मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 10:24 pm

दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत.
या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील.
१. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात.
२. कथा सुमारे ५०० ते २००० शब्द या शब्दमर्यादेत असावी.
३. स्पर्धकांनी फक्त स्वत:च्याच कथा द्याव्यात, इतर कुणाच्या कथा परवानगी असली तरीही देऊ नयेत.
४. स्पर्धेचा निकाल तज्ञ परीक्षक ठरवतील, जो दि. २७-२-१५ रोजी जाहीर केला जाईल.
५. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके दिली जातील. ही पारितोषिके पुस्तके या रुपात असतील.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !! :)

संस्कृतीवाङ्मयकथामुक्तकभाषासाहित्यिकसमाजजीवनमानआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2015 - 10:34 pm | सानिकास्वप्निल

लेख / लघुकथा वाचण्यास उत्सुक :)
सर्वांना शुभेच्छा !

आदूबाळ's picture

2 Feb 2015 - 12:05 am | आदूबाळ

हैला! भारीच!

नगरीनिरंजन, आतिवास, गवि, स्पार्टाकस
मोजी, मकले
यांच्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. सर्वांनी नक्की मनावर घ्यावे!

मुक्त विहारि's picture

2 Feb 2015 - 7:53 am | मुक्त विहारि

रामदास, सर्वसाक्षी ह्यांनी पण कळफलक हातात घेतला तर फार उत्तम..

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Feb 2015 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे............????????

वरच्या यादित माझे नाव राहिले की.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 12:06 am | डॉ सुहास म्हात्रे

असं कसं, असं कसं ? मी खालच्याच प्रतिसादात "नव्या-जुन्या मिपाकरांना" आवाहन केले आहे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

कथा सांगण्यास सर्व नव्या-जुन्या मिपाकरांच्या कथांची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहे ! सर्वांना अनेक शुभेच्छा !!

ओए मिपाकरो, शुरू होज्जावो !!!

स्वामी संकेतानंद's picture

2 Feb 2015 - 8:10 am | स्वामी संकेतानंद

सुरेख उपक्रम ! शुभेच्छा !

(लघुकथांच्या प्रतिक्षेत) स्वामी

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 8:45 am | अत्रुप्त आत्मा

@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (????) स्वामी! :-\

स्वामिज्जिंच्या लेखन प्रतिक्षेत - आत्मू! ;-)

हां! आता जम्लं! :-D

स्वामी संकेतानंद's picture

2 Feb 2015 - 8:53 am | स्वामी संकेतानंद

फ़ुर्र्र्र्र्रर्र्र्

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

ठीक आहे स्वामीजी. च्या पिवून झालं की मंग लिवा. आम्चं कायबी म्हण्णं नाय :)

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2015 - 10:20 am | विशाल कुलकर्णी

अरे वा ! छान उपक्रम, वाट पाहतोय मेजवानीची :)

आदूबाळ's picture

2 Feb 2015 - 12:46 pm | आदूबाळ

बादवे

मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.

याबद्दल अधिक माहिती द्यावी. कोण कोण लिहिणार आहे? आम्ही (वाचक) फरमाईश करू शकतो का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व सभासदांच्या सुचना/फर्माईशांचे स्वागतच असेल ! तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे नाव सुचवू शकता.

मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध दाम्पत्याची कथा जोडीने आली तरी आवडेल ! :)

त्यांचे हे काय म्हणतात त्यावर सगळं आहे.

अजया's picture

2 Feb 2015 - 1:42 pm | अजया

सुचवा सुचवा.पण लवकर.लिहिणार्याना पुरेसा वेळ मिळेल लवकर निरोप गेल्यास.

अरे वा आता छान लघुकथा वाचायला मिळतील तर.

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 4:31 pm | वेल्लाभट

अरे वा ! मस्तच....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 4:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल कथा प्रसवायचा प्रयत्न करुन पहातो.

*mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL*

टेक्निकलसुद्धा चालेल हो ! =)

स्पंदना's picture

4 Feb 2015 - 2:05 pm | स्पंदना

कॅलिस्पो!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Feb 2015 - 7:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅलिस्पो नै!!! कॅलिप्सो!!! =))

नको. लेखणीमधुन भयकथा निघायची ती पण दिर्घ.

किती एंट्री पाठवायचा याला काय मर्यादा हायती का ?
नाय मंजे दोन डोक्यात हायती पाठवतो.
पुस्तकासाठी कायपण .
अवांतर-जल्ला आदी का नाय सांगितल आमच "गुपित " होत की .. *wink*

सस्नेह's picture

2 Feb 2015 - 9:30 pm | सस्नेह

किती लिवाल तितक्या द्या, हाकानाका +)

प्रभाकर पेठकर's picture

6 Feb 2015 - 10:02 am | प्रभाकर पेठकर

>>>> दोन डोक्यात हायती

हा दुतोंडीपणा ठिक नाही हो.

सूड's picture

2 Feb 2015 - 5:35 pm | सूड

ह्म्म्म !!

सस्नेह's picture

4 Feb 2015 - 8:35 am | सस्नेह

लै इच्चारात पडलात +)

सूड's picture

4 Feb 2015 - 4:40 pm | सूड

व्हय जी!!

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 9:41 am | सस्नेह

चांगला इचार करा आन लिवा येक झकास ष्टुरी ! +)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 8:08 pm | अत्रुप्त आत्मा

कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?

वैभव जाधव's picture

2 Feb 2015 - 8:12 pm | वैभव जाधव

कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?

अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. (दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ;) )

या हिशोबाने शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? :D

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा

@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. >> :-D आले व्वा व्वा! :-D कित्ती चान चान चमजाऊन छांगितलत! ;-)

@(दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ) >> व्वाह! हे तल लैच्च भाली! :HAPPY: रच्याकने:- आपण उत्तरेतून आलात की काय? :P

कुणीतरी खरच सांगा ना....???? :-\ .. :-\ .. :-\

@ शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? >> =)) आदू रॉक्स! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे

या लेखात दिलेल्या नियमात बसेल ती कथा या स्पर्धेसाठी लघुकथा समजली जाईल. :)

दोन हजार शब्दांपेक्षा मोठी कथा चालेल का संपादक्स?

शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे, काटेकोरपणे मोजली जाणारी नाही.
तथापि 'लघुकथा' म्हणता येईल इतपत असावी.

आदूबाळ's picture

6 Feb 2015 - 12:56 pm | आदूबाळ

बर्र...