मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २. कथा सुमारे ५०० ते २००० शब्द या शब्दमर्यादेत असावी. ३. स्पर्धकांनी फक्त स्वत:च्याच कथा द्याव्यात, इतर कुणाच्या कथा परवानगी असली तरीही देऊ नयेत. ४. स्पर्धेचा निकाल तज्ञ परीक्षक ठरवतील, जो दि. २७-२-१५ रोजी जाहीर केला जाईल. ५. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके दिली जातील. ही पारितोषिके पुस्तके या रुपात असतील. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !! :)

वाचने 12225 वाचनखूण प्रतिक्रिया 37

आदूबाळ Mon, 02/02/2015 - 00:05
हैला! भारीच! नगरीनिरंजन, आतिवास, गवि, स्पार्टाकस मोजी, मकले यांच्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. सर्वांनी नक्की मनावर घ्यावे!

कथा सांगण्यास सर्व नव्या-जुन्या मिपाकरांच्या कथांची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहे ! सर्वांना अनेक शुभेच्छा !! ओए मिपाकरो, शुरू होज्जावो !!!

In reply to by स्वामी संकेतानंद

@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (????) स्वामी! :-\ स्वामिज्जिंच्या लेखन प्रतिक्षेत - आत्मू! ;-) हां! आता जम्लं! :-D

आदूबाळ Mon, 02/02/2015 - 12:46
बादवे
मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
याबद्दल अधिक माहिती द्यावी. कोण कोण लिहिणार आहे? आम्ही (वाचक) फरमाईश करू शकतो का?

जेपी Mon, 02/02/2015 - 17:01
किती एंट्री पाठवायचा याला काय मर्यादा हायती का ? नाय मंजे दोन डोक्यात हायती पाठवतो. पुस्तकासाठी कायपण . अवांतर-जल्ला आदी का नाय सांगितल आमच "गुपित " होत की .. *wink*

In reply to by अत्रुप्त आत्मा

वैभव जाधव Mon, 02/02/2015 - 20:12
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?
अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. (दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ;) )

In reply to by वैभव जाधव

@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. >> :-D आले व्वा व्वा! :-D कित्ती चान चान चमजाऊन छांगितलत! ;-) @(दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ) >> व्वाह! हे तल लैच्च भाली! :HAPPY: रच्याकने:- आपण उत्तरेतून आलात की काय? :P कुणीतरी खरच सांगा ना....???? :-\ .. :-\ .. :-\ @ शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? >> =)) आदू रॉक्स! =))

In reply to by आदूबाळ

सस्नेह Fri, 02/06/2015 - 12:50
शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे, काटेकोरपणे मोजली जाणारी नाही. तथापि 'लघुकथा' म्हणता येईल इतपत असावी.