसोक्तं धुलाई करत ४५ ओव्हर्समध्ये ३१८ रन्सची वन डे आणि वर्ल्डकपमधली रेकॉर्ड पार्टनरशीप केली! गांगुलीने १५८ बॉल्समध्ये १७ बाऊंड्री आणि ७ सिक्ससह झोडपलेल्या १८३ रन्स या गॅरी कर्स्टनच्या १८८ रन्सनंतर वर्ल्डकपमधला सर्वाधीक स्कोर होता! १४५ रन्स फटकावणारा द्रविड हा मार्क वॉ नंतर वर्ल्डकपमध्ये सलग २ मॅचेसमध्ये २ सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम करणारा दुसरा बॅट्समन!

ऑस्ट्रेलियाची या वर्ल्डकपमधली प्रगती अडखळतच सुरु होती. पहिल्या मॅचमध्ये स्कॉटलंडचा पराभव केल्यावर न्यूझीलंड आणि पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. बांग्लादेशविरुद्धची मॅच जिंकल्यावरही सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाला ओल्ड ट्रॅफर्डवर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं!

मॅचपूर्वी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दडपण आणणं आणि मॅचदरम्यान स्लेजिंग करण्यात सर्वात उस्ताद ऑस्ट्रेलियन म्हणजे ग्लेन मॅकग्राथ!

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचपूर्वी पेपरात लिहीलेल्या लेखात मॅकग्राथने दावा केला,
"I'd take care of the worrying threat of Brian Lara and grab five wickets."

वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी मॅकग्राथच्या दाव्याकडे फारसं लक्षं दिलं नसलं तरी मॅकग्राथने आपले शब्दं खरे करुन दाखवले! शरवीन कँपबेल आणि जिमी अ‍ॅडम्स यांना लागोपाठच्या बॉलवर आऊट केल्यावर ब्रायन लाराने त्याची हॅटट्रीक होऊ दिली नाही, पण लाराने ९ रन्स काढल्यावर मॅकग्राथने त्याचा ऑफस्टंप उडवला! मर्व्हन डिलन आणि कॉर्टनी वॉल्श यांच्या विकेट्स घेत मॅकग्राथने बोलल्याप्रमाणे ५ विकेट्स उडवल्या! मॅकग्राथ वेस्ट इंडीजची बॅटींग उध्वस्तं करत असताना कँपबेलबरोबर ओपनिंगला आलेला रिडली जेकब्स ४९ रन्स काढत शेवटपर्यंत नॉटआऊट राहीला. वर्ल्डकपमध्ये ओपनिंगला येऊन शेवटपर्यंत नॉटआऊट राहीलेला तो पहिला बॅट्समन!

केवळ १११ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी तब्बल ४१ ओव्हर्स खर्ची घातल्या!
न्यूझीलंडच्या ऐवजी वेस्ट इंडीजला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळावा या हेतूने ऑस्ट्रेलियाने मुद्दामच कूर्मगती बॅटींग केली होती!
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह वॉने तसं उघडपणे मान्यं केलं होतं!
वेस्ट इंडीजला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळाल्यास ऑस्ट्रेलियाला त्यांच्याविरुद्ध मिळालेले २ पॉईंट्स सुपर सिक्समध्ये नेता येणार होते!
परंतु ऑस्ट्रेलियाचा बेत अखेर बारगळला आणि न्यूझीलंडने सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवलाच!

ओल्ड ट्रॅफर्डवरच सुपर सिक्समध्ये भारताने पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये तिसर्‍यांदा खडे चारले!
पाकिस्तानी बॅट्समनना सदैव त्रासदायक ठरलेल्या वेंकटेश प्रसादने या मॅचमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या!

सुपर सिक्समध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये ३०३ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रीकेला एकहाती नमवणार्‍या नील जॉन्सनने १३२ रन्स फटकावल्या, पण तो झिंबाब्वेचा पराभव टाळू शकला नाही! वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधीक रन्सची इनिंग्ज खेळण्याचा रेकॉर्ड नील जॉन्सनच्याच नावावर आहे!

फायनलमध्ये लॉर्ड्सवर पहिल्या २ विकेट्स गेल्यावर एजाज अहमद आणि अब्दुल रझाक यांनी ४७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर शेन वॉर्नने एजाज अहमद, मोईन खान, शाहीद आफ्रिदी आणि वासिम अक्रम यांच्या विकेट्स उडवत पाकिस्तानच्या बॅटींगचं पार वाटोळं केलं! १३४ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना अ‍ॅडम गिलख्रिस्टने ३६ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह ५४ रन्स फटकावत पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा धुळीस मिळवल्या. अर्जुना रणतुंगानंतर डॅरन लिहमन हा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मॅच जिंकण्यासाठीच्या रन्स काढणारा दुसरा बॅट्समन ठरला!

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये तर अनेक खेळाडूंनी एकापेक्षा एक पराक्रम गाजवले...

ब्ल्यूफोंटेनला श्रीलंकेच्या २७३ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना दुसर्‍याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडची २ / २ अशी अवस्था झालेली असताना स्कॉट स्टायरीसने १२५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि ६ सिक्स ठोकत १४१ रन्स झोडपून काढल्या पण क्रिस केर्न्स (३२) वगळता इतर कोणीच त्याच्याबरोबर न खेळल्याने तो न्यूझीलंडला विजय मिळवून देवू शकला नाही.

वर्ल्डकपच्या सुरवातीलाच शेन वॉर्नला बॅन करण्यात आल्यामुळे धक्का बसलेल्या ऑस्ट्रेलियाची जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर पाकिस्तानविरुद्ध ८६ / ४ अशी अवस्था झाली होती. कॅप्टन रिकी पाँटींगने ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सच्या खनपटीला बसून संघात निवड केलेला अँड्र्यू सायमंड्स बॅटींगला आल्यावर पाँटींग त्याला म्हणाला,

"Promise me you will be here till end of 50 overs!"

सायमंड्स पाँटींगला दिलेल्या शब्दाला जागत १२५ बॉल्समध्ये १८ बाऊंड्री आणि २ सिक्स ठोकत १४३ रन्स फटकावत नॉटआऊट राहीला!
ऑस्ट्रेलियाच्या ३११ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करणार्‍या पाकिस्तानची इनिंग्ज २२८ मध्ये आटपली!

पीटरमॅरीझबर्गला चामिंडा वासने एक वेगळाच पराक्रम केला...

पहिला बॉल टप्पा पडल्यावर इनस्विंग झाला आणि हन्नान सरकारच्या बॅट आणि पॅड मधून ऑफस्टंपवर आदळला...
दुसर्‍या स्लो बॉलवर स्वत: वासनेच महंमद अश्रफूलचा कॅच घेतला...
तिसर्‍या बॉलवर वासच्या आऊटस्विंगरवर एहसानुल हकची एज लागली आणि स्लिपमध्ये महेला जयवर्धनेने कॅच घेतला!

मॅचच्या पहिल्या ३ बॉल्सवर विकेट्स घेत वासने हॅटट्रीक घेतली होती!
वन डे मध्ये आणि अर्थातच वर्ल्डकपमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिलाच बॉलर होता!

पण हॅटट्रीक घेतल्यावरही वासचं समाधान झालं नव्हतं!
शेवटच्या बॉलवर त्याने सन्वर हुसेनला एलबीडब्ल्यू केलं!
पहिल्या ओव्हरनंतर बांग्लादेशची अवस्था होती ५ / ४!

जोहान्सबर्गच्या वाँडरर्सवर दक्षिण आफ्रीकेच्या ३०७ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कॅप्टन स्टीफन फ्लेमिंगने १३२ बॉल्समध्ये २१ बाऊंड्री फटकावत १३४ रन्स झोडपल्या! डकवर्थ-लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा विजय झाल्यावर दक्षिण आफ्रीकेच्या वर्ल्डकपच्या आकांक्षाना जोरदार धक्का बसला!

पण खरी धमाल झाली ती सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर...

कॅनडाचा ओपनिंग बॅट्समन जॉन डेव्हीसनने वेस्ट इंडीजच्या बॉलर्सची धुलाई करत ७६ बॉल्समध्ये ८ बाऊंड्री आणि ६ सिक्स ठोकत १११ रन्स झोडपून काढल्या! परंतु व्हॅसबर्ट ड्रेक्सने लाँगऑनला डाईव्ह मारत त्याचा अफलातून कॅच घेतला आणि त्यानंतर कॅनडाची इनिंग्ज २०२ रन्समध्ये कोसळली! वेस्ट इंडीजला सुपर सिक्स गाठण्याच्या दृष्टीने आपला रनरेट वाढवण्याची आवश्यकता असल्याने क्रिस गेल आऊट झाल्यानंतर ३१ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि ३ सिक्ससह ६४ रन्स काढणारा वेव्हल हाईंड्स आणि ४० बॉल्समध्ये ८ बाऊंड्री आणि ५ सिक्स ठोकत ७३ रन्स तडकावणारा ब्रायन लारा यांनी कॅनेडीयन बॉलर्सना फटकावून काढत ७ ओव्हर्समध्ये १०२ रन्स झोडपून काढल्या! हे दोघंही आऊट झाल्यानंतर रामनरेश सरवानने ३२ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह ४२ रन्स फटकावत २१ व्या ओव्हरमध्ये मॅच संपवली!

सुपर सिक्समध्ये पोर्ट एलिझाबेथला शेन बाँडने ऑस्ट्रेलियाची बॅटींग उध्वस्तं करत ६ विकेट्स उडवल्या! मॅथ्यू हेडन, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटींग, डॅमियन मार्टीन, ब्रॅड हॉग आणि इयन हार्वी यांना गुंडाळत त्याने ऑस्ट्रेलियाची ८४ / ७ अशी अवस्था करुन टाकली! पण इंग्लंडविरुद्धच्या मॅचप्रमाणेच मायकेल बेव्हन (५६) आणि अँडी बिकल (६४) ऑस्ट्रेलियाचे तारणहार ठरले. या दोघांच्या ९७ रन्सच्या पार्टनरशीपमुळे ऑस्ट्रेलियाने २०८ पर्यंत मजल मारल्यावर ब्रेट लीने बाँडच्या तोडीस तोड ५ विकेट्स घेत न्यूझीलंडचा ११२ रन्समध्ये फडशा पाडला!

सुपर सिक्सच्या शेवटच्या मॅचमध्ये दर्बनला किंग्जमीडवर केनियाच्या १७९ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ४३ बॉल्समधल्या ६७ रन्सच्या इनिंग्जनंतर १९९९ च्या वर्ल्डकपनंतर रिटायर झालेल्या आणि या वर्ल्डकपसाठी पुनरागमन केलेल्या आसिफ करीमने पाँटींग, लिहमन आणि हॉग यांच्या विकेट्स उडवल्यामुळे ऑस्ट्रेलिया ११७ / ५ अशा बिकट परिस्थितीत सापडली होती. अँड्र्यू सायमंंड्स आणि इयन हार्वी यांनी शांत डोक्याने खेळत ऑस्ट्रेलियाला आवश्यक त्या रन्स काढल्या असल्या तरी करीमने पहिल्या ८ ओव्हर्समध्ये ६ मेडन टाकत केवळ २ रन्स दिल्या होत्या! अखेर करीमच्या ९ व्या ओव्हरच्या २ र्‍या बॉलवर हार्वीने बाऊंड्री मारत मॅच जिंकली! करीमचं बॉलिंग अ‍ॅनालिसीस होतं ८.२ - ६ - ७ - ३!

पण या वर्ल्डकपमधला सर्वात भन्नाट स्पेल टाकला तो आशिश नेहराने!

दर्बनला किंग्जमीडवर भारताच्या २५१ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना निक नाईटला महंमद कैफने जाँटी र्‍होड्सच्या स्टाईलमध्ये रनआऊट केल्यावर आणि झहीर खानने मार्कस ट्रेस्कॉथिकला खेळवून खेळवून अखेर आऊट केल्यावर टाचेच्या दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळण्याबद्दल शंका असताना बॉलिंगला आलेल्या नेहराने इंग्लंडची बॅटींग अक्षरशः धुळीला मिळवली...

नासिर हुसेनचा कॅच विकेटकीपर राहुल द्रविडने घेतला...
पुढच्याच बॉलवर अ‍ॅलेक स्ट्युअर्ट एलबीडब्ल्यू झाला...
मायकेल वॉनचा कॅचही द्रविडच्याच हातात गेला...
पॉल कॉलिंगवूडचा कॅच स्लिपमध्ये वीरेंद्र सेहवागने पकडला...
क्रेग व्हाईट पुन्हा द्रविडच्या हातात सापडला...
रॉनी इराणी कॉलिंगवूडप्रमाणेच स्लिपमध्ये सेहवागच्या हातात कॅच देऊन परतला...

इंग्लंडच्या सपोर्टर्सचा प्रसिद्धं ग्रूप म्हणजे बार्मी आर्मी. जगभरात जिथे कुठे इंग्लंड खेळत असेल तिथे ही बार्मी आर्मी जात असते. इंग्लंडच्या खेळाडूंना सपोर्ट करणं हा एक हेतू आणि त्यापेक्षाही प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्लेजिंग करुन त्यांचं खच्चीकरण करणं हा मुख्य धंदा! शेन वॉर्नच्या रंगेलपणामुळे त्याची बायको त्याला सोडून गेल्यावर त्यावरुनही वॉर्नला चिडवण्यास बार्मी आर्मीने कमी केलं नाही, पण २३ रन्समध्ये ६ विकेट्स घेत नेहराने बार्मी आर्मीचा आवाज बंद करुन टाकला होता!

याच मॅचमध्ये सचिनने अँड्र्यू कॅडीकला ऑफस्टंपच्या बाहेरून स्क्वेअरलेगवर हूकची जबरदस्तं सिक्स खेचली होती!

सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथला अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांनी ५ ओव्हर्समध्ये ३४ रन्स फटकावल्यावर जयसूर्याने अरविंदा डिसील्वाला बॉलिंगला आणलं...

लेगस्टंपच्या बाहेर पडलेला अरविंदा डिसील्वाचा बॉल स्वीप मारण्याचा गिलख्रिस्टचा प्रयत्नं फसला...
त्याच्या बॅटची अगदी पुसटशी एज घेऊन आणि पॅडला लागून उडालेला बॉल कुमार संगकाराने पकडला...
श्रीलंकन खेळाडूंनी कॅचसाठी जोरदार अपिल केलं पण अंपायर रुडी कुर्ट्झनने ते फेटाळून लावलं पण...
गिलख्रिस्टने मागे वळून पॅव्हेलियनची वाट धरली होती!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला टोनी ग्रेग म्हणाला,
"Here we are in a semi-final of World Cup cricket and Adam Gilchrist has played a sweep shot, they have gone up, the umpire did not look to me as if he was going to give him out and Adam Gilchrist has walked of the ground… That is great!"

फायनलमध्ये गिलख्रिस्ट आणि हेडन यांनी १४ ओव्हर्समध्ये १०५ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर रिकी पाँटींगने भारतीय बॉलर्सची धुलाई करत १२१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि ८ सिक्स ठोकत १४० रन्स झोडपून काढल्या आणि ८४ बॉल्समध्ये ८८ रन्स फटकावणार्‍या डॅमियन मार्टीनबरोबर २३४ रन्सची पार्टनरशीप करुन वर्ल्डकप भारताच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवला! पहिल्याच ओव्हरमध्ये मॅकग्राथने स्वत:च्याच बॉलवर सचिनचा कॅच घेतल्यावर भारताच्या उरल्यासुरल्या आशा धुळीला मिळाल्या!

पण या वर्ल्डकपमधली सर्वात महत्वाची घटना होती ती म्हणजे अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनी काळ्या फिती लावून झिंबाब्वेचा प्रेसिडेंट रॉबर्ट मुगाबे याच्या हुकूमशाही सरकारचा केलेला निषेध!

२००० सालापासूनच रॉबर्ट मुगाबेच्या हुकुमशाही सरकारने गोर्‍या शेतकर्‍यांच्या जमिनीवर कब्जा करण्यास आणि विरोधाचा आवाज उठल्यास त्यांचे खून पाडण्यास सुरवात केलेली होती. सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता मॉर्गन त्सावन्गिराई याच्यावर सरकारला विरोध केल्यावर चक्कं देशद्रोह आणि हेरगिरीचा खटला चालवण्यात येत होता. मुगाबे सरकारने निवडणूकीत केलेल्या असंख्य गैरप्रकारांबद्दलचे रिपोर्ट्सही दाबून टाकण्यात आलेले होते. या आणि अशाच इतर अनेक भानगडींमुळे इंग्लंडच्या संघाने हरारे इथे मॅच खेळण्यास नकार दिला होता.

झिंबाब्वेमध्ये होत असलेल्या या सगळ्या गैरप्रकारांचा निषेध करण्याची कल्पना मुळात अँडी फ्लॉवरची! वर्ल्डकपला सुरवात होण्यापूर्वीच ओलोंगाची गाठ घेऊन त्याने आपली योजना ओलोंगापुढे मांडल्यावर त्याने फ्लॉवरच्या योजनेला ताबडतोब होकार दिला. एक गौरवर्णीय आणि एक कृष्णवर्णीय अशा दोन खेळाडूंनी निषेधाचं पाऊल उचलल्यास ते परिणामकारक होईल यावर दोघांच एकमत झाल्यावर त्यांनी Movement for Democratic Change (MDC) या विरोधी पक्षाचा एक नेता आणि वकील असलेला डेव्हीड कोलटार्ट याची गाठ घेऊन त्याला याची कल्पना दिल्यावर त्याने ताबडतोब दोघांना पाठींबा दिला.

झिंबाब्वेच्या नामिबियाविरुद्धच्या पहिल्याच मॅचपूर्वी अँडी फ्लॉवर आणि ओलोंगा यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात दोघांनी म्हटलं होतं,

Issued 9.30 a.m. February 10, 2003, at the start of Zimbabwe's opening World Cup match against Namibia.

It is a great honour for us to take the field today to play for Zimbabwe in the World Cup. We feel privileged and proud to have been able to represent our country. We are however deeply distressed about what is taking place in Zimbabwe in the midst of the World Cup and do not feel that we can take the field without indicating our feelings in a dignified manner and in keeping with the spirit of cricket.

We cannot in good conscience take to the field and ignore the fact that millions of our compatriots are starving, unemployed and oppressed. We are aware that hundreds of thousands of Zimbabweans may even die in the coming months through a combination of starvation, poverty and Aids. We are aware that many people have been unjustly imprisoned and tortured simply for expressing their opinions about what is happening in the country. We have heard a torrent of racist hate speech directed at minority groups. We are aware that thousands of Zimbabweans are routinely denied their right to freedom of expression. We are aware that people have been murdered, raped, beaten and had their homes destroyed because of their beliefs and that many of those responsible have not been prosecuted. We are also aware that many patriotic Zimbabweans oppose us even playing in the Wc because of what is happening.

It is impossible to ignore what is happening in Zimbabwe. Although we are just professional cricketers, we do have a conscience and feelings. We believe that if we remain silent that will be taken as a sign that either we do not care or we condone what is happening in Zimbabwe. We believe that it is important to stand up for what is right.

We have struggled to think of an action that would be appropriate and that would not demean the game we love so much. We have decided that we should act alone without other members of the team being involved because our decision is deeply personal and we did not want to use our senior status to unfairly influence more junior members of the squad. We would like to stress that we greatly respect the ICC and are grateful for all the hard work it has done in bringing the World Cup to Zimbabwe.

In all the circumstances we have decided that we will each wear a black armband for the duration of the World Cup. In doing so we are mourning the death of democracy in our beloved Zimbabwe. In doing so we are making a silent plea to those responsible to stop the abuse of human rights in Zimbabwe. In doing so we pray that our small action may help to restore sanity and dignity to our Nation.

Andrew Flower - Henry Olonga

मार्क व्हर्म्युलेन आउट झाल्यावर २२ व्या ओव्हरमध्ये अँडी फ्लॉवर काळी फीत लावून बॅटींगला आला.
झिंबाब्वेची इनिंग्ज संपल्यावर फिल्डींगला येताना अँडी फ्लॉवरच्या जोडीला हेन्री ओलोंगानेही काळी फीत लावली होतीच!

झिंबाब्वेच्या सरकारी अधिकार्‍यांचा जळफळाट होणार हे उघड होतं. मुगाबे सरकारमध्ये मंत्री असलेल्या जोनाथन मोयो याने ओलोंगाची "'Uncle Tom' who had 'a black skin and a white mask'" अशा शब्दांत संभावना केली. इतकंच नव्हे तर ओलोंगाला जबरदस्तीने निवेदनावर सही करण्यास भाग पाडण्यात आल्याचाही त्याने दावा केला!

मोयो म्हणाला,
"Henry Olonga has been obviously forced into putting his name to a statement which he clearly did not author!"

सरकारी तालावर नाचणार्‍या झिंबाब्वे क्रिकेटच्या अधिकार्‍यांनी अँडी फ्लॉवर आणि ओलोंगा यांची आयसीसी कडे तक्रार केली. मात्रं आयसीसीने या भानगडीत न पडता पुन्हा झिंबाब्वे क्रिकेट असोसिएशनकडे हे प्रकरण सोपवलं. मात्रं फ्लॉवर - ओलोंगा यांना काळी फीत न लावण्याची सूचना मात्रं आयसीसीने दिली.

झिंबाब्वे क्रिकेटच्या अधिकार्‍यांच्या सूचनेवरुन हेन्री ओलोंगाला पुढच्या मॅचेसमधून ताबडतोब ड्रॉप करण्यात आलं. अँडी फ्लॉवरलाही ड्रॉप करण्याचा त्यांचा इरादा होता, पण संघातील इतर सर्व खेळाडूंनी फ्लॉवरला ड्रॉप केल्यास मैदानात न उतरण्याची धमकी दिल्याने तो बारगळला. जगभरातील वृत्तपत्रांनी फ्लॉवर - ओलोंगा यांच्या धाडसी कृतीला पाठींबा दिल्याने झिंबाब्वेच्या सरकारला उघडपणे काहीच करता येत नव्हतं. फ्लॉवर आणि ओलोंगा यांच्या काळ्या फितीची जागा मनगटाला लावण्याच्या रिस्ट बँडनी घेतली, पण झिंबाब्वे क्रिकेटच्या अधिकार्‍यांनी त्यालाही आक्षेप घेतला! सर्वसामान्यं प्रेक्षकांचा मात्रं दोघांनाही मिळणारा पाठींबा प्रत्येक मॅचगणिक वाढत होता आणि आता मैदानावर काळे रिस्टबँट घालून येणार्‍या प्रेक्षकांची संख्या दिवसेदिवस वाढत होती!

झिंबाब्वेची सुपर सिक्समधली शेवटची मॅच दक्षिण आफ्रीकेत इस्ट लंडन इथे होती. ओलोंगाला ड्रॉप करण्याचा निर्णय राजकीय असल्याबद्दल सर्व स्तरातून टीका होत असल्याने या मॅचसाठी त्याची झिंबाब्वेच्या संघात निवड करण्यात आल्यामुळे ओलोंगाचा देशाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. मॅच संपल्यावर ओलोंगाने आपण रिटायर होत असल्याची घोषणा केल्यावर झिंबाब्वे क्रिकेटच्या अधिकार्‍यांचा संताप अनावर झाला! झिंबाब्वे क्रिकेटचा अधिकारी ओझियस ब्व्हूट याने ओलोंगाची झिंबाब्वे संघाच्या बसमधून हकालपट्टी केली!

झिंबाब्वेच्या Central Intelligence Organisation (CIO) या खतरनाक सरकारी संघटनेचे अधिकारी ओलोंगाच्या मागावर दक्षिण आफ्रीकेत आल्याची बातमी आल्याने ओलोंगा महिनाभर भूमिगत झाला आणि थेट इंग्लंडमध्ये प्रगटला! अँडी फ्लॉवरनेही इंटरनॅशनल करीअरमधून रिटायर झाल्याची घोषणा करत इंग्लंडच्या इसेक्स कौंटीशी केलेल्या काँट्रॅक्टचा आधार घेत इंग्लंड गाठलं!

२०१३ मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अँडी फ्लॉवर म्हणाला,
"We can't all change the world, but if we all do little things along the way and make the most powerful decisions we can then I think we can bring about change. Would I do it again? Given the same circumstances, without a doubt, yes."

ओलोंगा म्हणाला,
"Tyranny is often more powerful than the 'meaningless' voices of dissent that may well get crushed but it has been said that evil prospers where good men do nothing. I would never claim to be a good man but I hope I played a role in doing something. The most important beliefs I hold to are to do with my faith, and if I had felt that it was the right thing to do at the age of 23 or 27, I suppose I would have gone through with it, as such is my conviction that we ought to do what is right when given the chance. In that way we can live life with few regrets. It will cost us something, but the reward is to look in the mirror with a clean conscience."

२००७ च्या वर्ल्डकपमध्ये अमेरीकेच्या जॉनी वॉकर या व्हिस्की बनवणार्‍या कंपनीने वर्ल्डकपमध्ये एका ओव्हरमध्ये ६ सिक्स ठोकणार्‍या बॅट्समनला दहा लाख डॉलर्सचं इनाम देण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या धोरणाप्रमाणे खेळाडूंना जास्तीत जास्तं आक्रमक फटकेबाजी करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे इनाम ठेवण्यात आलं होतं!

सेंट किट्सच्या मैदानावर हॉलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ३० व्या ओव्हरमध्ये डॅन व्हॅन बुंगे बॉलिंगला आला.
स्ट्राईकवर होता हर्शेल गिब्ज...

पहिला बॉल गिब्जने क्रीजमधून पुढे सरसावत लाँगऑनवरुन उचलला...
दुसरा बॉल लाँगऑफवरुन प्रेक्षकांमध्ये गेला...
तिसरा बॉलही लाँगऑफ बाऊंड्रीपार गेला...
चौथा फुलटॉस गिब्जने मिडविकेटवरुन उचलला...
पाचवा बॉल पुन्हा लाँगऑफ बाऊंड्रीपार दिसेनासा झाला...
शेवटचा बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला...

हर्शेल गिब्जने एका ओव्हरमध्ये ६ सिक्स ठोकण्याचा पराक्रम केला होता!

गिब्ज म्हणाला,
"After the fourth one, I thought it could be on. I thought about using my feet and coming down the pitch, but then I changed my mind and decided to stay in the crease. The idea was for me to have another two goes at it and luckily I didn't miscue any of them, so it was quite nice."

हॉलंडचा कॅप्टल ल्यूक व्हॅन ट्रूस्ट म्हणाला,
"I told Daan after the third ball, 'try to bowl a quicker one'. He said, 'I just did!' He had some flashbacks since then. Seriously, he started laughing as he was sitting in the dressing-room. Before the game we said let's make history today, well, we made history!"

खुद्दं डॅन व्हॅन बुंगेची प्रतिक्रीया काय होती?
"He was absolutely smoking it! It hurts to be hit for 6 sixes in an over, but its part of the game! Both of us are in history books now!"

सुपर एटमध्ये गयानाच्या प्रॉव्हीडन्सच्या मैदानात श्रीलंकेच्या २१० रन्सच्या माफक टार्गेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रीकेने २०६ / ५ पर्यंत मजल मारली असताना श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धनेने लसिथ मलिंगाला बॉलिंगला आणल्यावर...

४५ व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर मलिंगाच्या स्लो बॉलवर शॉन पोलॉकचा लेगस्टंप उडाला...
शेवटचा तुफान वेगाने आलेला यॉर्कर अँड्र्यू हॉलने खेळून काढला, पण कव्हर्समध्ये उपुल तरंगाने कॅच घेतला...

चामिंडा वासने ४६ वी ओव्हर मेडन टाकल्यावर...

४७ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जॅक कॅलीसची एज लागली आणि कुमार संगकाराने कॅच घेतला.... हॅटट्रीक!
दुसर्‍या बॉलवर अचूक यॉर्करने मखाया एन्टीनीचा मिडलस्टंप उडवला!
तिसरा बॉल चार्ल लँगवेल्टच्या ऑफस्टंपला चाटून गेला, पण त्याच्या सुदैवाने बेल्स उडाल्या नाहीत!

मलिंगाने ४ बॉल्समध्ये ४ विकेट्स उडवल्या होत्या!

पाचवा बॅट्समन केवळ केसाइतक्या अंतराने बोल्ड होताहोता वाचला होता!
दक्षिण आफ्रीकेने अखेर त्या एकमेव विकेटने मॅच जिंकली!

सेमीफायनलमध्ये जयसूर्या आणि संगकारा आऊट झाल्यावर महेला जयवर्धनेने अप्रतिम सेंचुरी ठोकत श्रीलंकेला फायनलमध्ये नेलं.

फायनलमध्ये ब्रिजटाऊनला अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या तुफानी आतषबाजीपुढे वास, मलिंगा, मुरलीधरनसह श्रीलंकेचे बॉलर्स पार निष्प्रभ ठरले!
गिलख्रिस्टने १०४ बॉल्समध्ये १३ बाऊंड्री आणि ८ सिक्स ठोकत १४९ रन्स झोडपून काढल्या!

याच फायनलमध्ये स्टीव्ह बकनरच्या अट्टाहासामुळे आणि मॅच रेफ्री जेफ क्रोने घातलेल्या घोळामुळे श्रीलंकेच्या इनिंग्जच्या शेवटच्या ३ ओव्हर्स जवळपास अंधारात खेळवण्यात आल्या होत्या!

परंतु या वर्ल्डकपमध्येच आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केल्यावर सर्वांना हादरा देणारी दुर्दैवी घटना घडली...

पाकिस्तानचा कोच बॉब वूल्मर आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी हॉटेलमधल्या आपल्या रुममध्ये मृतावस्थेत आढळला!

जमेकन पोलिसांनी सुरवातीला बॉब वूल्मरचा खून झाल्याचं जाहीर करुन तपासणीला सुरवात केली होती. वूल्मरचा गळा दाबून त्याला मारण्यात आल्याचं जमेकन पोलिस अधिकार्‍यांचा दावा होता. पाकिस्तानच्या संघातील काही खेळाडूंवरही संशय व्यक्तं करण्यात आला होता. पण अखेर वूल्मरचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

दक्षिण आफ्रीकेचा भूतपूर्व कॅप्टन क्लाईव्ह राईसने वूल्मरचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं साफ फेटाळून लावलं. तो म्हणाला,
“These mafia betting syndicates do not stop at anything and they do not care who gets in their way.”

इयन चॅपल क्लाईव्ह राईसला दुजोरा देत म्हणाला,
"I’ve doubts that Bob Woolmer died of natural causes. He may have been about to reveal some misgivings and had to be silenced!"

कोणत्याही वादात उडी मारण्यास सदैव तयार असलेला सर्फराज नवाज अशा वेळेस मागे राहणं कसं शक्यं होतं?
"Bob Woolmer was murdered! Jamaican police should investigate Pakistan team members for his death! I know what had happened and I am ready to fly down there to help them with investigation if they wish!"

नेहमीप्रमाणेच सर्फराजकडे कोणीही लक्षं दिलं नाही पण कदाचित यावेळेसच तो सत्यं सांगत असण्याची शक्यता होती!

२०११ च्या वर्ल्डकपमध्ये मीरपूरच्या मैदानात पहिल्याच बॉलवर बाऊंड्री ठोकत वीरेंद्र सेहवागने वर्ल्डकपची दणक्यात सुरवात केली. बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये दोघांनीही बांग्लादेशी बॉलर्सची धुलाई करत सेंचुरी ठोकत २०३ रन्सची पार्टनरशीप केली! सेहवागने १४० बॉल्समध्ये १४ बाऊंड्री आणि ५ सिक्स ठोकत १७५ रन्स झोडपून काढल्या तर विराट कोहली ८३ बॉल्समध्ये ८ बाऊंड्री आणि २ सिक्स ठोकत १०० रन्स फटकावत नॉटआऊट राहीला!

नागपूरला इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये रायन टेन डेस्काटाने इंग्लिश बॉलर्सची धुलाई करत ११० बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत ११९ रन्स फटकावल्या! पण इतक्यावरच त्याचं समाधान झालं नव्हतं. जोनाथन ट्रॉट आणि इयन बेलच्या विकेट्स घेत त्याने इंग्लंडची हवा पार तंग करुन टाकली होती, पण पॉल कॉलिंगवूड आणि रवी बोपारा यांनी डोकं शांत ठेवत उरलेल्या रन्स फटकावून काढत इंग्लंडची अब्रू वाचवली.

बँगलोरला केव्हीन ओब्रायनने वर्ल्डकपमधली सर्वात फास्ट सेंचुरी ठोकत इंग्लंडच्या अब्रूचं पुरतं खोबरं केलंच!

इंग्लंडविरुद्धची मॅच टाय झाल्यावर सचिनने पुढच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्धही सेंचुरी ठोकली होती. ही त्याची ९९ वी सेंचुरी! पण सचिन आऊट झाल्यावर २६८ /२ वरुन भारताची इनिंग्ज २९६ रन्समध्ये कोसळली आणि दक्षिण आफ्रीकेने या टार्गेटचा यशस्वी पाठलाग करत मॅच जिंकली!

क्वार्टरफायनलमध्ये अहमदाबादला रिकी पाँटींगची सेंचुरी आणि डेव्हीड हसीबरोबरच्या त्याच्या ५५ रन्सच्या पार्टनरशीपमुळे ऑस्ट्रेलियाने २६० पर्यंत मजल मारली. भारताची अवस्था १८७ / ५ अशी झाली असताना युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी शांत डोक्याने खेळत ७४ रन्सची पार्टनरशीप करत ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप संपुष्टात आणला. सुरेश रैनाने ब्रेट लीला लाँगऑनवरुन सिक्स ठोकल्यावर ब्रेट लीलाच कव्हर्समधून बाऊंड्री मारत युवराजने ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपवली! १९९२ च्या वर्ल्डकपनंतर प्रथमच सेमीफायनलपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट झाला होता!

.... पण या मॅचमध्ये सर्वात लक्षात राहण्यासारखा होता तो झहीर खानने त्याच्या खास 'नकल बॉल' वर उडवलेला माईक हसीचा मिडलस्टंप!

चौथ्या क्वार्टरफायनलमध्ये इंग्लंडच्या २३० रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना तिलकरत्ने दिलशान आणि उपुल तरंगा दोघांनीही सेंचुरी ठोकत २३१ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडचा १० विकेट्सनी पराभव केला आणि इंग्लंडच्या उरल्यासुरल्या इज्जतीचा पंचनामा करुन टाकला!

पण या वर्ल्डकपमधली सगळ्यात तुफानी इनिंग्ज खेळून गेला तो रॉस टेलर!

कामरान अकमल हे एक अगम्यं प्रकरण आहे. गेल्या ८-१० वर्षांत पाकिस्तानच्या मॅचेस पाहणार्‍यांनाच या वाक्याचा नेमका अर्थ कळू शकेल. सहजपणे घेता येण्यासारखे कॅचेस ड्रॉप करणं, कॅच घेण्यासाठी हालचालच न करणं, सहजपणे करता येण्यासारख्या स्टंपिंगच्या बाबतीत गोंधळ घालणं अशा कामरानच्या अनेक लीला आहेत. पाकिस्तानच्या जवळपास प्रत्येक बॉलरला कामरानच्या करामतींचा कधी ना कधी फटका बसलेला आहे. त्याच्या विकेटकिपींगमधल्या चुकांमुळे हातातोंडाशी आलेल्या अनेक मॅचेसमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. मात्रं असं असूनही सर्फराज अहमदचा उदय होईपर्यंत कामरान अकमल पाकिस्तानच्या संघातलं आपलं स्थान टिकवू शकला हेच आश्चर्य होतं!

८ मार्च हा रॉस टेलरचा वाढदिवस होता...
टेलरच्या २७ व्या वाढदिवशी श्रीलंकेत पलकेलेला झालेल्या मॅचमध्ये कामरान अकमलने त्याला एकदा नव्हे तर दोनदा बर्थ डे गिफ्ट्स दिल्या...

१४ व्या ओव्हरमध्ये शोएब अख्तरच्या दुसर्‍या बॉलवर टेलरच्या बॅटची एज लागली...
बॉल कामरान अकमल आणि पहिल्या स्लिपमध्ये असलेला युनुस खान यांच्यामधून थर्डमॅन बाऊंड्रीवर गेला!
कामरानने कॅच घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता....

आणखीन १ बॉलनंतर शोएबच्या चौथ्या बॉलवर पुन्हा टेलरची एज लागली...
यावेळी बॉल थेट कामरानच्या ग्लोव्हजमध्ये गेला.... आणि जमिनीवर पडला!

कामरान अकमलच्या मेहेरबानीमुळे ४६ व्या ओव्हरपर्यंत टेलर ७६ रन्सपर्यंत पोहोचला होता...
न्यूझीलंडचा स्कोर होता २१० / ६!

शोएब अख्तरच्या ४७ व्या ओव्हरमध्ये टेलरने २ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत २८ रन्स झोडपल्या...
४, ६, ६, १ वाईड, ०, ४, १ वाईड, ६!

शोएबच्या शेवटच्या बॉलवर ठोकलेल्या सिक्सने रॉस टेलरची सेंचुरी पूर्ण झाली!
विनोद कांबळी, सचिन, जयसूर्या यांच्यानंतर आपल्या वाढदिवशी सेंचुरी ठोकणारा टेलर हा चौथा बॅट्समन!

अब्दुल रेहमानच्या पुढच्या ओव्हरमध्ये जेकब ओरमने १५ रन्स फटकावल्या...
शाहीद आफ्रिदीने शोएबच्या ऐवजी अब्दुल रझाकला बॉलिंगला आणलं...
टेलरने रझाकलाही २ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत ३० रन्स झोडपल्या...
४, ६. १ वाईड, ६, १ वाईड, २, ४, ६!

शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या २ बॉल्सवर ओरमने २ सिक्स ठोकल्या, पण तिसरी सिक्स ठोकण्याच्या प्रयत्नात उमर गुलने त्याचा कॅच घेतला...
टेलर - ओरम यांनी २२ बॉल्समध्ये ८५ रन्सची पार्टनरशीप झोडपली होती!
ओरम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या काईल मिल्सने बाऊंड्री मारत पाकिस्तानच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम पूर्ण केलं!

५० ओव्हर्सनंतर न्यूझीलंडचा स्कोर होता ३०२ / ७!
शेवटच्या ४ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या बॅट्समननी ९२ रन्स धुवून काढल्या होत्या!
त्यातल्या ५५ रन्स टेलरने झोडपल्या होत्या!

या मॅचनंतर रॉस टेलरला सार्थ नाव पडलं - The Pallekele Plunderer'

कामरान अकमलने रॉस टेलरला दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाकिस्तानला चांगलंच महाग पडलं होतं!
खासकरुन शोएब अख्तरला....
रॉस टेलरने केलेल्या धुलाईनंतर शोएब अख्तरला ड्रॉप करण्यात आलं आणि या मॅच बरोबरच त्याचं करीयर संपुष्टात आलं!

२०१५ च्या वर्ल्डकपमध्ये कुमार संगकाराने एक खास पराक्रम गाजवला...
४ सलग मॅचेसमध्ये त्याने ४ सेंचुरी ठोकल्या!

मेलबर्नला बांग्लादेशविरुद्ध १०५
वेलींग्टनला इंग्लंडविरुद्ध ११७
सिडनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४
होबार्टला स्कॉटलंडविरुद्ध १२४...

वर्ल्डकपमध्ये आणि वन डे मध्येही अशी कामगिरी करणारा तो पहिलाच बॅट्समन!

कॅनबेराला झालेल्या मॅचमध्ये दुसर्‍याच बॉलवर ड्वेन स्मिथची दांडी उडाल्यावर क्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल्सने झिंबाब्वेच्या बॉलर्सची धुलाई करत गांगुली - द्रविड यांचा वर्ल्डकपमधला आणि सचिन - द्रविड यांचा वन डे मधला रेकॉर्ड मोडीत काढत ३७२ रन्सची पार्टनरशीप केली! क्रिस गेलने १४७ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि तब्बल १६ सिक्स ठोकत २१५ रन्स झोडपत वर्ल्डकपमधली पहिली डबल सेंचुरी ठोकली!

पण वर्ल्डकपमधल्या सर्वोच्च स्कोरचा क्रिस गेलचा रेकॉर्ड वर्ल्डकप संपेपर्यंतही टिकला नाही...

क्वार्टरफायनलमध्ये वेलींग्टनला वेस्ट इंडीजच्याच बॉलर्सना फोडून काढत मार्टीन गप्टीलने १६३ बॉल्समध्ये २४ बाऊंड्री आणि ११ सिक्स ठोकत तब्बल २३७ रन्स झोडपून काढल्या!

... आणि सरतेशेवटी क्वार्टरफायनलमध्ये अ‍ॅडलेडच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या वहाब रियाझचा तो स्पेल!

पाकिस्तानच्या २१४ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना अ‍ॅरन फिंच आऊट झाल्यावर डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर ८ ओव्हर्समध्ये ४४ / १ पर्यंत आणल्यावर बॉलिंगला आलेला वहाब रियाझ बंपर आणि शॉर्ट्पीच बॉलिंगचा अफलातून उपयोग करत ऑस्ट्रेलियन बॅट्समनना अक्षरशः नाचवत होता...

वहाबच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल डेव्हीड वॉर्नरने थर्डमॅनला राहत अलीच्या हातात मारला...
दुसर्‍या ओव्हरमध्ये शॉर्टपीच बॉल मायकेल क्लार्कच्या नरडीचा घोट घेण्याच्या अविर्भावात उसळला आणि शॉर्टलेगला शान मसूदने कॅच घेतला...
ऑस्ट्रेलिया ५९ / ३!

शेन वॉटसन बॅटींगला आल्यावर वहाबने त्याच्यावर आणि स्टीव्ह स्मिथवर बंपर आणि शॉर्टपीच बॉल्सनी जोरदार हल्ला चढवला. इतकंच नव्हे तर ऑस्ट्रेलियन बॅट्समनना - खासकरुन शेन वॉटसनला खास ऑस्ट्रेलियन पद्धतीने तो स्लेजिंग करत होता ते वेगळंच! वॉटसनही वहाबच्या तोडीस तोड प्रत्येक बॉल कमालीच्या सावधपणे खेळत होता किंवा सोडून देत होता...

वहाबच्या स्पेलच्या ५ व्या ओव्हरचा पहिला बॉल बंपर होता...
अखेर वॉटसनचा पेशन्स संपला आणि त्याने बॉल हूक करण्याचा प्रयत्नं केला...
वॉटसनची टॉप एज थेट गेली ती फाईनलेगला राहत अलीच्या हातात...
....आणि त्याच्या हातातून जमिनीवर!

वहाबने राहत अलीला शिव्या घातल्या त्यात त्याची काय चूक होती?

अखेर ६ ओव्हर्सच्या स्पेलनंतर दमल्या-भागल्या वहाबला मिसबाह उल हकने विश्रांती दिली...
आणि तिथेच पाकिस्तानची उरलीसुरली आशा मावळली!

मायकेल क्लार्क म्हणाला,
"Wahab Riaz bowled brilliantly! It was the most brutal spell of fast bowling I’d ever faced! Now I can imagine what it would be like facing Mitchell Johnson for the poms during the ashes!"

गेल्या ४० वर्षांतल्या ११ वर्ल्डकपमधले राहून गेलेले हे काही खास प्रसंग...
आता प्रतिक्षा आहे ती २०१९ च्या वर्ल्डकपची!

*************************************************************************************

वर्ल्डकप क्लासिक्स या मालिकेतला हा अखेरचा भाग.
गेल्या ११ वर्ल्डकपमधल्या अनेक मॅचेसची आणि अनेक वेगवेगळ्या प्रसंगांची या निमित्ताने पुन्हा उजळणी झाली.
अनेक गोष्टी राहून गेल्या असण्याचीही शक्यता आहे...

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

15 Mar 2017 - 9:54 am | गॅरी ट्रुमन

१९९९ च्या वर्ल्डकपमध्ये सौरभ गांगुली श्रीलंकेच्या बॉलर्सवर तुटून पडला होता तेव्हा सुनील गावसकर समालोचन करताना म्हणाला होता---"This is amazing. This is magnificent. This is fantastic. This is simply superb."

स्पार्टाकसरावांच्या या लेखमालेविषयीही नेमके असेच म्हणावेसे वाटत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

15 Mar 2017 - 10:00 am | गॅरी ट्रुमन

"बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान अल्ला"

हो हे अगदी कालपरवा घडल्यासारखे लक्षात आहे. भारताच्या त्या डावातील शेवटच्या ८ ओव्हर्सच बघण्यासारख्या होत्या.

मुंबईतील सेमीफायनलमध्ये परत एकदा किरण मोरे असा काहीतरी चमत्कार करेल अशी वेडी आशा होती. पण तसे काही झाले नाही :(

कॉमेन्टेटर रवी चतुर्वेदींच्या आणखी दोन अदा आठवतात. पहिली अदा म्हणजे सवालजबाब आणणे. म्हणजे "जबतक टेस्ट क्रिकेटका सवाल है सुनील गावसकरने सबसे ज्यादा रन्स बनाये है" (त्या काळी) अशाप्रकारे ते जबतक इसका सवाल है, जबतक उसका सवाल है वगैरे सवालजबाब कॉमेन्टरी करताना आणत असत. दुसरी अदा म्हणजे "संघर्षमय क्रिकेट चल रहा है, भारत के बल्लेबाजोंकी अच्छी बल्लेबाजी, ऑस्ट्रेलियाके गेंदबाजोंकी अच्छी गेंदबाजी के बीच का संघर्ष चल रहा है" अशाप्रकारे काहीसे बोलायचे.

लोनली प्लॅनेट's picture

15 Mar 2017 - 11:14 am | लोनली प्लॅनेट

तुफान फटकेबाजी केलीत तुम्ही स्पार्टाकस राव अप्रतिम लेख 1992 पर्यंत ची तर काहीच माहिती नव्हती आणि त्यानंतर च्या तर आठवणी.. त्या तुम्ही जाग्या केल्या..वहाब रियाझ च्या बॉल वर वॉटसन च्या सुटलेल्या कॅच चं वर्णन वाचून हसून हसून बेजार झालो ..

सुंदर लेखमालेबद्दल शतश: धन्यवाद

लोनली प्लॅनेट's picture

15 Mar 2017 - 11:19 am | लोनली प्लॅनेट

क्रिकेट खेळताना.. क्रिकेट पाहताना..खास करून अटीतटीची मॅच पाहताना जो अवर्णनीय आनंद मिळतो तोच आनंद तुमची लेखमाला वाचून मिळाला

मोहन's picture

15 Mar 2017 - 3:12 pm | मोहन

जबरी लेखमाला. धन्यवाद स्पार्टाकस.

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2017 - 3:22 pm | श्रीगुरुजी

चांगली लेखमाला.

बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या.

विश्वचषक स्पर्धेबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. सर्वच अनुभव एकाच व्यक्तीच्या लक्षात असणे शक्य नाही. या लेखात न आलेले मी माझे काही अनुभव सांगतो.

१) २०१५ ची स्पर्धा - पाकड्यांविरूद्ध विंडीज प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांनंतर विंडीजची धावसंख्या ४ बाद १९५ होती. परंतु नंतर डॅरन सॅमी (२८ चेंडूत ३०), लेंडल सिमन्स (४६ चेंडूत ५०) आणि आंद्रे रसेल (१३ चेंडूत ४२) यांनी पुढील १० षटकांत ११५ धावा करून धावसंख्या ३१० पर्यंत नेली.

पाकड्यांची फलंदाजी सुरू झाल्यावर जेरमी टेलरच्या पहिल्या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूवर नासिर जमशेद शून्यावर बाद झाला (१ बाद ०) व सहाव्या चेंडूवर युनिस खान बाद झाला (२ बाद १). जेसन होल्डरचे दुसरे षटक निर्धाव गेले. डावाच्या तिसर्‍या व टेलरच्या दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हॅरिस सोहेल बाद झाला (३ बाद १). पुढच्याच होल्डरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अहमद शहझाद बाद झाल्याने ३.१ षटकांनंतर पाकड्यांची अवस्था ४ बाद १ इतकी भयंकर झाली होती. हा सामना अर्थातच विंडीजने १५० धावांनी जिंकला.

२) याच स्पर्धेत भारत वि. बांगला हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असताना भारत प्रथम फलंदाजी करीत होता. रोहीत शर्मा ८० च्या आसपास खेळत असताना त्याला एक चेंडू कंबरेपाशी फुल्टॉस आल्याने पंचांनी तो नोबॉल जाहीर केला. शर्माने तो मिडविकेट सीमारेषेजवळ उचलल्यावर त्याचा झेल घेतला गेला. परंतु नोबॉल जाहीर केल्याने त्याला बाद न देता फ्रीहिट मिळाली. रिप्लेमध्ये तो चेंडू कंबरेच्या किंचित खालीच असल्याचे दिसले. परंतु आधीच नोबॉल दिल्याने आता निर्णय फिरविता येणार नव्हता. भारताने ५० षटकात एकूण ३०३ धावा केल्या होत्या.

नंतर बांगलाची फलंदाजी सुरू असताना महंमदुल्लाने स्क्वेअरलेगला उंच मारलेला चेंडू शिखर धवनने सीमारेषेजवळ अचूक झेलला. रिप्लेमध्ये त्याचा पाय सीमारेषेवरील जाहिरात फलकांचा अगदी जवळ असल्याचे दिसत होते. अनेक वेगवेगळ्या कोनातून रिप्ले पाहूनसुद्धा त्याचा पाय फलकाला लागला आहे का नाही याचा निर्णायक पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे त्याचा पाय सीमारेषेला लागला असे खात्रीलायक सांगता येत नसल्याने पंचांनी महंमदुल्लाला बाद ठरविले. हा सामना बांगला हरल्यानंतर बांगला खेळाडूंनी व बांगला देशातील प्रेक्षकांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व संताप व्यक्त केला. बांगलादेशात सर्वत्र जोरदार निदर्शने झाली. बांगलाच्या म्हणण्यानुसार त्या सामन्यात पंचांनी १२-१३ चुका केल्या होत्या व त्या सर्व बांगलाविरूद्ध होत्या. बांगलाला ठरवून हरविण्यात आले अशी त्यांची समजूत झाली होती. बांगलाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील पंचगिरीविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यावेळी आयसीसीचे अध्यक्षपद बांगलाकडे होते (त्यांचे नाव आठवत नाही). त्यांनी संतापून अंतिम सामन्यावर बहिष्कार टाकल्याने विजेत्या ऑसीज संघाला करंडक भारताच्या श्रीनिवासन यांच्या हस्ते देण्यात आला होता.

एकंदरीत बांगला खेळाडूंना पराभव अजिबात सहन होत नाही. स्वतः लिंबूटिंबू असले तरी आपण कोणतरी महान संघ आहोत अशा आविर्भावात ते असतात.

३) १९९२ ची स्पर्धा पाकड्यांनी केवळ नशिबाने जिंकली होती. पहिल्या सामन्यात विंडीजकडून पराभव पत्करल्यानंतर पाकड्यांनी दुसर्‍या सामन्यात झिंबाब्वेला हरवून २ गुण मिळविले.तिसर्‍या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकड्यांना सर्वबाद फक्त ७४ धावा करता आल्या होत्या. पाकड्यांचा पराभव नक्की होता. पाकड्यांच्या सुदैवाने नंतर दिवसभर पाऊस आल्याने सामना रद्द करण्यात आला व पाकड्यांना सामना अनिर्णित राहिल्याने १ गुण मिळाला. त्यानंतरचे दोन सामने (भारत व आफ्रिकेविरूद्ध) पाकडे हरल्याने ५ सामन्यानंतर पाकड्यांकडे फक्त ३ गुण जमा होते (१ विजय व १ अनिर्णित). पाकड्यांनी पुढील तीनही सामने जिंकले (ऑस्ट्रलिया, श्रीलंका व न्यूझिलंड विरूद्ध) व आपली गुणसंख्या ९ वर नेली व ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त १ गुण जास्त असल्याने त्यांना ४ थ्या क्रमांकाचा संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. ऑस्ट्रेलियाचे ८ गुण होते व जर पाकड्यांना इंग्लंडविरूद्ध नशीबाने १ गुण मिळाला नसता तर दोन्ही संघांचे समान गुण होऊन सरस धावगतीवर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत आले असते.

४) जावेद मियांदाद व सचिन यांनी सर्वाधिक म्हणजे ६ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याखालोखाल पाँटिंग, मुरलीधरन व चंदरपाल यांनी ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे. बहुतेक केनयाच्या थॉमस ओडोयोने सुद्धा ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे.

स्पार्टाकस's picture

15 Mar 2017 - 8:33 pm | स्पार्टाकस

त्यावेळी आयसीसीचे अध्यक्षपद बांगलाकडे होते (त्यांचे नाव आठवत नाही). त्यांनी संतापून अंतिम सामन्यावर बहिष्कार टाकल्याने विजेत्या ऑसीज संघाला करंडक भारताच्या श्रीनिवासन यांच्या हस्ते देण्यात आला होता.>>>>>>

आयसीसीचा अध्यक्ष होता बांग्लादेशचा मुस्तफा कमाल. रोहीत शर्माला नॉटआऊट देण्यावरुन या कमालनेच बराच गदारोळ केला होता. अंपायर्सच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यापर्यंतही त्याची मजल गेली होती. धमाल म्हणजे नो बॉल देणारा अंपायर होता पाकिस्तानचा आलिम दर!

फायनलनंतर ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप देण्यासाठी मुस्तफा कमाल ऐवजी श्रीनिवासनला बोलावण्यात आल्यावरही त्याने असाच थयथयाट केला होता. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला वर्ल्डकप देण्याचा अधिकार आहे असा त्याचा दावा होता, पण त्याला कोणी भीक न घातल्याने त्याने राजिनामा दिला.

जावेद मियांदाद व सचिन यांनी सर्वाधिक म्हणजे ६ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याखालोखाल पाँटिंग, मुरलीधरन व चंदरपाल यांनी ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे. बहुतेक केनयाच्या थॉमस ओडोयोने सुद्धा ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे.>>>>>>

५ वर्ल्डकप्स खेळणारे बरेच खेळाडू आहेत .
पाकिस्तान - इमरान, अक्रम, इंझमाम, आफ्रिदी
श्रीलंका - रणतुंगा, अरविंदा, जयसूर्या, मुरली, जयवर्धने
वेस्ट इंडीज - लारा, चँडरपॉल
ऑस्ट्रेलिया - पाँटींग
दक्षिण आफ्रीका - कॅलीस
केनिया - स्टीव्ह टिकोलो, ओडोयो
न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी २००३, २००७, २०११, २०१५ मध्ये प्रत्यक्ष खेळला. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये तो स्क्वाडमध्ये होता पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

चावटमेला's picture

16 Mar 2017 - 12:19 am | चावटमेला

एकंदरीत बांगला खेळाडूंना पराभव अजिबात सहन होत नाही. स्वतः लिंबूटिंबू असले तरी आपण कोणतरी महान संघ आहोत अशा आविर्भावात ते असतात.

अगदी अगदी

चिनार's picture

15 Mar 2017 - 4:54 pm | चिनार

खरोखर जबरदस्त लेखमाला...
स्पार्टाकसभाऊ..प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणे शक्य झाले नसले तरी ही त्या सगळ्या लेखांवरची पोचपावती समजा..
तुमचा क्रिकेटचा व्यासंग थक्क करणारा आहे. एक सच्चा क्रिकेटप्रेमीच हे करू शकतो. या अप्रतिम लेखमालेसाठी शतश: धन्यवाद !!!!

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2017 - 8:39 pm | श्रीगुरुजी

या लेखमालेमुळे मला प्रचंड पडझड अर्थात ग्रेट कोलॅप्स या विषयावर लेख लिहावासा वाटत आहे. मागच्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा डाव ३ बाद ९४ वरून सर्वबाद १०५ असा कोसळला होता. पूर्वी पाकिस्तानविरूद्ध एका कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ३ बाद ३०५ वरून सर्वबाद ३१० असा कोसळला होता. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध भारत १ बाद ९८ वरून ८ बाद १२० अशा दयनीय अवस्थेत कोसळला होता. सामन्याला कलाटणी देणार्‍या अशा पडझडींवर एक लेख लिहायचा विचार आहे.

स्पार्टाकस's picture

15 Mar 2017 - 9:57 pm | स्पार्टाकस

ऑस्ट्रेलियाची ३०५ /३ वरुन ३१० मध्ये कोसळलेली इनिंग्ज म्हणजे सर्फराज नवाजने १ रनमध्ये ७ विकेट्स घेतलेली मॅच ना?

अशाप्रकारेच १९९६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍यातील अहमदाबादच्या पहिल्या टेस्टमध्ये सचिनने अनपेक्षितपणे श्रीनाथला बॉलिंग करायला दिली. १७५ (?) रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ४ बाद ९५ अशा त्यामानाने ठिक स्थितीत होती. त्यावेळी कुंबळे किंवा अन्य कोणा स्पिनरला बॉलिंग दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण अनपेक्षितपणे सचिनने बॉलिंग दिली श्रीनाथला. आणि श्रीनाथच्या त्या खतरनाक स्पेलमध्ये दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. अवघ्या १० रन्समध्ये उरलेल्या ६ विकेट्स पडल्या आणि १०५ मध्ये सगळा संघ ऑल आऊट झाला.

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2017 - 10:53 pm | श्रीगुरुजी

बरोबर. १९७९ मधील सिडनेतील त्या सामन्यात ऑसीज विजयासाठी ३८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ बाद ३०५ अशा सुस्थितीत होते. बॉर्डर २०५ व किम ह्यूज ८४ धावांवर खैळत असताना सर्फराझ नवाझने एक भन्नाट स्पेल टाकून केवळ ३३ चेंडूत १ धाव देऊन ७ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव ३१० मध्ये सपविला होता. त्या डावात त्याने ८६ धावांत ९ बळी घेतले होते.

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2017 - 10:54 pm | श्रीगुरुजी

बॉर्डर १०५ वर होता.

प्रसाद_१९८२'s picture

16 Mar 2017 - 10:18 am | प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी,

या सामन्याची चित्रफीत उपलब्ध आहे का जालावर किंव्हा अन्य कुठे?

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी

या स्पेलची चित्रफीत उपलब्ध आहे. परंतु ती अत्यंत खराब असल्याने (१९७९ मधील चित्रीकरण) गोलंदाजीच्या भेदकतेची अजिबात कल्पना येत नाही.

सर्फराज नवाझसारखाचे एक भेदक स्पेल कर्टली अ‍ॅम्ब्रोसने १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टाकला होता. ऑस्ट्रेलियाचा डाव २ बाद ८५ वरून सर्वबाद ११९ असा कोसळला होता त्यात अ‍ॅम्ब्रोसने केवळ १ धाव देऊन ७ बळी घेतले होते. यातील एकाचा झेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडाला होता. बाकीचे सहा जण यष्टीरक्षक किंवा स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाले होते. या स्पेलची बर्‍यापैकी दिसणारी चित्रफीत - https://www.youtube.com/watch?v=a5G4pqb4nns

चावटमेला's picture

16 Mar 2017 - 12:18 am | चावटमेला

१९९२ ते २०११ वर्ल्ड कप तर अगदी परवा परवा झाल्यासारखे लख्ख आठवतात..

वरुण मोहिते's picture

16 Mar 2017 - 1:34 pm | वरुण मोहिते

लेखमाला !! आवडली .गुरुजी तुमच्या कल्पनेलाही अनुमोदन .

किसन शिंदे's picture

16 Mar 2017 - 2:48 pm | किसन शिंदे

अतिशय सखोल अभ्यास दिसतोय तुमचा विश्वचषकाच्या बाबतीत

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2017 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

लेखमाला अत्यंत भावली.

सुमीत's picture

16 Mar 2017 - 7:01 pm | सुमीत

सामन्याचे, प्रसंगाचे अगदी खोलात जाउन केलेले वर्णन आणि विश्लेशन. आता पुस्तक झालेच पाहिजे

अभिजीत अवलिया's picture

25 Mar 2017 - 12:04 pm | अभिजीत अवलिया

खूप आवडली ही लेखमाला.

फारएन्ड's picture

27 Mar 2017 - 12:21 am | फारएन्ड

बरेचसे वाचले आणि आवडले. हा सुद्धा!

गामा पैलवान's picture

27 Mar 2017 - 2:02 am | गामा पैलवान

स्पार्टाकस,

तुमच्या व्यासंगाची आणि संयमाची कमाल आहे. न थकता इतकं लिहायचं, प्रतिसाद मिळोत वा ना मिळोत. यासाठी मनापासून आवडच असली पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

साहेब..'s picture

27 Mar 2017 - 12:08 pm | साहेब..

स्पार्टाकसभाऊ..प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणे शक्य झाले नसले तरी ही त्या सगळ्या लेखांवरची पोचपावती समजा..

श्रीगुरुजी आता तुम्हीपण पड़झडिवर लिहा की