शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

मृगनयनी's picture
मृगनयनी in जनातलं, मनातलं
21 May 2011 - 2:57 am

"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे -

शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम :
आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो. काही दशकांपूर्वी पाश्चिमात्यांकडून आपल्याकडे आलेल्या "एरोबिक्स"ने सर्वच महिलावर्गावर मोहिनी घातली. पण जरा वेगळ्या दृष्टीने आपण जर आपल्या देशातच मूलतः उगम पावलेल्या काही शास्त्रीय नृत्यप्रकारांकडे बघितले, तर हे प्राचीन शास्त्रीय नृत्यप्रकार हे व्यायामाचे उत्तम साधन होऊ शकतात.
पारंपारिक भारतीय नृत्यशैलीत भरतनाट्यम, कथक, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी, कुचिपुडी, ओडिसी हे सात प्रमुख नृत्यप्रकार आहेत. त्यांपैकी दक्षिणेतील तंजावरमध्ये उदयास आलेले भरतनाट्यम आणि उत्तर भारतातील कथक या दोन नृत्यप्रकारांची लोकप्रियता आणि पगडा जनमानसावर अधिक प्रमाणात दिसून येतो. तर व्यायामाच्या आणि आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने या नृत्यप्रकारांकडे बघायचे ठरवल्यास "भरतनाट्यम" या नृत्यप्रकारांचा श्रीगणेशा हा "पाठ व कंबर ताठ व सरळ ठेवून केवळ गुडघ्यांमध्ये पाय १४५ अंशात वाकवून पावलांचा ठेका धरण्यामध्ये" होतो. यामुळे गुडघ्यांचे स्नायू बळकट होऊन त्यांची लवचिकता वाढते.
मग हळूहळू ताल वाढवत नेला जातो. प्रत्येकी उजव्या आणि डाव्या पावलांचा ठेका १-१, १-२ १-२, १-२-३ १-२-३.. असा पाच पर्यंत वाढवत नेला जातो. याने होते काय, की नवीन शिकताना पायात गोळे येतात. पण जसजशी सवय होत जाते.. तसतसे अधिक जोमाने करण्याची उर्मी वाढते. व शरीराला आपोआपच एक लयबद्धता येते. तसेच पाठ व कंबर कम्पल्सरी सरळच ठेवावी लागत असल्याने पाठीचा कणा वाकत नाही.
मग पुढे "पताका", "त्रिपताका", "अर्धपताका", "त्रिशूल", "सूची", "अर्धसूची" "शिवलिंगम", "गोमुखम", "मृगमुखम", "पुष्पम" इ. हस्तमुद्रा करत असताना हाताच्या मनगटाबरोबरच बोटांना देखील वळण लागते. "मयूर-पिसारा" किन्वा "देवाचा जयजयकार" करताना दोन्ही हात एका विशिष्ट लयीमध्ये एकाच वेळेस खांद्यापासून एका लयीमध्ये आणि एकाच वेगाने वरती डोक्यावर जातात. यामुळे खांद्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. आणि त्याच वेळेस गुडघे आणि पावले देखील तालामध्ये पडत असल्याने संपूर्ण शरीरानेच एक शास्त्रबद्ध ठेका धरलेला असतो. अर्थात श्रीगणेशा'चा पहिला ताल हा, नृत्य शिकवणारे "गुरु" एका लाकडी ठोकळ्यावर पारंपारिक पद्धतीने काठी आपटून आपल्याला समजावून देत असतात. त्यामुळे पुढे "अलारिपु", "जयतिस्वरम", "वर्णम", "मंगलम्" इ. सर्व भाव हे एका विशिष्ट रिदममध्येच करण्याची आपल्याला सवय लागते. ज्याप्रमाणे "एरोबिक्स" मध्ये नवीन शिकतानाचे सॉफ्ट म्युझिक आणि रिदम हळूहळू काही प्रॅक्टीसनन्तर रॉक आणि हेवी म्युझिककडे झुकतो. त्याप्रमाणेच भरतनाट्यम'मध्येही बेसिक स्टेप्स शिकून झाल्यानन्तर हळूहळु दोन्ही गुडघे १४५ अन्शांतच ठेवून पण तसेच खाली बसून पायाच्या चवड्यांवर पर्यायाने पायाच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा भार पेलायला शिकवले जाते. व नृत्याची गती हळूहळू वाढवली जाते. या स्टेप्मुळे गुडघे पूर्णपणे बेन्ड होतात. आणि त्यांच्यामधली लवचिकता वाढते. तसेच पुढे संधिवात होण्याची शक्यताही कमी होते. तसेच नृत्याची गती वाढल्याने पाठ सरळ ठेवून हात कोपर्यामध्ये चुकुनही न वाकवता शरीराच्या दोन्ही बाजूंचा समतोल राखूनच योग्य त्या ठोक्यावरच नृत्य करायचे असल्याने आपोआपच एक प्रकारची सजगता येते. सर्व शरीराचा भार सांभाळून भाव, ताल, लय इ. वापरून नृत्य करण्याची मग एक वेगळीच मजा येत जाते. तो रिदम, तो ठोका, पायांतील घुंगरांचे आवाज, सर्वजणींच्या एकाच वेळी होणार्या एकच हालचाली... इ सगळ्या गोष्टींची मग आपसूकच ओढ निर्माण होते.. अगदी नशा चढते, असे म्हटले तरी चालेल.

भगवान शंकराचे रूप असलेला "नटराज", हे शास्त्रीय नृत्याचे व सर्व नर्तक-नर्तिकांचे दैवत कम गुरु असल्याने नटराजा'च्या सर्व पोझेस शास्त्रीय नृत्यप्रकारात येणे अपरिहार्य असते. त्यामुळे हस्तमुद्रांचा पुरेपूर वापर करून पाय आडवा उचलून व गुडघ्यात अर्धा मुडपून केल्या जाणार्या "नटराजाच्या" पारंपारिक मुद्रा आपल्या सर्वांना परिचयाच्या आहेतच. अर्थात "शिवतांडव" करताना ह्या सर्व मुद्रा वापरून खाली वाकून, जो काही प्रकार केला जातो .. त्यालाच कदाचित "सर्वांगसुन्दर व्यायाम" असे म्हणत असावे!

जर शास्त्रीय नृत्य वयाच्या ७-८व्या वर्षी शिकण्यास सुरुवात केली, तर नक्कीच त्याचा जास्त फायदा होतो. संपूर्ण शरीराला एक प्रकारची लयबद्धता प्राप्त होते. त्याचप्रमाणे शरीरात कोलेरेस्टॉल साठण्याची शक्यता नाकारली जाते. तसेच शास्त्रीय नृत्यप्रकारात तालाबरोबरच "भावमुद्रा"ही महत्वाच्या असल्याने मानेचीही व्यवस्थित हालचाल होते. पाठीच्या कण्याचे व मानेचे विकार संभवत नाहीत. त्याचबरोबर डोळ्यांचेही व्यायाम अत्यंत सुन्दर व तालबद्ध रीत्या होत असल्याने डोळ्यांचेही आरोग्य चांगले राहते.

आपल्या भारतदेशाला इतक्या सार्या नृत्यप्रकारांच्या खजिन्याची देणगी आहे. पण त्याचबरोबर इतरही काही युनिवर्सल नृत्यप्रकारांचे फायदे होतात. उदा.: वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी "बॉल्-डान्स" केव्हाही उत्तम. "साल्सा" डान्समुळे जलद हालचालींना वाव मिळतो व रक्ताभिसरण सुधारते. "फ्लेमिंको- डान्स" मुळे तुमचा सॅमिना वाढतो. आणि तुम्ही जास्त "कॉन्शस" बनता.

पण आपल्या प्रत्येक शास्त्रीय नृत्यशैलीत जे काही तोडे, राग, संगीत आहे, त्यात प्रामुख्याने शंकर, कृष्ण, दुर्गामाता इ. देवदेवतांचे गुणगान गाईले गेले आहे. ते राग इतके आर्ततेने आळवले गेले आहेत की त्यामुळे जरी दाक्षिणात्य भाषा आपल्याला समजली नाही, तरी नृत्य करीत असताना आपल्या मनात देवाच्या प्रति एक प्रकारचा भक्तिभाव निर्माण होतो. आणि मग ते नृत्य नुसते नृत्य किन्वा व्यायाम न राहता देवाच्या चरणी नतमस्तक व्हायला लावणारी एक पूजा बनते.
:)

कलानृत्यसंगीतमांडणीसंस्कृतीनाट्यवावरइतिहाससाहित्यिकसमाजजीवनमानविचारलेखआस्वाद

प्रतिक्रिया

अभिनंदन .. पत्रकार झाल्या की वो तुम्ही :)
आगड्या वेगळ्या विषयावर आगळं वेगळं लेखन .. व्यायाम प्रकार असाही असु शकतो ? :) आवडले .

- इकडुन तिकडुन .. व्यायामाकडे(च)

मृगनयनी's picture

21 May 2011 - 4:03 am | मृगनयनी

धन्यु धन्यु!!! ... आणि हो!... आप्ला आजचा सामना'तलाच "त्रिमितीचाही अनुभव" आम्ही घेतला बरं का!!!!.... ;) :)
हिन्दुस्तानात ३ डी लैपटौप येत असल्याची बातमी आपल्याकडून समजल्यामुळे आपलेही अभिनन्दन!! :) :)

मिंटी's picture

21 May 2011 - 4:18 am | मिंटी

वा नयनादेवी..... छान लेख...
आणि पत्रकार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन :)

नाना बेरके's picture

21 May 2011 - 4:31 am | नाना बेरके

लेख वाचून चांगली माहीती मिळाली. धन्यवाद.

अभिनंदन मृगनयनी!
टार्‍याचेही अभिनंदन!
त्याचा पहिला चक्क चांगला प्रतिसाद वाचला आणि त्यानेही सामनात लेखन केल्याचे लगेच लक्षात आले.;)

इंटरनेटस्नेही's picture

22 May 2011 - 2:24 am | इंटरनेटस्नेही

छान लेखन, आवडले!

पुन्हा पत्रकार झाल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन !

या लेखावर 'महागुरुं'चे मत जाणून घ्यायला आवडेल ;)

मृगनयनी,
एका आगळ्यावेगळ्या विषयावर अर्थपुर्ण आणि वेधक माहिती.
सवितर विवरणाने समाधान वाटले. १४५अंशाचा कोन करताना मोजमाप करून त्या नृत्य-व्यायाम प्रकाराला गणिती काटेकोरपणा आला आहे.
सध्या रामदेव बाबांनी योग व्यायामांना नवे परिमाण देऊन त्याला जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. तशीच सध्याच्या कवायतखोर, अंगचटी नाचांऐवजी या नृत्यप्रकारांना पुढे आणणाऱ्या स्पर्धा आयोजित करून भारतीय पारंपारिक नृत्यांबद्द्ल गोडी पुन्हा उत्पन्न करता येईल.

मृगनयनी's picture

23 May 2011 - 11:31 am | मृगनयनी

सर्वांचे आभार!!! .... आपल्या कुणाला शास्त्रीय नृत्याबद्दल अधिक काही माहिती असल्यास शेअर करु शकता....

मुलूखावेगळी's picture

23 May 2011 - 1:27 pm | मुलूखावेगळी

२दा आलाय

मुलूखावेगळी's picture

23 May 2011 - 1:24 pm | मुलूखावेगळी

छान ग
माहितीपुर्ण लेख.
ऐकुन माहित होते कि डान्स ही व्यायाम असु शकतो पण तुझ्यामुळे बर्याच मुद्रांची नावे कळाली.

विसोबा खेचर's picture

23 May 2011 - 3:59 pm | विसोबा खेचर

छानच..! :)