मागिल भाग-१६
आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक
अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे
मंगलाष्टकांचा!
पुढे चालू...
=================
खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत
असले/नसले तरी मुद्दाम कोणी मुलि'कडच्यांकडे आज हे रडतायत कि नै? ते बघू!!! म्हणून नेम धरूनंही बसत नाहीत. काहीवेळा मंडळी जास्त हळवी असतील,किंवा मुलगी लगीन लागल्याच्या दुसर्याच दिवशी परदेशी
चाललेली असेल,तर वातावरण अंमळ जड असतच.मग तिथे कुणी गंगा सिंधु सरस्वती च यमुना हे साधं मंगलाष्टक म्हटलं तरी, त्या मंगलाष्टकी परिणामामुळे अनेकांचे रुमाल डोळ्यांशी जातात. पण एरवी अगदी मुलिचा मामा...ही व्यक्ति लवकर येत नसेल..तर आमच्याकडला माइक घेऊन स्टेजवरनं, अरे दुसरे मामा-आणा रे,हे काहि येत नाहीत असं वाक्य हशा उडवून जातं. तेव्हढ्यात मुलाकडचे (विदाऊट माइक) तिकडनं ओरडतात... मुलगीही दुसरी चालेल!!! आणि स्टेजवर अजुन हशा पिकतो.
पण या लग्नातलं (आंम्हाला) सर्वात जास्त हसविणारं काय? असा प्रश्न तुंम्ही कोणत्याही गुर्जींना विचारा..सगळे जणं एक जात ह्या मंगलाष्टकांचे नाव घेतील! काय आहे,की मंगलाष्टकं जेंव्हा कुणी म्हणतात तेंव्हा त्यांना गायन येत असावं असली अपेक्षा कुणीच ठेवणार नाही.मंगलाष्टकं ही गळ्यानी गाण्यापेक्षा भावनेनी गायची चीज आहे. पण ह्यातलं काहिही लक्षात न घेता आजकाल केवळ दिखाऊपणा म्हणून आणि सहज भावने ऐवजी कर्तव्य पार पाडल्यासारखी ही हौशी गवय्यी मंडळी माइक गळ्याशीं घेतात तेंव्हा एकंदरीतच भयाण अवस्था प्राप्त होते. यात वाट्टेल तिथे केलेली तोडातोड हा तर भयंकर विनोदाचा अगदी अस्सल नमुना म्हणावा लागतो
म्हणजे:-
नेत्री Ssssssssssssssss दोSsssssssssssssss - न हिरे प्र-काश(?) प सरेSsssssssssssssss
अत्यंSsssssssssssssss त ते , साSsssssssssssssजिरे ( एका नी तर शहा जिरे म्हणून त्याची कडक फोडणी केली होती इथे!
माथाsssssssssssssss शेंssssssssssssदुरं---------पा(?)झरे वरि-बरे* sssssssssssssss!!! (इथला* सदर रे'कार, म्हणजे दिड मिनिटाचा पाझर तलाव होतो,आणि सदर व्यक्तिच्या मंगलाष्टक-टाकण्याच्या ष्टैल मुळे ,तो माथ्यावरुन शेंदूर पाझरून पाझरून दमलेला गंपतीबाप्पा..हा मला भजी तळून कंटाळलेल्या आणि माथ्यावरून घाम पाझरणार्या आचार्या सारखा दिसायला लागतो.) दूर...........वांssssssssss-कुरां......चे तुरे!!!(????) (इथे त्याच भजी तळणार्याच्या घर्मीत'कपाळावरची पुढे आलेली केसांची बट दिसते!)
माझेssssssssss ची*sssssssssत्तविरे(tavera गाडी!)मनोsssरंssssssssssssssथपुरे!!! (काय थापू रे??? भाकर्या की गोवर्या??? *DASH* ) (* ही र्ह्स्व असलेली चि अनेक जण जाणिवपूर्वक दिर्घ आणि गळा काढून आणखी प्रदीर्घ करतातच! ) देखोनी चीं(?)ssssssssssssssता-हरे। (इथे हरेभरे कबाब अठवतात!)
Go*....सावीssssssssssssssssssssssसुतवाsssssssssssssssssssssसु(?)देव - कवि रेsssssssssss .(गोसावीसुत वासुदेव कवि रे ही ओळ,ज्या पद्धतीनी लचके तोडून म्हणली जाते.ती पाहिल्यावर तो बिचारा गोसावीसुत वासुदेव नावाचा कवि आहे,अशी साधी माहिती न लागता, गोसाव्यानी वासुदेव नावाच्या कविला दोर्यानी सुतवून,सदर काव्य रचायला पकडून ठेवलेला आहे की काय अशी शंका येते) (आणि * इथे गोसावीतला गो हा गळा-काढणार्याच्या घशातनं ,अक्षरशः घरातून पार्श्वभागवर लाथ घालून हकलल्या सारखा बाहेर येतो..म्हणूनच तो मुद्दाम विंग्रजीत टंकलाय हो वाचकांनो!)
त्या मोssssssssssssssssss रया........लास् मरे!!! (ठ्ठार झालं मंगलाष्टक!..इत्यर्थे-संपलं!)
याशिवाय आपला आवाज हा कसा आहे? हा विचार करणे तर दूरच.उलट तो फार चांगला आहे.आणि अजुन (जिवंत)उरलेल्या बाकिच्या जगानी तो ऐकलेला नाहिये. असा समज दृढ असणारी मंडळी तर लाइव्ह ऐकलेलीच (कळायला) बरी! अगदी बकरी/म्हैस/रेडा/केकाटणारं कुत्रं अशा अनेक स्थिरंचरं प्राण्यांशी स्पर्धा करणारे अवाज असलेली खाशी मंडळीच ही! यांना आपण काहि सांगायला जाणं,हे तर महापाप असतं. एकदा मी अश्याच एका रेडी-रेक-नराच्या भयाकारी आवाजाला त्रासून श्टेजवरनच , "घसा ठीक नाही का आज आपला?" असं ,किमान त्याला जाणिव होइल इथपर्यंतच विचारलं.तर त्यावर मला "घसा बेश्ट असतो आपला,(तुमचा!)माइक फाटलाय!" असं नामोहरम करणारं उत्तर दिलं.
आणि हाच रेडी असलेला रेकणारा नर मंगलष्ट्क तर असं दिव्य गायला. की श्टेजमागच्या आमच्या कामगारालाही हसू अवरे ना! मंगलाष्टकंही साध..,स्वतःला ओळखिच्या गल्लीतलं (म्हणजे मराठी) घेत नाहीत ही मंडळी...एकदम संस्कृत माल काढतात!
या कुंदेंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता |
या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता |
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ||
आता वरिल(दोन्ही)रचना म्हणजे काहि खरंतर मंगलाष्टकं नव्हेत.पण आपल्याला मंगलाष्टकं येत नाहीत,म्हटल्यावर वृत्तात-बसणारी प्रत्येक रचना जणू मंगलाष्टक(च),असा सामाजिक गैरसमज जो आहे.त्यामुळे आपल्याकडे मंगलाष्टकांना काहिही-घेतलं जातं! बरं घेतलं तर ते नीट किमान शब्द घटवून तरी म्हणावं..हे ही भान अनेकांना नसतं. किंबहुना श्टेजवर माइक घेऊन गळा-सोडायला मिळणे!!! हीच यांची प्रमुख गरज असल्यामुळे,हे भान यांना येणं शक्यच नसतं...अशी आता आंम्ही गुर्जी लोकांनी मनाला समजुत घालून घेतलेली आहे. असो!
त्या रेकनरा'नी सुरवात केली..,तीच फटाका फोडून! त्यानी याकुंदे ही पहिली तिन अक्षरं नळाचा पाइप सुटून भस्सकन पाणी अंगावर यावं तशी रेकली...आणि त्यामुळे याकुंदे हा शब्द अक्षरशः "वाकून दे"..असा ऐकू आला..! आमचा ब्याकश्टेजवाला पोर्या पार फुटला त्यावेळी. अहो..,त्यांना सुद्धा ऐकून ऐकून हीण आणि कस कोणतं? हे कळत..आणि या महान लोकांना त्याचा गंधही नसतो. आवाज तर असा दिव्य फुटत होता,,की शाळेत जात नसलेल्या पोराला बुकलत बुकलत पहिल्या प्रार्थनेच्या रांगेत आणून उभं केल्यावर ते ज्या आर्ततेनी प्रार्थना म्हणेल..तसा किंचाळत होता बिचारा. पोर्या मला म्हणतो.."आरे काका,ह्येन्ना येइत नाय,तं गातात कशाला रे!!!?..मला मेला जाम हसू येताय हां..मेला याकुंदे ला वाकून दे काय म्हंन्तो??? ह्या ह्या ह्या...वाकून काय द्येऊ? xटं????? (आणि यानंतर मात्र मी आडवा!!! =)) )
त्यादिवशी श्टेजवर अनेक जणं ह्या पहिल्या बॉम्बनी फुटले होते..पण त्याचं या रेक'नरास अज्जिब्बात सोयरसुतक नव्हतं..तो पुढे किंचाळतच होता...शब्द/अक्षरं तर जिथे श्वास-लागेल तिथे लाथा घालून उडवत होता..
(आमचा बॅकश्टेजवाला पोर्या ... पडद्यामागून हसून हसून ज्या कमेंट पास करत होता,त्याही सोबत कंसात जोडल्या शिवाय ही मंडळी नीट कळायची नाहीत आपल्याला.)
ह्या....कूं..........दे...........थु(?)तु.....षार.....हा..........र-ध*वला (पोर्या:- "बा#*@$%ला ह्याच्या! ...थु केल्यावर तुषार नाय उडनार तर काय मशाल लागनार!?? =)) )
या...शुब् ब्र ...वसतरा (?) व्रता (पोर्या:- मेल्यान..वस्तरा मारलन! )
यावि..........णा...वरदंड मांडीत करा ..... (पोर्या:- आय आय..काकानू!)
याशवेत...पद..मा...सना (पोर्या:- =)) ..)
याब्र...म्मा...** (सदर दोन अक्षरं मनातच वाचावी अशी नम्र विनंती!) शंकर..प्रब्रुति...भिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र (पोर्या:- भिंगरी उडाली!)
दे...वै:........सदा..........,वन(ONE)...दिता (पोर्या:- =)) ..)
सामान.... पा....तु-सरस् वती भगवती (पोर्या:- काका..मरतय मी आज! =)) ..)
निश्शे....श-जाड्या.......पहा (पोर्या:- =)) .. =)) .. =)) .. निर्वाण! )
अश्याच एका उत्साही (नवगायक)वीरानी केलेली अजुन एक हत्या आपण पाहू...
हे मूळः-
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णाःपूर्णजलैःसमुद्रसहिताःकुर्वन्तु मे मंगलम् ।।
....................................................................
आणि हा त्या वीरानी दिलेला बुक्का...(म्हणजे..अक्षरशः वाट!)
गंगा शीन्.....धुसरस वती च यमु ना(????)....,गोदा.........वरी(?) नर.....मदा (साक्षात मृत्यू!!!)
का....वेरी....शर....यू(you)म हेन्द्र........तन........या चर...मण....वती....वेदि.....का?????? *DASH*
क्षिप्प...रा... वेत.....त्रवती महा....सुरनदी...ख्याताज.....या गण....डकी ..(बेडकीनी उडी मारल्या सारखं वाटलं की नै!?...मग??? असं डकवता आलं पाहिजे!)
पुरणा...पूर.......(आलाच आता!) णजलैस........समुद्रसइ.ता(??)ssss कूर...वन(परत ONE) तु.मे मं-गलम् (इथे मी होतो नव्हतो..तो गळून पडलो!)
बरं हे सगळे मेल सिंगर जेव्हढे जिवघेणे तश्याच फिमेल शिंगर ह्या ही आंम्हाला शिंगावरच घेतात...
एक बै:- ओ...गुर्जी
मी:- ........???????
बै:- त्यो मैक द्या हिकडं!
मी:- अहो..पण (आता मुहुर्त टळून अर्धा तास होत आला..सगळ्यांची मंगलाष्टकं झाली..मी पहिल्यांदाच सांगितलवतं..तेंव्हा तुम्ही कुठे होतात?) हा प्रश्न मी मनात म्हणलेलो आहे..तो पर्यंत बैंन्नी माझ्या हातुन मैक घेउन आपल्या खास म्हैस-रेडकू आळवणी स्वरात सुरवात केली देखिल होती.... शिवाय ही सगळ्यांची नावं ओवुन केलेली मंगलाष्टकं..म्हणजे दिवाळीत मुलांनी शिल्लक राहिलेले फटाके शेवटी केराच्या जाळात टाकले की ते जसे वेगवेगळे आणि विचित्र वाजतात...तशी ही मंगलाष्टकं ऐकू येतात.
आता ऐका बरं का या बैंन्ना..... (कंसात मी उमटलो/फुटलो आहे!)
आली गं आली माजी लग्नाला ल्येकं(मंजे तलाव का?) जनू..(हे नाव??.. की???)
हौशेनी आले रामं काका...संजू येश्या नानू (वाजवा हॉर्न!!!)
सावित्री साडी झ्यॅकं..ब्लाऊजही म्या....चिंग (आई...गं!...हे काय मधेच?)
लागू दे लग्न जोरात..ताश्याही वाजो ढ्ढिंग्ग (हिंग घाला,थोडं अता!!!)
आजुबाजुच्या लोकांकडे बघुनः- शुबमंगल स्सा...व दान..शुबमंगल स्सा...व दान ( पोचलं दान!)
काहि बायका हल्ली मंगलाष्टकं छान लिहुन/रचुन तयारी करून आणतात...ती मंगलाष्टकं किंवा विवाहगीतं(हा प्रकार परत बाहेर येऊ लागलाय हे एक सुचिन्ह आहे.) अतिशय चांगली असतात.कारण ती बरेचदा समुहानी गायली जातात.पण...तीच एखाद्या टिव्ही च्यायनलचा स्पर्धेचा फड-मारलेल्या एखाद्या अत्युत्साही स्त्री ने हतात घेतली,की पोळी अगदी छान गो........ल झाली,पण पदर-पापुद्रा सुटला नाही...,अशी त्या गीतंललितांची एकंदरीतच बेचव अवस्था होउन जाते. कारण या नवोत्साही गीत गाण्याऐवजी आपलं गाणं त्या गीतात कसं दिसतय??? हेच दाखवायला जातात. एकदा तर एक बाई..आपल्याला सर्दी झालेली आहे,हे विसरून अश्या काहि-सुटल्या की त्यांची मंगलाष्टकं,म्हणजे मूळ चायनिज किंवा जपानी बोलित लिहिली आहेत की काय? अशी शंका उपस्थितांनाही आल्या वाचून राहिली नाही.
वास्तविक मंगलाष्टकं ही कश्यासाठी? त्यांचा उद्देश काय? हे दरवेळी (आंम्हा) पुरोहित वर्गाकडून सांगितलं गेलं नाही तसंच ते समाजानीही शोधुन हुडकून काढून टिकवलं नाही..हे एक सत्य आहे. वधू/वर हे आता सहजीवनाची सुरवात करत आहेत.(किती छान क्षण असतो तो!) याची त्यांना जाणिव करून देणं हा या समुहसंस्काराचा गाभा(घटक) आहे(असला पाहिजे). ज्यांना आपण विवाहललिते आणि मंगलाष्टके असं म्हणतो..त्यातल्या बहुसंख्य रचना ह्या त्या आशयाच्याच असतात/आहेत.
प्रीती वाचुनी ना प्रपंच फुलतो,हे सत्य ध्यानी धरा
आदर्शाप्रत पोहचवा घरंकुला,नीती सदा आदरा
सांभाळा कुलंकिर्ती धन जे,माता पित्यांनी दिले
त्यांचे श्रेय्य सुखप्रद तुम्हा,कुर्याद्वयोर्मंड्गलम्
एखाद्या कलिकेपरि उपवनी,होतीसं तू डोलतं
आता या सुमना समोरं जगं हे,आले नवे हासतं
मायेचा परिवार सोडुनी जुना,माया नवी घेशिलं
आशिर्वाद नवे जन तुला,होवो सदा मंड्गल
सकलं वरदं झाल्या,देवता या मुहुर्ती
उधळि उभय शिर्षी,अक्षता होसं पूर्ती
गजरं करिती वाद्ये,दूरं झाला दुरावा
शुभदं विधि विधिंन्ने,भेटती जीवं जीवा
लग्नमंडपात आपण सर्वच्या सर्वजणं (आता) मंगलाष्टकं म्हणत नसतोच.पण ती (आधी) नीट शब्दातून(तरी) ऐकू गेली पाहिजेत ही जबाबदारी जशी म्हणणार्यांची आहे(असायला हवी!),तशी ऐकु येणारी ओळ न ओळ आपणंही लक्षपूर्वक ऐकणे..ही आपलीही जबाबदारी आहे(असायला हवी!). कारण,त्याशिवाय ती आपण म्हटली ..असं होत नाही. आणि असं झालं नाही,तर आपण हतात ज्या अक्षता घेतो..त्या वधुवरांपर्यंत नुस्त्याच-पोहोचतील...आशिर्वाद नाही!
(आत्म्या....मेल्या.. किती शिरियस होतोस रे तू? आरे..तुझ्या [मूळ ;) ] आत्म्याला काय वाटेल? ह्याचा इचार कर की! आनी पब्लिकला त्ये आवडलं का? मेल्या...पब्लिक हाच तुझा मूळ-आत्मा किंवा आत्म-मूळ आहे...तेंव्वा जरा त्याला हसव...नाय तं मेल्या तू नुस्ताच काय...अमर होनार?.. हाशिव जरा त्यांना हाशिव!.........इति-काका!)
असो! गांभिर्य झालं.... ते विनोदाच्या फोडणी शिवाय पचायचं नाही.
काय आहे ना? माझ्या सारख्या सर्वस्वी अतृप्त असलेल्या आत्मूभटाला फार सिरियसनेस फार काळ मानवत नाही.इथेही आणि आमच्या-त्या श्टेज'ला..म्हणजे तिथेही! मग कुणी भावपूर्ण गायलेल्या एखाद्या मंगलाष्टकानी पब्लिक आणि वातावरण फारच गंभीर वगैरे होतय असं लक्षात आलं..की आंम्ही हल्लीचा (पुण्यात तरी! ) लोकप्रीय झालेला.. तो जवळ जवळ येता मीलनाचा...मुहुर्ती बाँम्ब टाकून्,थोडा ग्गा........र हवेचा फवारा सोडतो.
जवळ जवळ येता...मीलनाचा-मुहुर्त
उभय तरुण जीवा...वाटती शब्द------व्य........र्थ!
झटपट पट पट आता..अंतःपट दूर सारा
अन् अधिरं बहुत होता...पं........ख येतीलं हारा
सुमुहुर्त सावधान!!!
हे मंगलाष्ट्क...म्हणजे श्टेजवर असलेल्या वर्तमान वधुवरांनाच नव्हे,तर त्यापूर्वी लग्न झालेल्या आणि (लवकरच) होणार्या काहि-जणांना(ही), अगदी अंतर्मनात गुदगुल्या करून हसवतं! शेवटी..,हा विवाहसोहळा म्हणा किंवा संस्कार म्हणा.हे नाटका सारखच असतं! त्याचा पुढील आयुष्यात काहि परिणाम शिल्लक रहायला हवा असेल,तर मेंदुत काहि श्रुती आणि काहि स्मृती कायमच्या नोंदल्या जायलाच हव्या.आणि त्यासाठी गंभीरता जशी आवश्यक,तसाच विनोदंही आवश्यकच! त्याच्या शिवाय जीवन चालत नाही,मग नाटक तरी कसं चालेलं?
चला...लोकहो मी परत गांभीर्याकडे झुकायला लागलो हां!!! त्यामुळे आता तुम्हाला अधिक त्रास देत नाही...वरती आमचा हा मंगलाष्टकांचा लिखित वृत्तांत इतका वेळ सहन केलात..आता आणखि काही क्षण ह्या खालच्या
http://mfi.re/listen/ti65gec48ffqxbd/my_mangalashtak1.ogg
लिंकेवर लावलेला फक्त मंगलाष्टकांचा लाइव्ह शो...........ऐका!
आणि आवडला तर या आत्मूभटाला द्या एक...
.
.
.
मंङ्गलाष्टक....वन्स मोअर!!!
===================================================================
मागिल सर्व भाग- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६
क्रमशः...
प्रतिक्रिया
7 Nov 2014 - 9:36 pm | अजया
मस्त लिहिलंय गुरुजी!रेडी- रेक -नर सहीच!
सुरेल मंगलाष्टकं एेकली की मात्र ते सूर डोळ्यात नकळत पाणी आणतात!
8 Nov 2014 - 1:04 am | बॅटमॅन
रेकनराची कोटी अफाट उच्च आहे. एकदम फुटल्या गेले आहे =)) =)) =)) =)) =)) _/\_
लेख आवडला बुवा.
7 Nov 2014 - 9:48 pm | सतिश गावडे
छान लिहिलंय बुवा.
7 Nov 2014 - 9:54 pm | आदूबाळ
नेहेमीप्रमाणेच झक्कास बुवा!
7 Nov 2014 - 9:54 pm | मधुरा देशपांडे
सॉल्लिड लिहिलं आहे. अफाट निरीक्षणशक्ती आणि तेवढ्याच मस्त शैलीतले लेखन वाचायला मजा येते.
7 Nov 2014 - 10:25 pm | आनन्दा
आवडले.
7 Nov 2014 - 10:32 pm | अत्रन्गि पाउस
रेकनर .... मी फुटलो आहे हसून ...
*LOL*
7 Nov 2014 - 10:58 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि नंतर ट्रॅक बदलत लिहिलेलं मुक्तकही छान.
अवांतरः
हा श्लोक पाहून एकदम रंतिदेवाची आठवण झाली. यातली चर्मण्वती म्हणजे आजची चंबळ.
पुराणांतील राजा रंतिदेवाच्या पाकशाळेत व यज्ञगृहात असंख्य प्राण्यांना विधिवत् बळी दिले जात असे. त्या मृत पशूंच्या चामड्याच्या राशींपासून रक्तमांसाची एक नदीच तयार झाली. त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.
7 Nov 2014 - 10:59 pm | मुक्त विहारि
लय झक्कास...
आता एकपात्री प्रयोग कधी?
7 Nov 2014 - 11:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
:) . :) . :)
7 Nov 2014 - 11:59 pm | बोका-ए-आझम
मस्तच बुवा!व्हिडिओ कॅमे-याची नजर आहे तुमची एकदम!
8 Nov 2014 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा
अजया
@सुरेल मंगलाष्टकं एेकली की मात्र ते सूर डोळ्यात नकळत पाणी आणतात! >>> हा अनुभव तर अनेकदा आलाय. एकदा तर लहान मुलांच्या एका ग्रुपने,खास ताईसाठी केलेली..अशी मंगलाष्टकं अत्यंत भावपूर्ण म्हटली होती.ती आजही स्मरणात आहेत.
==========================
मधुरा देशपांडे
@अफाट निरीक्षणशक्ती आणि तेवढ्याच मस्त शैलीतले लेखन वाचायला मजा येते. >>> धन्स!
==========================
अत्रन्गि पाउस
@रेकनर .... मी फुटलो आहे हसून ... >>> =)) .. =)) .. =))
==========================
वल्ली
@त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.>>> ऐकली आहे ही कथा.
==========================
मुक्त विहारि
@आता एकपात्री प्रयोग कधी?>>> बघु या कसं कधी जमतं ते! :)
==========================
बोका-ए-आझम
@मस्तच बुवा!व्हिडिओ कॅमे-याची नजर आहे तुमची एकदम!>>> ह्हा ह्हा ह्हा! धन्यवाद. :)
==========================
8 Nov 2014 - 8:52 am | नाखु
आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.
8 Nov 2014 - 1:03 am | खटपट्या
मस्त आत्मुदा !! आम्ही तुमच्या लग्नात मंगलाष्ट्के गाउन गोंधळ घालणार !! (बोलावलंत तर) :)
रेडी रेकनर प्रमाणे...
8 Nov 2014 - 1:10 am | रेवती
वाचतिये.
8 Nov 2014 - 1:23 am | anandphadke
हसून हसून फुटलोय मी *lol*
8 Nov 2014 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुसखुशीत. :) आपलं मगलाष्टक छान.
-दिलीप बिरुटे
8 Nov 2014 - 10:05 am | सस्नेह
हहपुवा
रेडीरेकनर भारी !
8 Nov 2014 - 10:07 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
8 Nov 2014 - 12:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
या मंगलाष्टकांमधे अजुन एक प्रकार असतो तो म्हणजे नावे घालण्याचा
उदा.
अमिताभ देशपांड्यांची लाडुली , कुडचेडकरां कडे निघाली,
लाडात जीला वाढवली, ती आज किती मोठी जहाली,
कुडचेडकर तिला सांभाळा, सुख देईल ती घराला,
जाणार महाबळेश्वरी फिराला, लावेल दिवा वंशाला,
हे असले मंगलाष्टक मी प्रतेक्ष ऐकल आहे. (नाव तेवढी बदललेली आहेत)
नगरला एका लग्नाला गेलो होतो तिकडे तर गायकच बसवले होते. ते दोनतास आधीपासुनच गाणी म्हणत होते.
त्यातपण ते सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर मराठी गाणी म्हणत होते.
उदा.
सुरेश आणि तनिष्का यांचे मिलन,
स्वर्गातच बांधले यांचे बंधन,
दोन्ही कुटुंबांचे रंगले संम्मेलन,
अतिथिं करता सुग्रास भोजन,
बघ कसा हा मांडव सजला,
(चालः- चॉकलेट, लाईमज्युस,आईस्क्रीम टॉफिया - चित्रपट हम आपके है कोन?)
लग्न लागताना पण हेच सुरेल (?) आवाजात मंगलाष्टक म्हणत होते. त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो.
पैजारबुवा,
9 Nov 2014 - 3:11 am | आदूबाळ
अयायायायाया....
वासेपूर सिनेमातल्या त्या गायकाची आठवण झाली...
8 Nov 2014 - 12:17 pm | अनुप ढेरे
हा हा, येक नंबर!
8 Nov 2014 - 1:15 pm | असंका
आज यष्टीत बसून वाचत होतो आपला लेख. अख्खी बस वळून बघत होती कोण एवढ्या मोठमोठ्याने खिदळत आहे म्हणून! लय हसवलंत दादा! धन्यवाद!
8 Nov 2014 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा
@ अख्खी बस वळून बघत होती कोण एवढ्या मोठमोठ्याने खिदळत आहे म्हणून! >>> =)) .. =)) .. =))
@लय हसवलंत दादा! धन्यवाद! >> धन्यवाद हो. :)
8 Nov 2014 - 1:50 pm | यसवायजी
हा हा.. लै भारी बुवा.
"ह्याकूंदेथु.."ने शाळेतल्या पार्थनेची आठवण झाली. एकेक शब्द अस्साच कुंथून दंगा करायचो. ;)
8 Nov 2014 - 5:36 pm | जेपी
मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल)
पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल.
8 Nov 2014 - 8:31 pm | जुइ
बर्याच आठवणी जाग्या झाल्या :)
9 Nov 2014 - 3:42 am | बहुगुणी
ते ध्वनिमुद्रणही श्रवणीय आणि संग्रहणीय आहे!
एकपात्री कार्यक्रमाची कल्पना मनावर घ्या.
9 Nov 2014 - 8:55 am | एस
आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात. काय खरं नाय!...
9 Nov 2014 - 9:06 am | स्पा
अगाय मेलो =)) =))
बुवाने याच अन कट वर्जन लाईव एकवले असल्याने अजून मजा आली
9 Nov 2014 - 10:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बुवा _/\_
हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ....
(हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) =))
=)) =))
9 Nov 2014 - 11:06 am | प्रकाश घाटपांडे
पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत हे कोड मला वाटायच. तेव्हा माईक नसायचा. व गुर्जी व ब्यांडपथक यात अंतर बरच असायच. मला कुणीतरी एक माणुस ब्यांडवाल्यांना खूण करण्यासाठी नियुक्त केला असावा असे वाटायच. मी लक्ष ठेवून बघितल पण तस काही दिसल नाही.
10 Nov 2014 - 9:27 am | श्रीरंग_जोशी
लेख वाचता वाचता आजवर पाहिलेली अनेक अतिउत्साही उदाहरणे डोळ्यसमोर उभी राहिली.
10 Nov 2014 - 9:39 am | सौंदाळा
सहिच.
निरिक्षण, कोट्या, चिमटे खुपच छान.
या स्वयंघोषित मंगलाष्टक गायक्/गायिकांची वधु/वरांशी जवळची ओळख नसली तरी आयत्या वेळी कसे टपकतात देवजाणे.
एका लग्नात अशाच एका गायिकेकडुन गुरुजींनी माईक काढुन घेतला होता मुहुर्ताची वेळ जवळ आली होती म्हणुन. बाईंनी ३ पानी काव्य (?) लिहुन आणले होते.. एक पाण होते न होते तोच गुरुजींनी मुसंडी मारत मोर्चा सांभाळला आणि मुहुर्ताची वेळ अचुक साधली. गायिका मात्र फणकार्याने ष्टेजखाली निघुन गेली.
10 Nov 2014 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा
@गायिका मात्र फणकार्याने ष्टेजखाली निघुन गेली.>>> जाणारच! त्यांना अश्या पद्धतिनी कार्यक्रमाचा विचका उडवणं हा आपला नैतिक अधिकार वाटत असतो. एकदा मी अश्याच एका बाईंना..त्या माला वाट्टेल ते तोंड सोडून बोलल्या म्हणून अत्यंत तीव्र शब्दात बोललो होतो. तर मलाच मारायला उठली होती बया! (मग कार्यालयाच्या मॅनेजरनी मधे शिरुन अॅक्शन-घेण्याची धमकी दिल्यावर,गपगुमान ती बया परतली.)
नो एंट्रीत आपल्या अंगावर येणार्या माजोरड्यांना,जसं आपणच त्यांना वाट-द्यावी असं वाटत असतं..तसलीच ही लोकं!
10 Nov 2014 - 4:46 pm | यश राज
मजा आली वाचून...
10 Nov 2014 - 5:12 pm | झकासराव
अगागागागागा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हसवुन मारता काय.. :)
लै भारी..
10 Nov 2014 - 6:33 pm | सुबोध खरे
उत्कृष्ट लिखाण
बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो.
ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.
11 Nov 2014 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा
नाद खुळा
@आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे.>> येस्सर!
-------------------------------------------------------------------------------------------------------
खटपट्या
@मस्त आत्मुदा !!आम्ही तुमच्या लग्नात मंगलाष्ट्के गाउन गोंधळ घालणार !! (बोलावलंत तर) >> नक्कीच बोलिवनार..! ..ठरलं ..तर!
@रेडी रेकनर प्रमाणे...>> :-/ दुष्ष्ष्ट!!!!!!!!!!!!!!!!
चला..जाहिर वाचनाचा नारळ फुटला म्हणायचा! 



------------------------------------------------------------
ज्ञानोबाचे पैजार
@त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. >>> ह्म्म्म्म... असले प्रकार तर इतके दवणीय पाहिले आहेत..की इथे लिहिवत सुद्धा नाही.
------------------------------------------------------------
जेपी
मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल)पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल. >>>
----------------------------------------------------
बहुगुणी
@ते ध्वनिमुद्रणही श्रवणीय आणि संग्रहणीय आहे!>>> धन्यवाद जी! :)
@एकपात्री कार्यक्रमाची कल्पना मनावर घ्या. >>> येस्सर!
------------------------------------------------------------------------------------
स्वॅप्स
आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा
इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात.काय खरं नाय!>>> =)) अहो..हे केवळ सहज झालेलं आहे..! जाणुनंही नाही आणि बुजुन तर त्याहुनंही नाही!
--------------------------------------------------------------------------------------
कॅप्टन जॅक स्पॅरो
@हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ....>>>
@(हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) >>
---------------------------------------------------------------------------
प्रकाश घाटपांडे
@पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते
ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत>> त्यांना आंम्ही तदेवलग्नं...च्या आधी जे म्हणतो..ते टोनिंगवरुन पाठ झालेले(असायचे!)
---------------------------------------------------------------------------------
सुबोध खरे
@उत्कृष्ट लिखाण>> मनःपूर्वक धन्यवाद!
@बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो.
ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.>>> सर्व काहि बरोबर आहे...फक्त आपण वर म्हटल्याप्रमाणे- मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम - असे नसून..प्रत्येकी मंगलाष्ट्कात आठ चरण असतात..म्हणून ते मंगल-अष्टक! आणि ती आठ म्हणायची नसून.. हवि तितकी कमी जास्त म्हणावित(मुहुर्ताची वेळ पाहुन) असाच संकेत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
चला....अत्ता पर्यंत लग्नाला-आलेल्या सर्वांचे आभार
11 Nov 2014 - 12:16 pm | पहाटवारा
हे लेखन वाचण्यापेक्शा ऐकायला जास्त आवडेल असे वाटतेय .. एक्दम वर्हाड च्या धर्तीवर ..
-पहाटवारा
11 Nov 2014 - 12:28 pm | सूड
>>एक्दम वर्हाड च्या धर्तीवर ..
+१ एकपात्री प्रयोगाच्या अंगाने जाणारं काही झालं तर उत्तम !!
12 Nov 2014 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा
आपल्या मित्रमंडळींमधेच अभिवाचनाचा प्रयोग करायचा का? :)
बोला...कोण कोण येणार? :)
15 Nov 2014 - 1:05 pm | नाखु
माझापण (जागा धरण्यासाठी) !!!
11 Nov 2014 - 12:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी हेच म्हणतो. बुवा घ्या मनावर जरा. =))
14 Nov 2014 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा
मंङ्गलाष्टकांना अक्षता घेतलेल्या/टाकलेल्या :D सर्वासर्वांचे धन्यवाद! :)
15 Nov 2014 - 12:49 pm | प्यारे१
बुवा,
भाग खासच झालाय. वर लोकं म्हणतात तसं पुलं देशपांडे ष्टाईल एकपात्री होऊनच जाऊ दे!
16 Nov 2014 - 7:23 pm | पैसा
जाम धमाल! 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' आणि 'रामो: राजमणि: सदा विजयते' हे मंगलाष्टकांमधे का म्हणतात हे खरंच आजपर्यंत कळलेलं नाहीये! तसेच ते मुलीकडचे आणि मुलाकडचे हिरीरीने मंगलाष्टकांचा कलगीतुरा सुरू करतात आणि बरेचदा त्यात मुहूर्त टळून गेला तरी कोणाला भान रहात नाही हे खूपदा पाहिलं आहे!
29 Jul 2016 - 1:46 am | निओ
तुफान लिहिलंय .....हास्याचा नुसता पाऊस पडलाय.
गुरुजी _/\_
29 Jul 2016 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा
@निओ › धन्यवाद.