मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 5:16 am

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्‍या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत.

आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

हे ठिकाणसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत
हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2013 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :)

-दिलीप बिरुटे
(रांगोळीची आवड असलेला)

पैसा's picture

3 Nov 2013 - 6:38 pm | पैसा

कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!

अभ्या..'s picture

3 Nov 2013 - 8:52 pm | अभ्या..

डीजीटल रंगोली चालेल काय? वाटल्यास त्याचा प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढणार आहे ती. :)

पाषाणभेद's picture

3 Nov 2013 - 9:28 pm | पाषाणभेद

अभ्या लग्नही डीजीटली करणारे का रे ? :-)
(मी पुढे काय बोललो? नाय बा!)

पाषाणभेद's picture

3 Nov 2013 - 9:29 pm | पाषाणभेद

नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही.
मजेत.

पैसा's picture

4 Nov 2013 - 9:17 am | पैसा

परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

अभ्या..'s picture

4 Nov 2013 - 3:05 pm | अभ्या..

एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;)
नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण.
नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील.
जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून.
मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले?
कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

पैसा's picture

4 Nov 2013 - 3:22 pm | पैसा

रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत.
गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही.

रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही.

बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय's picture

3 Nov 2013 - 9:26 pm | मृत्युन्जय

कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;)

http://misalpav.com/node/14927

पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :)

आईने काढलेली रांगोळी

laxmi1

Laxmi 2

Laxmi 3

अर्धांगाने काढलेली रांगोळी

diwali

त्रिवेणी's picture

4 Nov 2013 - 4:31 pm | त्रिवेणी

मस्त आहेत दोन्ही रांगोळी.

यशोधरा's picture

6 Nov 2013 - 7:29 am | यशोधरा

मस्त :)

मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

प्रतिसाद द्या
विषयः
Comment *

यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे.
आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद.

Madhavi's

यशोधरा's picture

4 Nov 2013 - 5:27 am | यशोधरा

मस्त आहेत रांगोळ्या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2013 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे


अगोदर सांगितलं असतं तर अजून भारी काढली असती. इत्यादी इत्यादी. ;)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

4 Nov 2013 - 9:04 am | पैसा

मी तर ४ दिवस रोज नवी रांगोळी काढते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2013 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही.
येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :)

-दिलीप बिरुटॅ

अनन्न्या's picture

4 Nov 2013 - 3:54 pm | अनन्न्या

पण आमच्याकडे यावर्षी दिवाळी नाहीये, त्यामुळे स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

त्रिवेणी's picture

4 Nov 2013 - 4:32 pm | त्रिवेणी

मस्त मस्त रांगोळी आहेत सगळ्यांच्या.

सानिकास्वप्निल's picture

4 Nov 2013 - 4:39 pm | सानिकास्वप्निल

हि माझी रांगोळी :)

.

.

माझीही शॅम्पेन's picture

5 Nov 2013 - 2:56 pm | माझीही शॅम्पेन

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे
केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :)
कृ ह घ्या !!

सानिकास्वप्निल's picture

5 Nov 2013 - 8:49 pm | सानिकास्वप्निल

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे...

जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो).
इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

केदार-मिसळपाव's picture

5 Nov 2013 - 9:45 pm | केदार-मिसळपाव

हा हा हा,
आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?

माझीही शॅम्पेन's picture

5 Nov 2013 - 11:41 pm | माझीही शॅम्पेन

हा हा हा ... तस नाही ,
आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :)
आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :)
असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

सानिकास्वप्निल's picture

5 Nov 2013 - 9:44 pm | सानिकास्वप्निल

आज काढलेली रांगोळी देतेय :)

.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2013 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

__/\__ अप्रतिम रंगसंगती. :)

यशोधरा's picture

6 Nov 2013 - 7:30 am | यशोधरा

सानिका, सगळ्या रांगोळ्या आवडल्या.

सानिकास्वप्निल's picture

8 Nov 2013 - 12:45 pm | सानिकास्वप्निल

गेल्या वर्षी दिवाळीला काढलेली रांगोळी :)

.

हळद - कुंकू वापरून काढलेली गणेशाची रांगोळी :)

.

पिशी अबोली's picture

8 Nov 2013 - 2:00 pm | पिशी अबोली

अप्रतिम..

गणपतीची रांगोळी खूप आवडली.

राजमुद्रा२१'s picture

12 Nov 2013 - 8:07 am | राजमुद्रा२१

खूप छान :)

पिशी अबोली's picture

4 Nov 2013 - 7:31 pm | पिशी अबोली

मस्त मस्त रांगोळ्या... :)

किलमाऊस्की's picture

5 Nov 2013 - 2:41 am | किलमाऊस्की

मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-(
या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत.
---------------------------------------------------------------------------------------------
हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम'

https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg

या दोन वर्षापूर्वी काढलेल्या :

https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no

https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

ह भ प's picture

5 Nov 2013 - 9:44 pm | ह भ प

अप्रतिम.. सुप्पर लाईक.. कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..

किलमाऊस्की's picture

7 Nov 2013 - 3:02 am | किलमाऊस्की

कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..

विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा.

अवांतर -
जाता जाता हा घरी बनवलेला कंदील :
https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

यशोधरा's picture

6 Nov 2013 - 7:30 am | यशोधरा

दुसरी रांगोळी खूप आवडली.

सूड's picture

7 Nov 2013 - 6:21 pm | सूड

कोलम आवडली, साधी सुटसुटीत.

राजमुद्रा२१'s picture

12 Nov 2013 - 8:08 am | राजमुद्रा२१

फारच सुरेख!

पुष्कर जोशी's picture

5 Nov 2013 - 9:25 am | पुष्कर जोशी

मावश्या आणि आईने काढलेली रांगोळी पाण्या मुळे जरा..

आते बहिणीने काढलेली रांगोळी

यंदा सिंगापोर मध्ये हवे तसे रंग न भेटल्याने आणि दीड वर्षाचे कन्यारत्न मदतीला असल्याने छोटीशी न छान रांगोळी.

rangoli

सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत.

केदार-मिसळपाव's picture

5 Nov 2013 - 9:45 pm | केदार-मिसळपाव

असे म्हणतो.

रांगोळीतला पांढरा रंग म्हणजे मीठ आहे.
इतर रंग हे संस्कार भारतीचे रंग नसुन उपलब्ध असणारा रंगीत दगडी चुरा आहे.

rangoli1

rangoli2

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2013 - 9:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रांगोळी.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

सूड's picture

7 Nov 2013 - 7:46 pm | सूड

सुबक आहे !!

लौंगी मिरची's picture

7 Nov 2013 - 10:27 pm | लौंगी मिरची

अजब गजब भारीच रांगोळी

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:41 am | स्पंदना

कित्ती सुबक! सुरेख!

सायली's picture

8 Nov 2013 - 10:46 am | सायली

खुपच छान रांगोळी

क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी
रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग

चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी
रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!!
अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी
मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2013 - 2:34 pm | केदार-मिसळपाव

काकू ने भरले आहेत.

रेवती's picture

6 Nov 2013 - 1:14 am | रेवती

धागा मस्त चाललाय. श्रेय तुम्हा सर्वांनाच आहे.

यशोधरा's picture

6 Nov 2013 - 7:31 am | यशोधरा

सगळ्या रांगोळ्या झकास!

त्रिवेणी's picture

6 Nov 2013 - 2:47 pm | त्रिवेणी

खुपच छान छान रांगोळ्या आहेत सर्वांच्या.

अनन्न्या's picture

6 Nov 2013 - 3:52 pm | अनन्न्या

अशाच नवीन, मस्त रांगोळ्या येऊदेत.

वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

धनत्रयोदशी
.

नरकचतुर्दशी
.

लक्ष्मीपूजन
.

बलिप्रतिपदा
.

भाऊबीज
.

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:41 am | स्पंदना

मस्तच!

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2013 - 2:36 pm | केदार-मिसळपाव

छान.

निवेदिता-ताई's picture

6 Nov 2013 - 7:56 pm | निवेदिता-ताई

.

लौंगी मिरची's picture

7 Nov 2013 - 10:30 pm | लौंगी मिरची

हा हा हा

मला वाटलं मुलीने टिंब ( . ) काढुन रांगोळी म्हणुन दिला कि काय तुम्हाला अपलोडवायला =))

पहिल्या पोस्टमधे अपलोड करता नाही आली, पण आता फक्त लिंक देणे जमले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2013 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वांसाठी पिकासावर परवानगी द्या.

-दिलीप बिरुटे

रोहन जैन's picture

7 Nov 2013 - 11:08 am | रोहन जैन

आतिशय सुन्दर आहे सर्व रान्गोलि..

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2013 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त!!!
माझ्याकडुन पहिला नंबर. :)

मला पण तुम्ही काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या खूपच आवडतात.

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:42 am | स्पंदना

शेडींग खुपच छान आहे.
सार्‍याच मस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2013 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान रांगोळी. :)

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:43 am | स्पंदना

संस्कार भारती!
मस्त ग श्रुती, जरी तू औरंगाबादची असलीस तरीही मस्तच हो!

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:43 am | स्पंदना

संस्कार भारती!
मस्त ग श्रुती, जरी तू औरंगाबादची असलीस तरीही मस्तच हो!

यश राज's picture

8 Nov 2013 - 12:05 am | यश राज

छानच.........

आमची रांगोळी....

.

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:44 am | स्पंदना

मस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2013 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्सही रे स्सही. मधला राऊंड कसला जब्रा आलाय रंगसंगती आणि कल्पकतेने. बेष्ट.

-दिलीप बिरुटे

सायली's picture

8 Nov 2013 - 10:49 am | सायली

रांगोळी आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2013 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा

येक णंबर कलाकुसर, आणी रंगसंगती. :)

यश राज's picture

8 Nov 2013 - 10:04 pm | यश राज

धन्यवाद......

ही अस्मादिकांनी साधारण तीनेक वर्षांपूर्वी हापिसात काढलेली रांगोळी!!

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:45 am | स्पंदना

अरे वा! सुड?
ही कलापण आहे तुमच्याकडे?

अविनाश पांढरकर's picture

8 Nov 2013 - 12:54 pm | अविनाश पांढरकर

घरी काढलेली रांगोळी

अवांतर - घरी बनवलेला कंदील

sneharani's picture

8 Nov 2013 - 2:13 pm | sneharani

ran1

ran2

ran3

यशोधरा's picture

15 Nov 2013 - 7:08 am | यशोधरा

सुर्रेख रांगोळया!

अनिता ठाकूर's picture

8 Nov 2013 - 2:53 pm | अनिता ठाकूर

रांगोळ्या, त्यातील रंगसंगती--सर्वच छान!

यश राज's picture

8 Nov 2013 - 10:16 pm | यश राज

आवड्ल्या....

निवेदिता-ताई's picture

9 Nov 2013 - 9:40 pm | निवेदिता-ताई

सर्वच मस्त