ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २
खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.
दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)
मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.
ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला. :)
"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.
गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.
T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.
"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले. :D सिनेमा: अपहरण
हेच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचायला मिळतील.
प्रतिक्रिया
7 Apr 2008 - 9:45 am | विसोबा खेचर
"अब तो कुछ अच्छा नही लगता रे! अब तो यही अच्छा लगता है की कुछ अच्छा न लगे!"
हृषिदांच्या 'नरमगरम' चित्रपटात स्वरूपसंपतच्या प्रेमात पडलेल्या शत्रूघ्न सिन्हाच्या मुखी हा संवाद आहे. नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :)
8 Apr 2008 - 11:15 am | डॉ.प्रसाद दाढे
नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :)
एकदम सहमत.
त्याच चित्रपटात ए.के. हनगलने स्वरूप स॑पतच्या बापाचे काम केले आहे..तो आपल्या उपवर मुलीचे वर्णन सारखा 'गले का काटा है, न अ॑दर जाता है॑ न बाहर जाता है॑' असे करतो तेव्हा खूप हसू येते. तसेच त्यातील उत्पल दत्तचे कामही अप्रतिम..तो शत्रूघ्न सिन्हाला 'मै॑ बागवाली कोठी कि तरफ पिशाबभी नहि॑ करू॑गा..' अशी शपथ घ्यायला लावतो तेव्हासुद्धा ह.ह.पु.वा लागते.
7 Apr 2008 - 11:27 am | विजुभाऊ
तुम्हारे बडे होने से ;मै छोटा तो नही होता ना?.... नाना पाटेकर्.....जॅकी श्रॉफ
7 Apr 2008 - 11:43 am | नसनखवडी
सरपंचाचा पोर म्हनजे काय गावाचा राजा झाला का काय तू? (२-३ थोबाडीत) फुकनीच्या अजून मिसरुड फुटना तुला आणि हुशारी करतोस. आकडा कुनाला लागंल काय?
प्रियाली
7 Apr 2008 - 5:08 pm | प्रियाली
:::))))))
तू प्रियाली का? मग माझं नाव आजपासून मृदुला.
7 Apr 2008 - 5:26 pm | विसोबा खेचर
तू प्रियाली का? मग माझं नाव आजपासून मृदुला.
:))
7 Apr 2008 - 12:25 pm | तात्या विंचू
झपाटलेला मधील तात्या विन्चू चा डायलॉग....
ओम भट स्वाहा....
कालच सह्याद्रीवर लागला होता......
- केबल नसलेला.....
तो मी नव्हेच...
8 Apr 2008 - 8:59 pm | पुष्कर
भट नाही "फट्"
भट नाही "फट्"
भट नाही "फट्"
भट नाही "फट्"
ओम् फट् स्वाहा |
8 Apr 2008 - 2:54 am | पान्डू हवालदार
जाओ चने खाओ ..
राजकुमार चा ..चित्रपट आठवत नाही ...
8 Apr 2008 - 10:29 am | धमाल मुलगा
चित्रपट आठवत नाही, इतर कलाकारही आठवत नाहीत पण.....
लोकेशन - कोर्टाबाहेरच॑ मोकळ॑ पटा॑गण.
गाडीमध्ये बसलेला अभिनेता बहुधा वकिल. त्यान॑ नुकत॑च डॅनीला केसमधून सोडवलेल॑ / डॅनीविरुध्दची केस हरलेला. डॅनी त्या वकिलाच्या गाडीच्या टपावर डावा हात कोपरापर्य॑त आडवा ठेवून खिडकीशी झुकलेला. उजव्या मुठीमध्ये चणे. नजरेत अप्रतिम बेदरकारपणा, नजर एकटक वकिलाच्या नजरेत रोखून एक-एक चणा तो॑डात झेलतोय.
वकिलः उम्मीद है, इस वारदात से तुम कुछ सिखोगे| सुधर जाओगे |
डॅनी (त्याच अप्रतिम मग्रुरीत) : और अगर मै ना कहु॑ त्तो ???
एकदम खल्लास वाक्य! कित्येक दिवस मला ह्या वाक्यान॑ झपाटल॑ होत॑. एकदा तर खुद्द तिर्थरुपा॑ना आम्ही हे वाक्य टाकल॑ होत॑....पुढे आमचा कान कसा सुजला हे वे.सा॑.न.ल.
दुसर॑ -
चित्रपट : सातच्या आत घरात
अभिनेता: निळुभाऊ
वाक्यः आपल॑ हॉट्ट फेवरिट...
डे॑गळ्या माझ॑ जाकिट आण, जीप काढ !
खर॑ सा॑गायच॑ तर 'सातच्या आत घरात' मधल॑ निळुभाऊ॑च॑ एक अन् एक वाक्य मला जब्बरदस्त आवडल॑ !!!!!
8 Apr 2008 - 10:49 am | llपुण्याचे पेशवेll
डायलॉगः थँक्स फॉर द कॉम्पिमेंट
अभिनेता: डॉ. लागू..
हा डायलॉग मॅनेजर ने जर शिवी दिली तर लगेच उच्चारावा....
चित्रपटः नवरी मिळे नवर्याला
अभिनेता: अशोक सराफ
डायलॉगः मी हुशार आहे बालपणापासून
जर कोणी कुत्सितपणाने आपल्याला तु हुशार आहेस असे म्हणाले तर त्यावर हे उत्तर द्यावे... :)
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 11:23 am | धमाल मुलगा
म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो)
करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे.
एकदा ही गा॑धीगिरी करुन बघावी म्हणतो. :-))))
8 Apr 2008 - 10:31 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो)
करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे.
अहो असाच समज आमचाही होता. पण नंतर माझ्या एका पक्क्या पुणेरी मित्राने आमचे प्रबोधन केले.
त्याने सांगितले संताप आणि त्रागा करून काहीही साध्य होत नसते. उलट जास्तीत जास्त शांत राहून विचार करावा की अशा लोकांचा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान कसा करता येईल. त्याला पुणेरी खवचट पणाची जोड द्यावी. मग काय विचारता साहेबा! साहेबही आपल्याशी बोलताना विचार करून बोलेल. समजा मॅनेजर ने त्याला त्याच्या मिटींगसाठी लागणारा डेटा बनवायचे काम आपल्याला दिले तर मुद्दाम त्यात खूप चूका कराव्या. आणि लगेच ते शीट रीव्हीव्यू साठी पाठवावे. त्यात खूप चूका असल्याने मॅनेजर आपल्याला त्याच्या केबिन मधे बोलावून त्या दाखवतो आणि तिथेच लगेच सुधारणा करतो . लगेच साहेबाला म्हणावे की 'तुम्ही मार्गदर्शन करता म्हणून कंपनी चालते आहे नाहीतर अवघड होते"(साहेबाच्या चेहर्यावर 'तुझे आहे तुझपाशी' मधल्या शामभैयाच्या चेहेर्यावरच्या सारखे भाव दिसू लागतात.). मग लगेच त्यावर म्हणावे 'पण सर या वेळेला कंपनीचा नेट प्रॉफीट कसा काय कमी झाला' (अर्थातच याचे उत्तर याच्यासारखे ओव्हरपेड मॅनेजर असल्यामुळे). साहेबालाही जे कळायचे ते कळते( जर तो सुज्ञ असेल तर अर्थात)
परत लोकानाही वाटते कि हा फार वेळ साहेबांच्या केबिन मधे होता आणि साहेबाना काहीतरी सांगत होता. लगेच हापिसात आपले वजन वाढते. अर्थात हे सगळे करण्यासाठी आपले विहीतकर्म नीट करणे हा बेसिक क्रायटेरीया असतो हे ही ध्यानी ठेवावे..
:) :)
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 11:21 am | प्रगती
अहो!
आजकाल चित्रपटात पंजाबी भाषा व गाणी यांची ईतकी वाढ झाली आहे की आपली
राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.
8 Apr 2008 - 11:45 am | विजुभाऊ
राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.
ते खरेच आहे..............
पाकिस्तानात पण लोकाना असेच वाटते
8 Apr 2008 - 12:30 pm | धमाल मुलगा
असेलही तस॑.
पण आपल्याला मात्र ही भाषा प्रच॑ड आवडते.काय लहेजा आहे ! काय ठसका आहे! ठसकेबाज म्हराठीन॑तर न॑बर लागतो तो प॑जाबीचाच.
माझ॑ प॑जाबी गाण्या॑च॑ कलेक्शन ( हि॑दी चित्रपटातली नाहीत, प॑जाबी!) बघून एकदोघा॑नी मला विचारल॑ही होत॑, 'तुस्सी प॑जाबी हो?'
त्यातुन बरेचसे दिग्दर्शक, निर्माते हे दिल्ली, प॑जाबकडचे असल्याने असेल कदाचित, त्या॑ना आपल्या 'मातृभाषेविषयी' ओढ जरा जास्त असेल.
आपला महेशभौ मा॑जरेकर नाही का, त्याच्या पिक्चर्समध्ये जास्तीत जास्त मराठी माणस॑ घेण्याचा प्रयत्न करतो. जमल॑च तर एखाद॑ मराठी गाण॑ (मोडतोड करुन का होईना), शक्य असल्यास टाकण्याचा प्रयत्न करतो.
- धमालसि॑ग भि॑द्रनवाले
8 Apr 2008 - 12:41 pm | अन्या दातार
अपहरणचा विषय पहिल्यांदाच निघाला म्हणून त्यातील नानाचे आणखी एक वाक्य आठवले.
(नाना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाषण करत असतो तेंव्हाचे)
काले करतूतोंकी काली सरकार! गिरा देंगे हम इस सरकार को.
यातील गिरा देंगे हे शब्द ज्या ढंगाने म्हणले आहेत, अप्रतिमच. निर्ढावलेपण आणि अभिनय याचा उत्तम वस्तुपाठ.
9 Apr 2008 - 8:54 pm | देवदत्त
ह्याच प्रकारे सरफरोश मधील गोविंद नामदेव (वीरन) चे वाक्य. पूर्ण नाही आठवत सध्या.
"जबान देने का मतलब जानते हो? अगर नही कर पाये तो मैं तुम्हारी जबान खींच लूंगा. फिर तुम किसी को जान तो दे पाओगे, पर जबान नही दे पाओगे."
इथे "जबान खींच लूंगा" ज्या अंदाजात म्हटले ते मस्तच.
8 Apr 2008 - 6:04 pm | केशवराव
' चाय बनाओ....... अब मुझे शक्ती चाहिये.'
अमिताभच्या एक्स्प्रेशन्स बघत रहाव्या.
एक्स्प्रेशन्सचा चाहता ....... केशवराव.
9 Apr 2008 - 12:37 pm | आंबोळी
अशोक्,अनुप्,किशोर कुमार जेवण्याच्या टेबलवर....अशोक कुमार किशोर कुमारला समजावत आसतो...
अशोक : मन्नू तुने अभी दुनिया देखी नहि है...
अनुपः मन्नू अभी तुने दुनिया देखी नही....
अशोक : तूने देखी है?
9 Apr 2008 - 1:24 pm | आंबोळी
"If you wanna shoot , shoot.... Don't talk"...... Elli Walach
9 Apr 2008 - 8:48 pm | देवदत्त
Stop trying to hit me and hit me.
He is the one.
and
Unfortunately no one can be told what the matrix is. You have to see it yourself.
तसेच
Rush Hour:
FBI needs this bike. ह्यावर तो बाईक वाला नाही म्हणतो. तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो. :D
9 Apr 2008 - 11:54 pm | स्वाती राजेश
तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो.
ख्रिस टकर आहे तो....जॅकी चेन बरोबर त्याने रश अवर १,२ आणि ३ केले आहे.
10 Apr 2008 - 12:04 am | अनिकेत
कार्टर नाव ना त्याचे....आणि जॅकीचे नाव ली....
10 Apr 2008 - 12:06 am | एक
माझ्या अत्यंत आवडीचा पिक्चर..
अजुनही काही डायलॉग..
What is real?
Don't try to bend the spoon. Instead try to think there is no spoon, then you know it's not the spoon but you are bending.
The rules are similar to the rules in a computer game. Some of them can be bent others can be broken.
अतिशय जबरी पिक्चर (३ ही भाग) मी आणि माझा दुसरा एक मित्र मॅट्रीक्स वर बोलून इतरांना जाम बोअर करतो..
10 Apr 2008 - 12:12 am | एक
फुल और काटे मधे वापरला आहे..
त्या डायलॉगच नशीबच बोंबललं होतं.
9 Apr 2008 - 11:36 pm | अनिकेत
सगळ्या डायलॉगांचा बाप.
"अ फ्यू गुड मेन" मधे जॅक निकलसन....
You can't handle the truth! Son, we live in a world that has walls. And those walls have to be guarded by men with guns. Who's gonna do it? You? You, Lt. Weinberg? I have a greater responsibility than you can possibly fathom. You weep for Santiago and you curse the Marines. You have that luxury. You have the luxury of not knowing what I know: that Santiago's death, while tragic, probably saved lives. And my existence, while grotesque and incomprehensible to you, saves lives...You don't want the truth. Because deep down, in places you don't talk about at parties, you want me on that wall. You need me on that wall. We use words like honor, code, loyalty...we use these words as the backbone to a life spent defending something. You use 'em as a punchline. I have neither the time nor the inclination to explain myself to a man who rises and sleeps under the blanket of the very freedom I provide, then questions the manner in which I provide it! I'd rather you just said thank you and went on your way. Otherwise, I suggest you pick up a weapon and stand a post. Either way, I don't give a damn what you think you're entitled to.
येथे पहा.
बस.