सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
11 Dec 2007 - 12:37 am

ह्या आधीचा लेख इथे किंवा इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....

मेरे दो दो बाप...
गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हू मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते.मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.
ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे बदबूदार बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा.
"

यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.
ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद नाही होणार

कलाभाषावाक्प्रचारविनोदमौजमजाचित्रपटप्रकटनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Dec 2007 - 1:07 am | विसोबा खेचर

पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

हा पिच्चर मला आवडला होता...

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते.मस्त धमाल करतात ते.

हा आमच्या कालेजच्या जीवनातला पिच्चर! ऐन जवानीतला! सर्व मित्रमंडळींसोबर धमाल करत करत पहिला होता! काय साले दिवस होते ते! :)

देवदत्तराव, तुमचा हिंदी पिच्चरांमधील संवादांचा अभ्यास व पाठांतर वाखाणण्यासारखं आहे! :)

कुठल्याश्या एका सिनेमात शक्ति कपूर सारखं 'आऊ' असं म्हणत असतो, तर एका पिच्चरमध्ये तो शिरीदेवीला 'लोलिता' असं म्हणत असतो! कुठले बरं पिच्चर ते? :)

दिवार पिच्चर मध्ये लिफ्टमध्ये डावरसाबचं सोनं कधी आणि कुठे येणार आहे हे बच्चनसाहेब मदनपुरीला सांगतो. त्यावर मदनपुरी त्याला म्हणतो, "अगर ये झुठ हुवा, तो ये तुम्हारा आखरी झुठ होगा!"

हा लिफ्टमधला संवाद मला अत्यंत आवडतो! :)

तसंच शोले शिणेमात गब्बर टाईमपास करत खाटेवर उपडा पडलेला असतो, समोरच आगीच्या जाळावरर मासाचे तुकडे भाजले जात असतात! (अवांतर - गब्बर आणि त्याच्या डाकूंना एकंदरीत तंदुरी आयटेम आवडायचे तर!:)
तेवढ्यात बिचार्‍या सचिनला (अहमद) डाकू पकडून आणतात आणि म्हणतात, "सरदार, ये रामगढ का छोकरा है, टेसन जा रहा था, हमे रास्ते मे मिल गया!"
हे ऐकल्यावर आपल्या पालथ्या मुठीवरून चालणारा एक मुंगळा गब्बर ठाप करून मारतो!

हा शिण बाकी लई ब्येस! साला त्या मुंगळ्यासारखाच सचिनचा खेळही खल्लास! :)

अनेक शिणेमे झाले, अगदी उत्तमातले उत्तम झाले, या पुढेही अगदी अनेक शिणेमे निघतील! अगदी उत्तमातले उत्तम ऑस्कर विजेते सिनेमेही यापुढे अनेक निघतील, परंतु शोले तो शोले!

एकमेवाद्वितीय!!

आपला,
(शोलेप्रेमी) तात्या.

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 1:23 am | देवदत्त

कुठल्याश्या एका सिनेमात शक्ति कपूर सारखं 'आऊ' असं म्हणत असतो, तर एका पिच्चरमध्ये तो शिरीदेवीला 'लोलिता' असं म्हणत असतो! कुठले बरं पिच्चर ते? :)

माझ्या माहितीप्रमाणे तो सिनेमा तोहफा असेल. आता त्याची कथा किंवा संवाद आठवत नाही. पण श्रीदेवी आणि जितेंद्र चे काही सिनेमे म्हटले की त्यातील हिम्मतवाला, तोहफा हे आठवतात लगेच.

दिवार मधील अमिताभचे वाक्य.. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता मस्त वाटते एकदम. बाकी संवाद ही छान आहेत. पण ह्या एका संवादाकरिता मी मागील वर्षी हा चित्रपट वाट पाहून पाहिला होता. नंतर त्याची सीडीच घेतली.

अन्या दातार's picture

23 Jan 2008 - 10:25 pm | अन्या दातार

तसंच शोले शिणेमात गब्बर टाईमपास करत खाटेवर उपडा पडलेला असतो, समोरच आगीच्या जाळावरर मासाचे तुकडे भाजले जात असतात! (अवांतर - गब्बर आणि त्याच्या डाकूंना एकंदरीत तंदुरी आयटेम आवडायचे तर!:)
तेवढ्यात बिचार्‍या सचिनला (अहमद) डाकू पकडून आणतात आणि म्हणतात, "सरदार, ये रामगढ का छोकरा है, टेसन जा रहा था, हमे रास्ते मे मिल गया!"
हे ऐकल्यावर आपल्या पालथ्या मुठीवरून चालणारा एक मुंगळा गब्बर ठाप करून मारतो!

हा शिण बाकी लई ब्येस! साला त्या मुंगळ्यासारखाच सचिनचा खेळही खल्लास! :)

वा! तात्या! तो सीन पुन्हा एकदा डोळ्यासमोरुन तरळून गेला. खरंच त्यासारखा सीन नाही. प्रतिकात्मकतेचे उदाहरण देण्यासाठी त्याच्या इतका चांगला सीन शोघून सापडणार नाही. (हे आता मर्डर, पाप सारखे उठवळ सिनेमे काढणार्‍यांना समजेपर्यंत शिकवावे लागेल असे वाटते)

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 7:45 am | विसोबा खेचर

(हे आता मर्डर, पाप सारखे उठवळ सिनेमे काढणार्‍यांना समजेपर्यंत शिकवावे लागेल असे वाटते)

सहमत आहे..

तात्या.

सर्किट's picture

11 Dec 2007 - 3:05 am | सर्किट (not verified)

ह्याच सिनेमात अमिताभचा एक जबरा सीन (स्वतःच्या आरशातील प्रतिबिंबाला आयोडीन लावण्याचा) आहे. हा सीन मला आजवर सर्वाधिक आवडलेला सीन आहे.

- सर्किट

सहज's picture

11 Dec 2007 - 7:40 am | सहज

पण (अमर अकबर अँथनी ??? मधेच) विनोद खन्ना अमिताभची धुलाइ करतो व कोठडीत डांबतो. नंतर सुटताना अमिताभ म्हणतो साब तुमने इतना मारा और मैने सिर्फ दो ही मारा लेकिन क्या सॉलीड मारा ना?

मला जाम हसायला आले.

केशवराव's picture

25 Jan 2008 - 12:01 am | केशवराव

सर्किट राव,
तुम्ही दिलीप कुमारचा ' कोहीनूर ' पाहीलात का? अमिताभ ग्रेटच , पण दिलीप सुद्धा ग्रेट !

किमयागार's picture

11 Dec 2007 - 9:20 am | किमयागार (not verified)

"नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या?"

हे 'राजाबाबू' ह्या आमच्या आवडत्या चित्रपटातील सुंदर वाक्य आहे.

-कि'गार
********************************************
अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 8:25 pm | देवदत्त

"नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या?"
अहो, हे वाक्य राजाबाबू नाही, दुल्हे राजा मधील आहे. :)
वाक्य छान आहे हो... लिहिण्याचे राहिले होते.

तसेच प्रेम चोप्राचे आणखी एक वाक्य आहे..
लगता है आप जिंदगी से परेशान है... ओळखा पाहू कशात आहे ? ;)

प्रियाली's picture

11 Dec 2007 - 8:52 pm | प्रियाली

प्रेम चोप्राचे एकच वाक्य आठवणीत राहण्यासारखे आहे...माझ्या!

प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा|

यावर कुठे कुठे चोपडायचं प्रेम असा प्रश्न पडतो?

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 10:49 pm | देवदत्त

यावर कुठे कुठे चोपडायचं प्रेम असा प्रश्न पडतो?

मस्त एकदम :)

देवदत्त's picture

13 Dec 2007 - 8:51 pm | देवदत्त

लगता है आप जिंदगी से परेशान है
सिनेमा राहिला की सांगायचा माझ्याकडून...
तो आहे आशिक मस्ताने चित्रपटात. अभिषेक कपूर (हा कोण बुवा आता? असे नका विचारू), हरीश, आयेशा झुल्का हे आहेत त्यात.

प्रियाली's picture

13 Dec 2007 - 9:07 pm | प्रियाली

अभिषेक कपूर (हा कोण बुवा आता? असे नका विचारू)

हा जितेंद्रचा पुतण्या असून ट्विंकल खन्नाचा शालेय जीवनातील बॉयफ्रेंड होता. एवढे क्वालिफिकेशन त्याला चित्रपट तरून नेण्यास पुरेसे पडले नसावे.

(सिनेपंडीत) प्रियाली.

देवदत्त's picture

13 Dec 2007 - 9:26 pm | देवदत्त

मला माहित आहे हो.. चला त्याबद्दल माहिती असणारे कोणीतरी मिळाले. :)
एवढे क्वालिफिकेशन त्याला चित्रपट तरून नेण्यास पुरेसे पडले नसावे.
:) तरी त्याने प्रयत्न चालू ठेवले किंवा आताही ठेवलेत म्हणा...
त्याचा ट्विंकल खन्ना सोबतचा चित्रपट उफ्फ यह मोहब्बत आला होता, सिनेमा (आणि दोन्ही सिनेमात तो ही) बरा वाटला.
आणि बहुधा गेल्या का त्या आधीच्या वर्षी त्याने एक चित्रपट ही दिग्दर्शित केला होता असे ऐकून आहे.
हो. आठवला.. आर्यन .. अरे हा चित्रपट तर केव्हाचा प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.

स्वाती राजेश's picture

11 Dec 2007 - 10:30 pm | स्वाती राजेश

एके ठिकाणी वाचलेला.

एकदा जेम्स बाँड विमानातून खाली डुक्करांच्या कळपात पडतो. डुक्कर विचारते,"तुम्ही कोण?"
जेम्स बाँड (स्टाईल मधे)सांगतो,"बाँड्......जेम्स बाँड."

जेम्स बाँड विचारतो,"तुम्ही?"
डुक्कर (स्टाईल मधे) सांगते, "डुक्कर......रान डुक्कर."

देवदत्त's picture

11 Dec 2007 - 10:52 pm | देवदत्त

हा विनोद नव्हता ऐकला. धन्यवाद :)
मी तो दुसरा ऐकला होता... जेम्स बाँड एका दक्षिण भारतीय माणसाला हे म्हणतो तो.

राजीव अनंत भिडे's picture

13 Dec 2007 - 10:46 pm | राजीव अनंत भिडे

जेम्स बाँड विचारतो,"तुम्ही?"
डुक्कर (स्टाईल मधे) सांगते, "डुक्कर......रान डुक्कर."

सुंदर विनोद! ;))))

स्वातीताई,

काही माणसं केवळ पंचायत समिती आणि मिसळपाव प्रशासनाच्या कामकाजात अडकलेली (!) असताना आपल्यासारखी काही मंडळी मिसळपाववरील अन्य लेखनही यथास्थितपणे सुरू ठेवत आहेत याचे खरोखरच कौतुक वाटते! माझ्या मते आपल्यासारख्या, देवदत्तांसारख्या तसेच इतरही अनेक मंडळींचे लेखनच मिसळपावला पुढे नेऊ शकेल/नेईल! मिसळपावची उरलीसुरली वाटचाल सांभाळायला एक तात्या पुरेसा आहे/समर्थ आहे!

मिसळपावचे आणि मिसळपाव पंचायतीचे काही ना काही दोष काढणारी आणि पर्यायाने मिसळपाव वादाच्या भोवर्‍यात कसे सापडेल ह्याची पुरेपूर काळजी घेणारी मंडळीदेखील आज मिसळपावभोवतीच घुटमळत आहेत, ही मात्र अश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना हेच मिसळपावचे वैशिष्ठ्य आहे! काय सांगावं, कदाचित या मंडळींचादेखील तो आंतरजालीय अस्तित्वाचा प्रश्न असावा असे वाटते! कारण अन्य संकेतस्थळांवर प्रशासनाबद्दल लिहायची एक तर या मंडळींना मुभा नाही आणि लिहिल्यास त्याची कुणी दखलही घेणार नाही!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

केशवसुमार's picture

22 Jan 2008 - 9:38 pm | केशवसुमार

"कबर मे डबल बेड नही होता वहा सिंगल ही सोना पडता है"
"मेरा खून तो मेरे गद्दी के खटमल मे भी है.. तो क्या ये गद्दी उसे दे दू"

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 10:00 pm | ऋषिकेश

हा हा हा वाक्ये आवडली...

"मेरा खून तो मेरे गद्दी के खटमल मे भी है.. तो क्या ये गद्दी उसे दे दू"

खरं तर गद्दीमधे खटमल झाल्यवर खरच त्यांना गद्दी द्यावी लागते :(

(कालच एक गद्दी गमावलेला) ऋषिकेश

केशवसुमार's picture

23 Jan 2008 - 3:32 pm | केशवसुमार

खटमल??
ये मै क्या सुन रहा हू..

ऋषिकेश's picture

23 Jan 2008 - 7:26 pm | ऋषिकेश

अमरिका मे खटमल??
हो हो या "आम्रिकेत" मुबलक ढेकुणपंतांची वस्ती आहे. अगदी गुजरात्यांपेक्षाही अधिक ;) सगळी घरं लाकडि असल्याने असेल कल्पना नाहि पण थंडीत बर्‍याच घरांत निघतात (निदान जर्सी सिटी आणि न्यूयॉर्क मधे तरी) :(((..

साला एक खटमल इंसानको मॅट्रेसलेस बना देता है| ;)
-(त्रस्त) ऋषिकेश

होती पण आज ऋषिकेशच्या लिखाणातून पुरावाच मिळाला.
अशा रीतीनेही अमेरिकेशी "रक्ताचं" नातं जोडलं जातं आहे हे वाचून मन भरून आलं!

चतुरंग

सुनील's picture

23 Jan 2008 - 8:32 pm | सुनील

(कालच एक गद्दी गमावलेला) ऋषिकेश

ताबडतोब पेस्ट-कंट्रोल करून घ्या नाहीतर रात्र बिछान्याऐवजी महाजालावर टिचका-टिचकी करण्यात घालवावी लागेल!

(बरीच जागरणे घडलेला) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तात्या विंचू's picture

23 Jan 2008 - 10:33 am | तात्या विंचू

अंदाज अपना अपना मधील शक्ती कपूर चा डायलॉग.....

सुनो सुनो दुनिया के लोगो, मेरा नाम है मिस्टर गोगो.......

रचनाद्लाल's picture

23 Jan 2008 - 6:05 pm | रचनाद्लाल

सत्ते पे सत्ता या सिनेमा मधले वाक्य आवडले. हेमा मालिनि चि एक खास शैली आहे.

साधारणपणे जुन्या काळच्या दर १० सिनेमांपैकी कमित्-कमी ३~४ सिनेमात तरी हा सिन असायचा .....
साधारणता तो असा आहे, एका गर्भश्रीमंत बापाच्या पोरीचे एका अति उनाड, कामधंदा करत नसलेल्या व घरचे खाऊन फूकट लश्कराच्या भाकरी भाकणार्‍या "टोणग्या" बरोबर "सूत" जमले आहे. सहाजिकच पोरीच्या बापाला ते पसंत नाही.
तर तो काय करतो, अख्ख्या गावाला एक मोठी पार्टी देतो, आपल्या "हिरोला" पण आमंत्रण असते....
ह्या भर पार्टीत तो ह्या हिरोच्या स्सनकन एक "कानफाडात" देतो व विचारतो " पूछ , आज मैने तुम्हे ये थप्पड क्यों मारा ?

यावर शिरिष कणेकर म्हणतात " अरे, मारा तो मारा , आणि ऊपर तोंड करके विचारा !!!"

अन्या दातार's picture

23 Jan 2008 - 10:33 pm | अन्या दातार

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.
ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले...
"मैं भी यही चाहता हूं."
अनेक वर्षांनी सरकारसारखा एक उत्तम सिनेमा बघितला असेन. प्रत्येक आणि प्रत्येक फ्रेम काहीतरी सॉलिड दाखवून जाते. अभिषेक आणि कॅटरिना यासारख्या ठोंब्या कलाकारांकडून दिग्दर्शकाने उत्तम अभिनय करुन घेतला आहे. काळी बॅकग्राऊंड असूनही ती फार वाईट वाटत नाही(सावरियाप्रमाणे). दोन वाक्यांच्या मधे असणारे संगीत, डोळ्यातील भाव, सारंच अप्रतिम. कमीत कमी ५-६ वेळा बघितला असेन.

आपला,
(सरकारप्रेमी)अनिरुद्ध दातार

छोटा डॉन's picture

23 Jan 2008 - 10:39 pm | छोटा डॉन

"तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था."
आपल्या भावनांचा आदर राखून थोडी दूरूस्ती करतो........
योग्य वाक्य असे आहे .............
"तुम्हे मारने के लिये मेरा यहा होना जरूरी नही , पर तुम्हे मरते हुए देखने का मजा मै खोना नही चाहता था."

देवदत्त's picture

24 Jan 2008 - 12:48 am | देवदत्त

दुरूस्तीबद्दल धन्यवाद :)

सहज's picture

24 Jan 2008 - 7:48 am | सहज

बाजी (का जुआ) घोडाँपे लगाते है, शेरोपे नही |

धम धम ध्डम धड्डैया रे सबसे बडे लड्डैया रे...हे ओमकारा!!!