शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते.
रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही. पण ६४ कलांमध्ये स्थान मिळवलेली ही कला थोड्याफार प्रमाणात जरी अवगत असली तरी धन्य म्हणायचे.
दिवाळी म्हणली की रांगोळीची प्रकर्षाने आठवण येते कारण रांगोळीशिवाय दिवाळीची कल्पना देखील करवत नाही. तुळशीबागेत किंवा मंडईच्या आजुबाजुने सहज चक्कर मारली तरी रांगोळीचे चित्तकर्षक रंग लक्ष वेधुन घेतात. त्या रंगांनी जेव्हा आंगणातली नक्षी सजते तेव्हा तर काय बहार.
आम्ही तसे औरंगजेबाचे गुण घेउन जन्माला आलेलो पण मातोश्री मात्र उत्तम रांगोळी काढतात. तिने काढलेल्या कित्येक सुंदर रांगोळ्या फोटो काढेन काढेन म्हणत पुसल्या गेल्या. पण या काही पुसायच्या आधी टिपल्या गेल्या त्या इथे देत आहे:
आणि आता नवरात्रीनिमित्त खास हे ३ फोटो. एकाच रांगोळीचे आहेत.
छोट्या घरातल्या छोट्या जागेत रांगोळीसाठी पण कमीच जागा राखुन ठेवता येते. त्यामुळे बहुतेक सगळ्या रांगोळ्या २*२ च्या पाटावर काढलेल्या आहेत.
प्रतिक्रिया
15 Oct 2010 - 12:06 am | मस्त कलंदर
आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग रिकामपणाचे नाहीत.. इथे आम्हाला जुलुमाने रांगोळी काढायला लावली होती) :-
घाईत वरच्या रांगोळ्यांवरची प्रतिक्रिया द्यायची राहिलीच!!! रांगोळ्या मस्तच. विशेषतः रंगांच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या आहेत त्या जास्त आवडल्या. या दिवाळीत तो वरचा मोर काढायचा प्रयत्न करायची जाम इच्छा होतेय. :)
आता आम्ही दुसर्यांचा धागा हायजॅक करायला प्रयत्न केला असे म्हणणार्या पराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!!!
15 Oct 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या धाग्यावर आपली सचित्र प्रतिक्रीया अपेक्षीतच होती.
आता वैतागुन आम्ही 'उदे ग मकी उदे' असा लेख टाकायच्या विचारात आहोत.
असो..
एक नंबर कलाकारी रे :) तसेही चित्रकला / गायन /वादन / रेखाटन ह्याबद्दल आमचे ज्ञान म्हणजे अगाधच आहे, पण हे जे काही आहे ते एकदम मस्त वाटले. रांगोळ्या बघुनच प्रसन्न वाटले.
मकीची रांगोळी बघुन झाल्यावर डोळ्यावर काकडी ठेवावी लागली.
15 Oct 2010 - 2:15 pm | मस्त कलंदर
आपल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करून धन्य झालो!!!!
लवकर... वाट पाहात आहोत. तुमचे नांव वायदेआझम नसल्याने तुम्ही तो लेख लवकरच लिहाल अशी अपेक्षा आहे.
असो..
परा शत्रू असला तरी या ओळींवर +१ म्हणतेय. यात आपल्याला काही कळत नाही असे दाखवून थोडा विनम्रपणा ही दाखवता आला!!!!
जळजळ पोचली!!! स्वतःच किलोभर इनो खाऊन घेणे!!!
ओ जाई ताई.... नंतर त्या काकडीचे काय करायचे तेही सांगा हो या पर्याला!!!!
15 Oct 2010 - 2:15 pm | मेघवेडा
अपेक्षित प्रतिसाद! पराशी फुल्टू सहमत आहे. अधिक काही बोलून उगाच अवांतरधर्मपालन करू इच्छित नाही.
मृत्युन्जया,
रांगोळ्या भाऽऽरी रे! मस्त वाटले!
15 Oct 2010 - 8:48 pm | सूड
अरे वा !! मकमावशी तुम्ही हे पण करता का ?
(एक हायजॅकपीडित)
15 Oct 2010 - 8:51 pm | धमाल मुलगा
सुध्याशी सहमत.
(दुसरा हायजॅकपिडीत ;) )
ध मा ल ... DhuD
15 Oct 2010 - 9:03 pm | मस्त कलंदर
जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन म्हणतात ना, आम्ही त्या सदरात मोडतो.
बाकी, मी फक्त नंद्याची मावशी आहे. इतरांनी मला मावशी म्हटले की मी म्हणते,
चल पळ.....HuD
15 Oct 2010 - 9:06 pm | धमाल मुलगा
>>मास्टर ऑफ नन
म्हणजे त्या चर्चात असतात त्या नन का?
धमांशु...BuD
15 Oct 2010 - 9:07 pm | सूड
घाबरलो बरं, एकदम वाघाची मावशी डोळ्यासमोर आली.
राह्यलं नाही म्हणणार बरं मावशी मी तुम्हाला मकमावशी !!
15 Oct 2010 - 10:24 pm | मस्त कलंदर
काय हे बिचार्या मृत्यूंजयच्या धाग्यावर अवांतर चालू आहे???? आधीच्या मालकांनी पदरचे पैसे खर्च करून खरडवही, खरडफळा आणि व्यनि ची सोय करून दिली आहे. ती वापरा..
बघेन बघेन नाहीतर चपलांचा फोटो तुम्हा दोघांच्या खरडवहीत लावेन!!!!
मस्तांशु.... DuM
16 Oct 2010 - 10:48 am | मृत्युन्जय
हुश्श. नशीब तुम्ही मस्तांशु MuD नाही लिहिले
14 Oct 2010 - 11:51 pm | मस्तानी
आता यापुढे एकही रांगोळी फोटो न काढता पुसली जाऊ देऊ नका ...
14 Oct 2010 - 11:53 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
14 Oct 2010 - 11:54 pm | रेवती
वाह! मस्त रांगोळ्या!
15 Oct 2010 - 2:21 am | गणपा
ही तर दसर्या-दिवाळीची नांदी. :)
15 Oct 2010 - 8:13 am | स्पंदना
हा घ्या माझा ही रांगोळीचा प्रयत्न!!
तुमच्या आईंच्या रांगोळ्या खरच छान आहेत. मी कॉपि करेन या दिवाळीला.
From Drop Box" alt="" />
15 Oct 2010 - 2:37 pm | मृत्युन्जय
आईच्या अजुन काही खुप छान रांगोळ्यांचा फोटो नाही काढता आला.
तुमची रांगोळी पण मस्त जमली आहे एकदम. मकीची सुद्धा.
15 Oct 2010 - 9:19 pm | मदनबाण
अरे ही रांगळी पाहायची कशी बरं राहुन गेली ?
मस्तच... :)
15 Oct 2010 - 12:11 pm | यशोधरा
मृत्यूंजय, खूप सुरेख आहेत रांगोळ्या :)
15 Oct 2010 - 1:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर आहेत रांगोळ्या! आमची मजल फक्त ठिपक्यांच्या रांगोळीपर्यंतच!
याच रांगोळीच्या शेजारी दोन मित्रांनी वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारणांची रांगोळी काढली होती त्याचीही आठवण झाली.
15 Oct 2010 - 2:35 pm | मृत्युन्जय
कल्पक रांगोळी आहे :)
बाकी मला तर ठिपक्यांची रांगोळीसुद्धा जमत नाही. छापाने रांगोळी काढायला गेलो तर ती पण बिघडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रांगोळी, चित्रकला यासाठी थोडासा हात जरी असेल तरी कौतुक वाटते. :)
15 Oct 2010 - 12:30 pm | sneharani
सूंदर रांगोळ्या!!!
मस्त
15 Oct 2010 - 1:56 pm | अवलिया
मस्त !!
15 Oct 2010 - 2:23 pm | नगरीनिरंजन
सुंदर रांगोळ्या सगळ्यांच्याच! दसरा-दिवाळी जवळ आल्याची वातावरणनिर्मीती झाली एका झटक्यात. :-)
15 Oct 2010 - 2:36 pm | प्रमोद्_पुणे
१ नं... छान आहेत.
15 Oct 2010 - 2:39 pm | जागु
आहाहा अगदी जिंवंत वाटत आहेत रांगोळ्या. तुमच्या आईचे कौतुकच कौतुक आणि त्यांना नमस्कार.
15 Oct 2010 - 3:07 pm | प्राजक्ता पवार
सुरेख रांगोळ्या आहेत :)
15 Oct 2010 - 6:05 pm | धमाल मुलगा
वा वा!!!
सणासुदीची चाहुल लागली बुवा :)
शेणानं सारवलेल्या अंगणात आईनं किंवा आजीनं रांगोळी काढत असावं आणि आपण समोर बसुन तल्लीनतेनं ते बघत रहावं असे ते लहानपणीचे दिवस आठवले रे!
15 Oct 2010 - 8:42 pm | मदनबाण
वा... सुंदर. :)
मस्त कलंदरनी काढलेली रांगोळी देखील सुंदर आहे.
(कला प्रेमी)
15 Oct 2010 - 10:20 pm | माजगावकर
सुन्दर रांगोळ्या..
आई यमाईचे नाव वाचुन फार बरं वाटलं.. या वर्षी औंधला जायचं राहुन गेलंय खरं..
16 Oct 2010 - 2:15 pm | आवडाबाई
खूप सुंदर ! त्यांना आम्हा ठिपकेवाल्यांचा नमस्कार सांगा !
तिने काढलेल्या कित्येक सुंदर रांगोळ्या फोटो काढेन काढेन म्हणत पुसल्या गेल्या
आता तुमच्या आईंच्या दिवाळीतल्या रांगोळ्याचा फोटो रोज टाका पाहू इथे (म्हणजे आम्हाला पण कॉपी करता येइल) ;-)
काही काही रांगोळ्या काळा oil paint लावलेल्या plywood वर काढल्या आहेत का हो ?
16 Oct 2010 - 4:05 pm | मृत्युन्जय
काही काही रांगोळ्या काळा oil paint लावलेल्या plywood वर काढल्या आहेत का हो ?
हो. ज्या जमिनीवर काढल्याच्या जाणवत नाही आहेत त्या सगळ्याच. घरात बसुन plywood वर रांगोळी काढुन मग तो दारात ठेवायचा आणि नंतर परत आत आणायचा हे सोपे पडते. :)
17 Oct 2010 - 8:16 pm | मीनल
सुंदर रांगोळ्या आहेत. मी ही काढून पाहेन. पण जमेलसे वाटत नाही. नेटकेपणा हातातच असावा लागतो.
गेल्या दिवाळीतील माझी रंगोळी---
17 Oct 2010 - 10:03 pm | पैसा
मृत्युंजय, तुमच्या आईच्या रांगोळ्या सुंदर आहेतच, पण दिवाळीच्या आधीच इथे रांगोळी प्रदर्शन भरलंय. मस्त वाटलं.
18 Oct 2010 - 10:21 pm | पक्या
वा, सुंदर रांगोळ्या. आपल्या आईच्या हातात छान कला आहे. त्यांच्या दिवाळीच्या ही रांगोळ्यांचे फोटो पहायला आवडतील.
30 Oct 2010 - 4:48 pm | चिगो
कसं छान छान वाटतयं आता.. मिपाकरांमुळे इथं मेघालयात दिवाळीची मराठीची वातावरण निर्मिती होतेय आमच्या मनात.. धन्स..:-)
6 Nov 2010 - 9:49 am | मृत्युन्जय
या दिवाळीतल्या आईने काढलेल्या २ साध्याश्या रांगोळ्या:
6 Nov 2010 - 4:10 pm | मृत्युन्जय
अजुन एक
6 Nov 2010 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
मृत्युंजया, सगळ्याच अप्रतिम रांगोळ्या, रे.
(माझी आईपण रांगोळी चँपियन आहे. बरीच बक्षिसं वगैरे मिळवली आहेत. पण त्यावेळी फोटो वगैरे नाही काढले. आता वाईट वाटते. :( )
मकी, मीनलतै इत्यादींनी काढलेल्या रांगोळ्याही अप्रतिमच.
6 Nov 2010 - 5:25 pm | स्वाती दिनेश
सुरेख रांगोळ्या आहेत.
मी रांगोळी काढून किती वर्ष झाली, आता एकदा खास रांगोळ्यांसाठी दिवाळीत भारतात गेले पाहिजे.
स्वाती