पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 11:32 pm

एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले.

भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही.
पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो.

कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्‍या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे.

पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणार्‍या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्‍या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे. तिच्याशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्पणाने जाणवते. तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला सख्ख्या आईसकट भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा 'पार्टनर'च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी अर्धांगिनीत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्‍या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे.

अर्थात कथानक हे 'पार्टनर' चे बलस्थान आहे की नाही माहिती नाही. किमान माझ्यामते तरी नाही. पण त्याहीपेक्षा अद्वितिय आणि मनात घर करुन बसणारी वपुंची योग्य वेळी केलेली योग्य वाक्यांची पेरणी आहे.
जसे
"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."

"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."
यातही 'नरक' या व्याख्येवर वपुंनी कोटी केली आहे. हाच नरक 'पार्टनर' मध्ये तीन वेगळ्या व्याख्यांनी दाखवलेला आहे. ते इथे सांगून या सुंदर पुस्तकाचा रसभंग नाही करत

"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."

"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."

ही असली सुंदर सुंदर वाक्ये पुस्तक हातातून खाली ठेवलं तरी मनात हिंदोळत असतात.

आणि त्याही पेक्षा मति गुंग करणारे म्हणजे क्वचित समोर येणार्‍या 'पार्टनर' चे विचार आणि त्याचे जीवन

"पार्टनर" केवळ एक कादंबरी नाहिये.... केवळ एक घटनाक्रम नाहिये.... तर एक सखोल चिंतन आहे.
मला वाटते यातच व.पुं.च्या 'पार्टनर' चे यश दडलेले आहे.

ज्याचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे त्याला पार्टनर कळला असे मी म्हणणार नाही तर त्याने 'पार्टनर' जगण्याचा अनुभव घेतला असेच म्हणेन. आणि म्हणूनच 'पार्टनर' हे लग्नानंतर काही वर्षांनंतर वाचायचे पुस्तक असे मी आवर्जून म्हणेन.

कलाकथावाङ्मयसाहित्यिकप्रकटनविचारलेखमतशिफारसअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

10 Oct 2010 - 5:35 am | गांधीवादी

परत वाचली पाहिजे. (म्हणजे परीक्षण वाचून कादंबरी परत वाचायची इच्छा झाली आहे.)

गणेशा's picture

10 Oct 2010 - 7:59 pm | गणेशा

छान परिक्षण
--

मी ही जेव्हद्या कादंबरी वाचल्या आहेत त्याबद्दल लिहिलेले आहे.
व्.पु हे माझे आवदते लेखक
या कादंबरी बद्दल माझे काही मत

--

पार्टनर (व.पु.काळे):
पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहिये तर आपल्यासारख्या सामन्य मानसाचा जिवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामन्य मान्साचे जे दुसरे मन असते .. त्यास एक चित्ररुप व्यक्तिरेखेचे स्वरुप दिले आहे.. आणि त्यास नाव आहे पार्टनर ...
दुसरे मन म्हणजे बघा .. आपण बर्याच दा वागताना विचार करतो की मी असे केले फाइजे होते पण जाउद्या समाज आहे म्हणुन गप्प बसतो .. तेंव्हा हा जो दुसरा विचार येतो आहे ना मनात ..त्या विचाराचा एक मानुस च त्यांनी या पुस्तकात दिला आहे..

पण त्याच बरोबर स्वप्नवत न रहाता आहे ते सुख आनंदाने उपोभोगायचे ही त्या पार्टनर ने येथे सांगितले आहे.

ek sandhrbh :

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.
Present tense is only tense, It takes care of past and future, If we look at it correct persepective.

[सुचना : येथे दिलेला हा अर्थ हा मी वाचताना घेतलेला आहे .. तुम्ही जर वेगल्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पहाता येईल पुस्तकांकडे]
[ पार्टनर या पुस्तकातील आनखीन वाक्य वाचण्यासाठी मी माझ्या ब्लोग ची लिन्क येथे देत आहे]

http://vapurvai.blogspot.com/2007/10/as-you-write-more-and-more-personal...

सागर's picture

11 Oct 2010 - 3:08 pm | सागर

गणेशा,

पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहिये तर आपल्यासारख्या सामन्य मानसाचा जिवन प्रवास आहे.

हे अगदी अगदी खरे आहे.
पार्टनर इज पार्टनर असेच म्हणतो

अवांतरः ब्लॉग पाहिला. अप्रतिम आहे. फेवरिट मधे अ‍ॅड केला आहे. धन्यवाद :)

स्पंदना's picture

10 Oct 2010 - 12:02 pm | स्पंदना

चला शोधली पाहीजे.

सागर's picture

10 Oct 2010 - 12:39 pm | सागर

नवरा या प्राण्याचा फुटबॉल कसा होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण पार्टनर च्या निमित्ताने यातील एखादा प्रसंग तरी थोड्याफार फरकाने आपल्या आयुष्यात घडलेला असल्याचे जाणवते.

पार्टनर म्हणतो त्याप्रमाणे जेवढे तुम्ही वैयक्तीक लिहिता तेवढे ते वैश्विक होते. :)

नवरा या प्राण्याचा फुटबॉल कसा होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही >>>

तरी म्हटलं हा दर कट्ट्याला डिच का मारतोय ते ?

=))

सुहाश्या तू चतुर्भुज होण्याची मी आवर्जून वाट पहात आहे. मग तुला पार्टनरच्या जागी मीच दिसेन :D

आशिष सुर्वे's picture

10 Oct 2010 - 5:36 pm | आशिष सुर्वे

परत वाचली पाहिजे. (म्हणजे परीक्षण वाचून कादंबरी परत वाचायची इच्छा झाली आहे.)

..
अगदी अगदी..

ह्या पुस्तकाचा एवढा परिणाम झाला होता की मी आणि माझा जिवलग मित्र, आम्ही एकमेकांना 'पार्टनर' असेच संबोधन करायचो..

मदनबाण's picture

10 Oct 2010 - 5:43 pm | मदनबाण

सुंदर पुस्तक आहे हे...अगदी संग्रही असावे असे. :)

उपास's picture

14 Oct 2010 - 2:48 am | उपास

दरम्यान, याहू वा तत्सम मेसेंजर anonymous राहून चॅटींग करत (एक छंद म्हणून आणि सुरक्षितता म्हणूनही) लोकांना मानसिक मदत करण्यार्‍या माणसाची एक गोष्ट वाचली.. अगदी पार्टनर ची आठवण झाली.. आयुष्याच्या वेगवेगळ्या ट्प्प्यावर वेगवेगळे अर्थ देणारं, वेड करणार हे पुस्तक!