Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by देवदत्त on Tue, 12/11/2007 - 00:37
  • Log in or register to post comments
  • 19740 views

Book traversal links for सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

  • ‹ सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
  • Up
  • सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Tue, 12/11/2007 - 01:07

Permalink

देवदत्तराव,

पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था. हा पिच्चर मला आवडला होता... मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो. तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते.मस्त धमाल करतात ते. हा आमच्या कालेजच्या जीवनातला पिच्चर! ऐन जवानीतला! सर्व मित्रमंडळींसोबर धमाल करत करत पहिला होता! काय साले दिवस होते ते! :) देवदत्तराव, तुमचा हिंदी पिच्चरांमधील संवादांचा अभ्यास व पाठांतर वाखाणण्यासारखं आहे! :) कुठल्याश्या एका सिनेमात शक्ति कपूर सारखं 'आऊ' असं म्हणत असतो, तर एका पिच्चरमध्ये तो शिरीदेवीला 'लोलिता' असं म्हणत असतो! कुठले बरं पिच्चर ते? :) दिवार पिच्चर मध्ये लिफ्टमध्ये डावरसाबचं सोनं कधी आणि कुठे येणार आहे हे बच्चनसाहेब मदनपुरीला सांगतो. त्यावर मदनपुरी त्याला म्हणतो, "अगर ये झुठ हुवा, तो ये तुम्हारा आखरी झुठ होगा!" हा लिफ्टमधला संवाद मला अत्यंत आवडतो! :) तसंच शोले शिणेमात गब्बर टाईमपास करत खाटेवर उपडा पडलेला असतो, समोरच आगीच्या जाळावरर मासाचे तुकडे भाजले जात असतात! (अवांतर - गब्बर आणि त्याच्या डाकूंना एकंदरीत तंदुरी आयटेम आवडायचे तर!:) तेवढ्यात बिचार्‍या सचिनला (अहमद) डाकू पकडून आणतात आणि म्हणतात, "सरदार, ये रामगढ का छोकरा है, टेसन जा रहा था, हमे रास्ते मे मिल गया!" हे ऐकल्यावर आपल्या पालथ्या मुठीवरून चालणारा एक मुंगळा गब्बर ठाप करून मारतो! हा शिण बाकी लई ब्येस! साला त्या मुंगळ्यासारखाच सचिनचा खेळही खल्लास! :) अनेक शिणेमे झाले, अगदी उत्तमातले उत्तम झाले, या पुढेही अगदी अनेक शिणेमे निघतील! अगदी उत्तमातले उत्तम ऑस्कर विजेते सिनेमेही यापुढे अनेक निघतील, परंतु शोले तो शोले! एकमेवाद्वितीय!! आपला, (शोलेप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 12/11/2007 - 01:23

In reply to देवदत्तराव, by विसोबा खेचर

Permalink

तोहफा असेल...

कुठल्याश्या एका सिनेमात शक्ति कपूर सारखं 'आऊ' असं म्हणत असतो, तर एका पिच्चरमध्ये तो शिरीदेवीला 'लोलिता' असं म्हणत असतो! कुठले बरं पिच्चर ते? :) माझ्या माहितीप्रमाणे तो सिनेमा तोहफा असेल. आता त्याची कथा किंवा संवाद आठवत नाही. पण श्रीदेवी आणि जितेंद्र चे काही सिनेमे म्हटले की त्यातील हिम्मतवाला, तोहफा हे आठवतात लगेच. दिवार मधील अमिताभचे वाक्य.. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता मस्त वाटते एकदम. बाकी संवाद ही छान आहेत. पण ह्या एका संवादाकरिता मी मागील वर्षी हा चित्रपट वाट पाहून पाहिला होता. नंतर त्याची सीडीच घेतली.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 01/23/2008 - 22:25

In reply to देवदत्तराव, by विसोबा खेचर

Permalink

तसंच शोले

तसंच शोले शिणेमात गब्बर टाईमपास करत खाटेवर उपडा पडलेला असतो, समोरच आगीच्या जाळावरर मासाचे तुकडे भाजले जात असतात! (अवांतर - गब्बर आणि त्याच्या डाकूंना एकंदरीत तंदुरी आयटेम आवडायचे तर!:) तेवढ्यात बिचार्‍या सचिनला (अहमद) डाकू पकडून आणतात आणि म्हणतात, "सरदार, ये रामगढ का छोकरा है, टेसन जा रहा था, हमे रास्ते मे मिल गया!" हे ऐकल्यावर आपल्या पालथ्या मुठीवरून चालणारा एक मुंगळा गब्बर ठाप करून मारतो! हा शिण बाकी लई ब्येस! साला त्या मुंगळ्यासारखाच सचिनचा खेळही खल्लास! :) वा! तात्या! तो सीन पुन्हा एकदा डोळ्यासमोरुन तरळून गेला. खरंच त्यासारखा सीन नाही. प्रतिकात्मकतेचे उदाहरण देण्यासाठी त्याच्या इतका चांगला सीन शोघून सापडणार नाही. (हे आता मर्डर, पाप सारखे उठवळ सिनेमे काढणार्‍यांना समजेपर्यंत शिकवावे लागेल असे वाटते)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 01/24/2008 - 07:45

In reply to तसंच शोले by अन्या दातार

Permalink

सहमत..

(हे आता मर्डर, पाप सारखे उठवळ सिनेमे काढणार्‍यांना समजेपर्यंत शिकवावे लागेल असे वाटते) सहमत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 12/11/2007 - 03:05

Permalink

अमर अकबर अँथनी ???

ह्याच सिनेमात अमिताभचा एक जबरा सीन (स्वतःच्या आरशातील प्रतिबिंबाला आयोडीन लावण्याचा) आहे. हा सीन मला आजवर सर्वाधिक आवडलेला सीन आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 12/11/2007 - 07:40

In reply to अमर अकबर अँथनी ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

नक्की आठवत नाही

पण (अमर अकबर अँथनी ??? मधेच) विनोद खन्ना अमिताभची धुलाइ करतो व कोठडीत डांबतो. नंतर सुटताना अमिताभ म्हणतो साब तुमने इतना मारा और मैने सिर्फ दो ही मारा लेकिन क्या सॉलीड मारा ना? मला जाम हसायला आले.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Fri, 01/25/2008 - 00:01

In reply to अमर अकबर अँथनी ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

आरशातला सिन !

सर्किट राव, तुम्ही दिलीप कुमारचा ' कोहीनूर ' पाहीलात का? अमिताभ ग्रेटच , पण दिलीप सुद्धा ग्रेट !
  • Log in or register to post comments

Submitted by किमयागार (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 12/11/2007 - 09:20

Permalink

चांगला उपक्रम

"नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या?" हे 'राजाबाबू' ह्या आमच्या आवडत्या चित्रपटातील सुंदर वाक्य आहे. -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 12/11/2007 - 20:25

In reply to चांगला उपक्रम by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हे वाक्य

"नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या?" अहो, हे वाक्य राजाबाबू नाही, दुल्हे राजा मधील आहे. :) वाक्य छान आहे हो... लिहिण्याचे राहिले होते. तसेच प्रेम चोप्राचे आणखी एक वाक्य आहे.. लगता है आप जिंदगी से परेशान है... ओळखा पाहू कशात आहे ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 12/11/2007 - 20:52

In reply to हे वाक्य by देवदत्त

Permalink

प्रेम चोपडा

प्रेम चोप्राचे एकच वाक्य आठवणीत राहण्यासारखे आहे...माझ्या! प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा| यावर कुठे कुठे चोपडायचं प्रेम असा प्रश्न पडतो?
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 12/11/2007 - 22:49

In reply to प्रेम चोपडा by प्रियाली

Permalink

यावर कुठे

यावर कुठे कुठे चोपडायचं प्रेम असा प्रश्न पडतो? मस्त एकदम :)
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on गुरुवार, 12/13/2007 - 20:51

In reply to हे वाक्य by देवदत्त

Permalink

सिनेमा..

लगता है आप जिंदगी से परेशान है सिनेमा राहिला की सांगायचा माझ्याकडून... तो आहे आशिक मस्ताने चित्रपटात. अभिषेक कपूर (हा कोण बुवा आता? असे नका विचारू), हरीश, आयेशा झुल्का हे आहेत त्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 12/13/2007 - 21:07

In reply to सिनेमा.. by देवदत्त

Permalink

अभिषेक कपूर उर्फ गट्टू

अभिषेक कपूर (हा कोण बुवा आता? असे नका विचारू) हा जितेंद्रचा पुतण्या असून ट्विंकल खन्नाचा शालेय जीवनातील बॉयफ्रेंड होता. एवढे क्वालिफिकेशन त्याला चित्रपट तरून नेण्यास पुरेसे पडले नसावे. (सिनेपंडीत) प्रियाली.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on गुरुवार, 12/13/2007 - 21:26

In reply to अभिषेक कपूर उर्फ गट्टू by प्रियाली

Permalink

:)

मला माहित आहे हो.. चला त्याबद्दल माहिती असणारे कोणीतरी मिळाले. :) एवढे क्वालिफिकेशन त्याला चित्रपट तरून नेण्यास पुरेसे पडले नसावे. :) तरी त्याने प्रयत्न चालू ठेवले किंवा आताही ठेवलेत म्हणा... त्याचा ट्विंकल खन्ना सोबतचा चित्रपट उफ्फ यह मोहब्बत आला होता, सिनेमा (आणि दोन्ही सिनेमात तो ही) बरा वाटला. आणि बहुधा गेल्या का त्या आधीच्या वर्षी त्याने एक चित्रपट ही दिग्दर्शित केला होता असे ऐकून आहे. हो. आठवला.. आर्यन .. अरे हा चित्रपट तर केव्हाचा प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Tue, 12/11/2007 - 22:30

Permalink

विनोद

एके ठिकाणी वाचलेला. एकदा जेम्स बाँड विमानातून खाली डुक्करांच्या कळपात पडतो. डुक्कर विचारते,"तुम्ही कोण?" जेम्स बाँड (स्टाईल मधे)सांगतो,"बाँड्......जेम्स बाँड." जेम्स बाँड विचारतो,"तुम्ही?" डुक्कर (स्टाईल मधे) सांगते, "डुक्कर......रान डुक्कर."
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 12/11/2007 - 22:52

In reply to विनोद by स्वाती राजेश

Permalink

ही ही ही

हा विनोद नव्हता ऐकला. धन्यवाद :) मी तो दुसरा ऐकला होता... जेम्स बाँड एका दक्षिण भारतीय माणसाला हे म्हणतो तो.
  • Log in or register to post comments

Submitted by राजीव अनंत भिडे on गुरुवार, 12/13/2007 - 22:46

In reply to विनोद by स्वाती राजेश

Permalink

;))))

जेम्स बाँड विचारतो,"तुम्ही?" डुक्कर (स्टाईल मधे) सांगते, "डुक्कर......रान डुक्कर." सुंदर विनोद! ;)))) स्वातीताई, काही माणसं केवळ पंचायत समिती आणि मिसळपाव प्रशासनाच्या कामकाजात अडकलेली (!) असताना आपल्यासारखी काही मंडळी मिसळपाववरील अन्य लेखनही यथास्थितपणे सुरू ठेवत आहेत याचे खरोखरच कौतुक वाटते! माझ्या मते आपल्यासारख्या, देवदत्तांसारख्या तसेच इतरही अनेक मंडळींचे लेखनच मिसळपावला पुढे नेऊ शकेल/नेईल! मिसळपावची उरलीसुरली वाटचाल सांभाळायला एक तात्या पुरेसा आहे/समर्थ आहे! मिसळपावचे आणि मिसळपाव पंचायतीचे काही ना काही दोष काढणारी आणि पर्यायाने मिसळपाव वादाच्या भोवर्‍यात कसे सापडेल ह्याची पुरेपूर काळजी घेणारी मंडळीदेखील आज मिसळपावभोवतीच घुटमळत आहेत, ही मात्र अश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना हेच मिसळपावचे वैशिष्ठ्य आहे! काय सांगावं, कदाचित या मंडळींचादेखील तो आंतरजालीय अस्तित्वाचा प्रश्न असावा असे वाटते! कारण अन्य संकेतस्थळांवर प्रशासनाबद्दल लिहायची एक तर या मंडळींना मुभा नाही आणि लिहिल्यास त्याची कुणी दखलही घेणार नाही! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 01/22/2008 - 21:38

Permalink

आज ऐकलेले दोन संवाद

"कबर मे डबल बेड नही होता वहा सिंगल ही सोना पडता है" "मेरा खून तो मेरे गद्दी के खटमल मे भी है.. तो क्या ये गद्दी उसे दे दू"
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 01/22/2008 - 22:00

In reply to आज ऐकलेले दोन संवाद by केशवसुमार

Permalink

गद्दी

हा हा हा वाक्ये आवडली... "मेरा खून तो मेरे गद्दी के खटमल मे भी है.. तो क्या ये गद्दी उसे दे दू" खरं तर गद्दीमधे खटमल झाल्यवर खरच त्यांना गद्दी द्यावी लागते :( (कालच एक गद्दी गमावलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Wed, 01/23/2008 - 15:32

In reply to गद्दी by ऋषिकेश

Permalink

अमरीका मे..

खटमल?? ये मै क्या सुन रहा हू..
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/23/2008 - 19:26

In reply to अमरीका मे.. by केशवसुमार

Permalink

अमरिका मे

अमरिका मे खटमल?? हो हो या "आम्रिकेत" मुबलक ढेकुणपंतांची वस्ती आहे. अगदी गुजरात्यांपेक्षाही अधिक ;) सगळी घरं लाकडि असल्याने असेल कल्पना नाहि पण थंडीत बर्‍याच घरांत निघतात (निदान जर्सी सिटी आणि न्यूयॉर्क मधे तरी) :(((.. साला एक खटमल इंसानको मॅट्रेसलेस बना देता है| ;) -(त्रस्त) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 01/23/2008 - 20:18

In reply to अमरिका मे by ऋषिकेश

Permalink

इथेही ढेकूण असतात अशी कुणकुण

होती पण आज ऋषिकेशच्या लिखाणातून पुरावाच मिळाला. अशा रीतीनेही अमेरिकेशी "रक्ताचं" नातं जोडलं जातं आहे हे वाचून मन भरून आलं! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 01/23/2008 - 20:32

In reply to गद्दी by ऋषिकेश

Permalink

सुचना

(कालच एक गद्दी गमावलेला) ऋषिकेश ताबडतोब पेस्ट-कंट्रोल करून घ्या नाहीतर रात्र बिछान्याऐवजी महाजालावर टिचका-टिचकी करण्यात घालवावी लागेल! (बरीच जागरणे घडलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by तात्या विंचू on Wed, 01/23/2008 - 10:33

Permalink

अंदाज अपना अपना...

अंदाज अपना अपना मधील शक्ती कपूर चा डायलॉग..... सुनो सुनो दुनिया के लोगो, मेरा नाम है मिस्टर गोगो.......
  • Log in or register to post comments

Submitted by रचनाद्लाल on Wed, 01/23/2008 - 18:05

Permalink

अप्रतिम

सत्ते पे सत्ता या सिनेमा मधले वाक्य आवडले. हेमा मालिनि चि एक खास शैली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 01/23/2008 - 20:13

Permalink

चित्रपटातिल एक अतिकॉमन सिच्युएशन ....

साधारणपणे जुन्या काळच्या दर १० सिनेमांपैकी कमित्-कमी ३~४ सिनेमात तरी हा सिन असायचा ..... साधारणता तो असा आहे, एका गर्भश्रीमंत बापाच्या पोरीचे एका अति उनाड, कामधंदा करत नसलेल्या व घरचे खाऊन फूकट लश्कराच्या भाकरी भाकणार्‍या "टोणग्या" बरोबर "सूत" जमले आहे. सहाजिकच पोरीच्या बापाला ते पसंत नाही. तर तो काय करतो, अख्ख्या गावाला एक मोठी पार्टी देतो, आपल्या "हिरोला" पण आमंत्रण असते.... ह्या भर पार्टीत तो ह्या हिरोच्या स्सनकन एक "कानफाडात" देतो व विचारतो " पूछ , आज मैने तुम्हे ये थप्पड क्यों मारा ? यावर शिरिष कणेकर म्हणतात " अरे, मारा तो मारा , आणि ऊपर तोंड करके विचारा !!!"
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 01/23/2008 - 22:33

Permalink

सरकार

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था. सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे. ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं." अनेक वर्षांनी सरकारसारखा एक उत्तम सिनेमा बघितला असेन. प्रत्येक आणि प्रत्येक फ्रेम काहीतरी सॉलिड दाखवून जाते. अभिषेक आणि कॅटरिना यासारख्या ठोंब्या कलाकारांकडून दिग्दर्शकाने उत्तम अभिनय करुन घेतला आहे. काळी बॅकग्राऊंड असूनही ती फार वाईट वाटत नाही(सावरियाप्रमाणे). दोन वाक्यांच्या मधे असणारे संगीत, डोळ्यातील भाव, सारंच अप्रतिम. कमीत कमी ५-६ वेळा बघितला असेन. आपला, (सरकारप्रेमी)अनिरुद्ध दातार
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 01/23/2008 - 22:39

In reply to सरकार by अन्या दातार

Permalink

थोडी दूरूस्ती !!!

"तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था." आपल्या भावनांचा आदर राखून थोडी दूरूस्ती करतो........ योग्य वाक्य असे आहे ............. "तुम्हे मारने के लिये मेरा यहा होना जरूरी नही , पर तुम्हे मरते हुए देखने का मजा मै खोना नही चाहता था."
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on गुरुवार, 01/24/2008 - 00:48

In reply to थोडी दूरूस्ती !!! by छोटा डॉन

Permalink

धन्यवाद

दुरूस्तीबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 01/24/2008 - 07:48

Permalink

ओमकारा

बाजी (का जुआ) घोडाँपे लगाते है, शेरोपे नही | धम धम ध्डम धड्डैया रे सबसे बडे लड्डैया रे...हे ओमकारा!!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com