http://misalpav.com/node/28048 >>>
आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही
............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ
गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!!
असा टाइम'बॉम्ब उडवतो...
मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============
होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो. सगळ्यांच्या प्रमाणे,बरेचदा वधू/वरांनाही कित्ती धूर होणार आहे नक्की!? हा प्रश्न होमाच्या-काठावर आलं की मनात पडतोच.
आणि मग..वर..आंम्हाला हा वरचा प्रश्न सरळ विचारतो..किंवा मग जोडी जरा बुजरी वगैरे असेल,(किंवा बुजत असेल! ;) )तरः- "फार धूर होत नाही ना!?" असं डॉक्टरला विंजेक्शनला घाबरणार्यानी- "नै..मंजे टोचायच नै ना फा.......र!?" असं विचारल्या सारखा विचारतो.मग आंम्हिही त्या वराला वधूच्या दिशेनी जाणारा डायल्याग मारतो:"धुराला भ्यायलात,तर पुढे आगिशी कसे खेळाल!?" असा कडक चेंडू टाकून एकंदर होमासाठी तयार करतो.
(नवर्या मुलास..) हम्म्म्म..चला आचमन करा... वगैरे सुरवात होऊन पहिला विवाहहोम अवरतो आणि मुलाला पाणिग्रहाणास्तव वधू समोर उभे करणे होते.(विवाह सोहळ्यातला हा एक अत्यंत टची आणि ग्गोगोड सीन! ;) ..)
आंम्ही:- हां ..आता तू समोर उभा रहा,आणि तिचा उजवा हात पाचही बोटांसह शेकहँड सारखा हातात घे पाहू!.. हां .. बरोबर.आणि आता दोघांनी पूर्ण १ मिनिटभर.एकमेकाच्या डोळ्यात बघत बसायचं..बरं का!.. इथे, काहि बुजर्या वरांना आणि वरवर अत्यंत धीट वाटणार्या वधूंना, अंतर्यामी इतक्या गुदगुल्या होतात,की पहिलं अर्धमिनिट दोघं खाली मान घालून हसतच रहातात.मग कडेनी ही गम्म्मत वेंजॉय करणार्या म्हातर्या बायकांपासून ते यांच्या मित्र.मैत्रिणींपैकी काहिंनी टाकलेल्या खास अक्षता यांना लागायला सुरवात होते.
मित्रलोक्सः- "किती वेळ??????? बास की!!!!!!!!!!"
मैत्रिणी:- (आजकाल या शिट्याही मारतात!..) आणि मग- "झालं झालं...आम्ही नै पाहिलं" अश्या कोरस मधे आरोळ्या वगैरे होतात. मग आम्ही त्यात हळूच शिरून खेळ पुढे नेतो. आंम्ही:-वराला उद्देशून " हे पहा,आज तू सर्वांसमक्ष हिचा हात हातात घेऊन,म्हणजेच पाणि-ग्रहण करून, असं सांगतोयस की, मी हिला हिच्या सर्व गुणदोषांसह,म्हणजे जशी आहे तशी धर्मपत्नी म्हणून स्विकारत आहे. म्हणजे......... नंतर तक्रार चालणार नाही हां!" (इथे बाजुनी हमखास हशा) " जशी आहे तशी स्विकारतो...म्हणजे हल्लीच्या नव संस्कृत मधे तुमचं..ते..काय म्हणता..ते...........
हां............ अॅज इट इज! (अजून हशा..आणि शिट्या सुद्धा!)
फोटोग्राफर बिचारे हा १ मिनिटाचा टेक १० मिनिटं चाल्लेला पाहून ७/८ अँगलनी फोटू मारून मारून दमतात. आणि मग हे पाणिग्रहण सुटतं.मुलगा उभा ठाकून अवघडलेला पाटाला-येऊन बसतो. आणि मग पुढे मुलिच्या भावाकडनं तिच्या ओंजळीत लाह्या घालणे..मुलानी वर हात धरून त्या लाह्या होमात आर्टीफिशियल धबधब्यातलं पाणि पडतं,तश्या सोडणे..फोटू वाल्यांनी योग्य ते फोटो घेणे.होमा सभोवती प्रदक्षिणा होणे..असं करत करत गाडी "कानपिळी" नावाच्या दिव्य ठेसनाला येऊन स्थिरावते.
हा ही विधी नसलेला विधी हल्लीच्या काळातला अत्यंत फेमस असा झालेला विधी आहे. आंम्ही वधूच्या त्या भावाला..ज्या द्यायच्या त्या सूचना देतो. मग भाऊ वराला,हातनी त्याचा कान धरून कानात-"माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा.." वगैरे वगैरे.. ठरलेले (लोकं)शास्त्रातले उपदेश करतो/किंवा आंम्ही ते करवून घेतो. आणि मग फोटोवाल्यांनी त्या भावास -"हां... राइट..राइट..दोघांच्या मागे..तिथेच खाली बसं..येस..येस..बरोब्बर..कानाला धरा आता मुलाच्या" वगैरे भाव देऊन फोटो काढायला सुरवात केली..की परत कडेचं पब्लिक "ओढ..ओढ..चांगला जोरात" असा धोशा लावतं (हल्ली काही ठिकाणी हे भाऊ सुद्धा सख्खे/आत्ते/मावस/चुलत..असे सगळे यायला लागलेले आहेत!) मग तो कान चांगला पिळून वगैरे होतो.भाऊस आहेर देणेचे होते. पण एकदा एक अजब गंम्मत जाहली,हा भाऊ इतका बिच्चारा संथ आणि आज्ञा-धारक होता,की मी त्यांच्या कडून-"हा तुझा उजवा हात घे आणि(वराजवळ नेववून..)त्याच्या उजव्या कानाशी लाव" असं सांगितल्यावर त्या भाऊरायानी त्या उभयता पाठि असताना.....स्वतःचा(च) उजवा कान धरिला,आणि मला तितक्याच मख्ख पणे विचारलं:- "आता!!!!!!!!!!?" ( *dash1* ) स्टेजखालच पब्लिक हसून हसून मरायच्या बेताला आलवतं..आणि मी ही विशेष जिवंत उरलेलो नव्हतो. तरिही मी जितका जीव माझ्या शिवात उरला होता...तो एकवटून त्याला सांगितलं:- अरे...मुला...आपला नव्हे...त्याचा कान धर!मग त्यानि पुन्हा त्याच आज्ञा-धारकपणे नवर्यामुलाच्या कानाला हात लाऊन परत चेहेरा.."आता!!!!!!?" असा केला(च). मग मी त्याला... "फिरकीचा नळ पिळून बंद करतात तसा पिळ आता तो कान" असं उद्-वेगानी सांगितलं,आणि त्या नवर्या मुलाचे बिचार्याचे हाल जाहले. तो पाटावरून अक्षरशः बोंबलत उठला. शेवटी त्या उप-स्थिंतापैकी एका समंजस मामाला, माझी आणि वधुवरांची दया आली...आणि त्यानी या आज्ञा-धारक भाऊरायाला स्टेजवरून फोटो वगैरे काढवून खाली नेला. आणि आंम्ही सगळेच...सुटलो! =))
नंतर मग एकदा, आंम्हा भटजींच्या गप्पा चाल्लेल्या असतांना,एका (खर्या) ज्येष्ठःश्रेष्ठाकडून जे हाती लागलं... ते असं:-
ज्येष्ठःश्रेष्ठः- "ही...कानपिळी आहे ना..? का...य?. ती मंजे...तुम्ही हल्लीची मुलं ( :-/ ) - वराचा कान/बिन पिळायला लावता ना..तसं काहि नाहीये.. समजलं!?
आंम्ही:-(हल्लीची मुलं ;) ..) :- "मग काय हो नक्की!?" *scratch_one-s_head*
ज्येष्ठःश्रेष्ठः-"हां..ते सांगतो..असें समोर बसा आधी..! तो वधूचा भाऊ अस्तो ना.. जो त्या लाजा होमात बहिणीच्या ओंजळीत लाह्या घालतो ना....,तेंव्हा त्यावेळी त्या भावाला वरपक्षाकडून डोक्यावर (आहेर म्हणून..) जी पगडी चढवली जायची ना....,ती कानावर जिथे बसते..तिथे पिळा मारलेली असायची..म्हणून हो..ती कानपिळी(पगडी!), आणि तिचा तो आहेर.
आंम्ही:- अस्सं होय! (मनात..:-काय प्वॉइंट गावला! *biggrin* )
ज्येष्ठःश्रेष्ठः- त्या शब्दातली ती पगडी,तुमच्या हल्लीच्या भाषेत काय म्हणतात ना...तशी ती सायलंट झाली,आणि ही (कान-पिळायची) नको ती ब्याद (आमच्या) नवर्यामुलांच्या-पाठिमागे आली!
आंम्ही:-(मनातः-ख्या..ख्या..ख्या..ख्या..!) अस्सं आहे होय ते!? बरं झालं कळ्ळं! थँक्यू हां बंडूतात्या थँक्यू!
ज्येष्ठःश्रेष्ठः- हो........... असू दे हो असू दे..ते थँक्यू कळ्ळं तुमचं! आता श्टेजवर असे जेंव्हा नाचाल ना..तेंव्हा तुंम्ही खरे! हॅ..हॅ..हॅ..हॅ.. (त्यांच्या समवयस्क मित्राकडे वळत..) सखाराम..तंबाखू दे..चल!
आता, "ते चांगलं..का हे चांगलं?" असा प्रश्न माझ्या मनात आला.केवळ या प्रसंगापुरताच नव्हे,तर धर्मक्षेत्रात असे अनेक ध चे मा..आणि(परत) मा चे ध.. जाहलेले आहेत..त्या साठीही! पण अश्या गोंधळाच्या प्रसंगी माझा तो काका माझ्या कानाशी येतोच आणि मला सांगतो:- अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे!
मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प!
===============
क्रमशः
=============
मागील सर्व भागः- 1 .. 2 .. 3 .. 4 .. 5 .. 6 .. 7 .. 8 .. 9 .. 10 .. 11 .. 12
================================================
प्रतिक्रिया
3 Aug 2014 - 11:59 pm | यसवायजी
धुराला भ्यायलात,तर पुढे आगिशी कसे खेळाल!?"
:))
4 Aug 2014 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे
हा भागही आवडला !
अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे!
बोलके शब्द !4 Aug 2014 - 1:12 am | मुक्त विहारि
आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला.
मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव.
त्याने बिचार्याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक.
अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला.
असो,
बियर पण बर्याच वेळा कामी येते.
4 Aug 2014 - 1:38 am | रेवती
छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला.
आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.
4 Aug 2014 - 4:02 am | शुचि
हाहाहा अतिशय सुंदर!!!
4 Aug 2014 - 6:20 am | यशोधरा
काकांचे शब्द पटले. बाकी किस्से एकसे एक महान!
4 Aug 2014 - 6:54 am | भिंगरी
मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता.
आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो.
कान चांगलाच लाल होतो.
बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.
4 Aug 2014 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.
4 Aug 2014 - 7:24 am | खटपट्या
मस्त !!!
4 Aug 2014 - 9:33 am | सौंदाळा
खुसखुशीत
4 Aug 2014 - 3:05 pm | सूड
मस्तच !!
4 Aug 2014 - 3:23 pm | बॅटमॅन
हाण तेज्यायला. मस्त नवीन माहितीही कळाली.
4 Aug 2014 - 3:28 pm | आदूबाळ
मस्त झालाय हा भाग!
अशा पिळदार पगडीला "होळकरशाही पगडी" म्हणतात ना?
4 Aug 2014 - 4:18 pm | बॅटमॅन
होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी
'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.
4 Aug 2014 - 5:31 pm | आदूबाळ
*biggrin* प्रगती आहे...
4 Aug 2014 - 5:59 pm | बॅटमॅन
कुठे, कशी, किती? ;)
4 Aug 2014 - 9:01 pm | अत्रुप्त आत्मा
@ "होळकरशाही पगडी" म्हणतात ना? >>> हां..तेच ते!
4 Aug 2014 - 4:15 pm | मधुरा देशपांडे
मस्त. भावं विश्व नेहमीप्रमाणेच आवडले.
4 Aug 2014 - 7:17 pm | स्वाती दिनेश
खुसखुशीत लिहिले आहे गुरुजी,
स्वाती
4 Aug 2014 - 9:03 pm | शाली
भारी
4 Aug 2014 - 9:03 pm | शाली
भारी
5 Aug 2014 - 10:08 am | झकासराव
गुर्जी धमाल आहेत की. :)
6 Aug 2014 - 9:53 am | प्रचेतस
गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते.
लै भारी झालाय हा भाग.
7 Aug 2014 - 5:12 pm | कंजूस
मजेदार लिहिता .
लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .
7 Aug 2014 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;)
लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते.
यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे...
श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...
7 Aug 2014 - 5:51 pm | सूड
कन्या वरयते रुपम्। माता वित्तम् पिता श्रुतम्॥
बान्धवा: कुलमिच्छन्ति। मिष्टान्नम् इतरे जना:॥
7 Aug 2014 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
यकदम् कर्रेट्टम् ॥ :)
बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)
7 Aug 2014 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा
@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल.
चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)
7 Aug 2014 - 7:41 pm | सूड
>>संमंध दिसतो का?
मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)
7 Aug 2014 - 8:02 pm | अत्रुप्त आत्मा
मापी द्यावी शब्द संमंधा! *blum3*